चालू घडामोडी - १२ एप्रिल २०१७

Date : 14 April, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भास्कर समुहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल कालवश
  • दैनिक भास्कर समुहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल (वय 73) यांचे 12 एप्रिल रोजी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

  • भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवालजी यांच्या निधनाने मोठा धक्का बसला. त्यांनी हिंदी पत्रकारितेला नवा आयामच दिला नाही तर नव्या उंचीवर नेऊन पोहचवण्यात आले आहे.

  • पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक स्तंभ राहिलेल्या रमेशजींनी हिंदी प्रिंट मीडियाला जनमानसात लोकप्रियता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका वठविली आहे.

भारत खरेदी करून मिळवणार इस्राईलकडून क्षेपणास्त्रे 
  • अमेरिका आणि इस्राईलचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्याचकारणाने मोदी आता इस्रायलशी संबंध वाढवण्यावर भर देताना दिसत आहेत.

  • दोन्ही देशांना बाह्य दहशतवादाचा धोका आहे. मोदी येत्या जुलैमध्ये इस्राईल दौऱ्यावर जाणार असून भारत इस्राईलबरोबर दोन संरक्षण करार करणार आहे 

  • भारत इस्राईलकडून रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र 'स्पीक' तसेच नौदलासाठी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र 'बाराक-८' खरेदी करेल

वेस्टइंडीज , पाकिस्तान २०१९ विशावाचकांसाठी थेट पात्र ठरण्यात अपयशी 
  • आयसीसीच्या नियमानुसार एकदिवसीय क्रमवारी स्थान ना मिळाल्यामुळे त्यांना थेट पात्र होता येणार नाही.

  • पाकिस्तान व वेस्टइंडीज ला विश्वचषकासाठी पात्र होण्याकरिता स्पर्धेच्या दिव्यातून जावं लागणार आहे.

  • दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे आठ संघ या स्पर्धेसाठी थेट पात्र झाले आहेत.

दिनविशेष :
  • भारत हिंदुस्थानी लाल सेनेची स्थापना  : १३ एप्रिल १९३९

  • भुवनेश्वर हि ओरिसाची राजधानी घोषित झाली : १३ एप्रिल १९४८

  • इतिहासप्रसिद्ध वारणेचा तह : शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे दोन भाग झाले : १३ एप्रिल १७३१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.