चालू घडामोडी - १५ एप्रिल २०१७

Date : 15 April, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन संचाचे लोकार्पण

  • पंतप्रधान मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दीक्षाभूमी यावरील टपाल तिकीट, 'भीम रेफरल' योजनेच्या लोकार्पणासह ट्रिपल आयटी, 'आयआयएम' आणि 'एम्स' या शिक्षण संस्थांचा पाया रचला. त्यांनी एका स्क्रीनवर अंगठा लावून 'भीम-आधार' सेवेचा प्रारंभ केला.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विष प्राशन करून सामान्यांवर अमृताचा वर्षाव केला. त्यामुळे दीक्षाभूमीतून नव्या अर्थव्यवस्थेस प्रारंभ करीत असल्याचे नमूद करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भीम' ऍपमुळे देशाची अर्थव्यवस्था महाबली होणार असल्याचा विश्‍वास व्यक्‍त केला.
  • भविष्यात 'डिजिधन' लोकांचे 'निजी धन' बनणार असून, ते भ्रष्टाचारविरोधातील लढाईचे प्रमुख अस्त्र ठरणार आहे.

  • तसेच याशिवाय राज्यातील २० शहरांत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील पहिल्या टप्प्यातील ४० हजार घर बांधकामाचे उद्‌घाटन केले.

हरमित सिंग 'मुंबई श्री २०१७' किताब पटकावला
  • चुरशीच्या लढतीत आकर्षक शरीरयष्टीचे उत्कृष्ट प्रदर्शन करताना हरमित सिंगने 'मुंबई श्री २०१७' किताब पटकावला.

  • तसेच, बेस्ट पोझरसाठी अमित सिंग आणि बेस्ट इम्प्रुव्ह बॉडी पुरस्कारासाठी विराज सरमळकरची निवड झाली.

  • मुंबई जिल्हा बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने अंधेरीत झालेल्या स्पर्धेचे क्रांती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १०० शरीरसौष्ठपटूंनी सहभाग घेतला.

आता वाहन परवान्यासाठी नवी वेबसाईट सुरु करण्यात आली आहे
  • प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 'सारथी 4.0' संगणकप्रणाली सुरू केल्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी www.sarathi.nic.in याऐवजी www.paraivahan.gov.in या वेबसाइटवरून ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. लवकरच ही प्रणाली ई-सेवा केंद्रातही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

  • प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 'वाहन 4.0' या प्रणालीनंतर आता 'सारथी 4.0' ही प्रणाली कार्यान्वित केली असून लायसन्सच्या प्रकारानुसार पर्याय निवडून पुढील प्रक्रिया पार पाडावी लागेल. यामध्ये अर्ज भरून झाल्यानंतर आवश्‍यक कागदपत्रेही ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहेत.

  • पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दहा एप्रिलपासून ही प्रणाली वापरात आणली असून, परवाना काढण्याच्या ऑनलाइन प्रक्रियेत काही बदल झाले आहेत. यापूर्वी 'सारथी' वेबसाइटवरून परवान्याकरिता अपॉइंटमेंट घेतली जात होती.

  • 'सारथी' वेबसाइटद्वारे अपॉइंटमेंट घेताना कागदपत्रांची केवळ माहिती द्यावी लागत होती. आता नवीन प्रणालीमध्ये ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्यासाठीची वेबसाइट बदलण्यात आली आहे.

  • नागरिक 'परिवहन'च्या वेबसाइटवरून अपॉइंटमेंटसाठी अर्ज करू शकतात. ही वेबसाइट सुरू केल्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेस, त्यानंतर सारथी सर्व्हिसचा पर्याय निवडून ऑनलाइन अर्जाचा पर्याय निवडावा लागणार आहे.

शासकीय कार्यालये सौरऊर्जा प्रकल्प बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
  • प्रशासनाचे प्रमुख कार्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, शिवाजी विद्यापीठ, महापालिका व वनविभागाच्या इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील हा प्रकल्प येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे.
  • विजेची वाढती मागणी व त्या तुलनेत होणारा कमी पुरवठा यावर मार्ग काढण्यासाठी सौरऊर्जा वापराचा पर्याय पुढे येत असून दरम्यान, जिल्ह्यातील वडगावसह गडहिंग्लज नगरपालिकेतही असे प्रकल्प सुरू करण्याचे प्रस्ताव सादर झाले आहेत.

  • तसेच इतर नगरपालिकांसह शासनाची तालुका पातळीवर असलेली कार्यालयेही सौरऊर्जेने उजळून टाकण्याचा प्रयत्न असून शासन दरबारी यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.

दिनविशेष :
  • शीख धर्माचे संस्थापक 'गुरू नानक' यांचा जन्म : १५ एप्रिल १४६९
     
  • भारताने गॅट करारास मान्यता दिनांक : १५ एप्रिल १९९४ रोजी

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.