चालू घडामोडी - ०१ मे २०१७

Date : 1 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदींच्या श्रीलंकेच्या दौऱ्यात द्विपक्षीय करार होणार नाहीत :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या श्रीलंकेच्या दौऱ्यात कोणत्याही द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी होणार नाही. मोदी संयुक्त राष्ट्रांच्या ‘वेसक डे’ कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

  • भगवान बुद्धांचा जन्म, त्यांना झालेले दिव्य ज्ञान व मृत्यू याच्याशी संबंधित ‘वेसक डे’ १२ ते १४ मेदरम्यान श्रीलंकेत साजरा होत आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यासंदर्भात समाजमाध्यमांवर चुकीची माहिती दिली जात असल्याची मला कल्पना आहे, असे सिरिसेना म्हणाले.

  • ही माहिती श्रीलंकेचे अध्यक्ष मैथरिपला सिरिसेना यांनी शनिवारी येथे कार्यक्रमात दिली.

दक्षिण आशियाई उपग्रह भारत ५ मे रोजी अंतराळात सोडणार :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जाहीर केले. द साऊथ आशिया सॅटेलाईट (जीसॅट-९) ५ मे रोजी अवकाशात सोडले जाईल, भारताने त्याच्या शेजाऱ्यांना दिलेली ही ‘सब का साथ-सब का विकास’ या संकल्पनेचा भाग म्हणून मोठी भेट आहे, असे ते म्हणाले.

  • उपग्रहाचे वजन २,२३० किलो आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून त्याचे उड्डाण होईल.

  • पाकिस्तानने भारताकडून ही ‘भेट’ आम्हाला नको म्हणून त्यात भाग घ्यायला नकार दिला आहे. ‘आम्ही नेहमीच ‘सब का साथ, सब का विकास’ या संकल्पनेनुसार पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे, असे मोदी त्यांच्या मासिक ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

  • या प्रकल्पाचा भाग बनलेल्या देशांचे (नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, मालदीव व अफगाणिस्तान) मोदी यांनी आभार मानले. सुरुवातीला या उपग्रहाचे नाव ‘सार्क सॅटेलाईट’ होते; परंतु पाकिस्तानने प्रकल्पात भाग घ्यायला नकार दिल्यानंतर ते बदलून साऊथ आशिया सॅटेलाईट, असे करण्यात आले.

चीनला थेट ब्रिटनपर्यंत जोडणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब रेल्वेमार्ग :
  • जगातील दुसऱ्या क्रमाकांच्या लांबीच्या रेल्वे मार्गावरील मालगाडीचा प्रवास अखेर काल पूर्ण झाला. चीनला थेट ब्रिटनशी जोडणाऱ्या १२ हजार किलोमीटरच्या रेल्वे मार्गावरून, ही मालगाडी काल चीनच्या यिवु शहरात येऊन पोहोचली.

  • हा नवा रेल्वे मार्ग रशियातील प्रसिद्ध ट्रान्स- सायबेरियन रेल्वेपेक्षा लांब असला, तरी २०१४ साली सुरु झालेल्या आणि सध्या विक्रमी असलेल्या चीन-माद्रिद मार्गापेक्षा सुमारे एक हजार किलोमीटरने कमी आहे.

  • ही गाडी चिनी प्रमाणवेळेनुसार शनिवारी सकाळी ९.३० वाजता (जीएमटी ०१.३०) यिवुला पोहोचल्याचं यिवु तिआनमेंग इंडस्ट्री कंपनीने सांगितले.

  • या मालगाडीतून विस्की आणि लहान मुलांसाठीचं दूध, औषधं, तसंच काही यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यात आली आहे. ही मालगाडी १० एप्रिलला लंडनहून निघाली, त्यानंतर फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, पोलंड, रशिया, कझाकिस्तानमधून प्रवास करुन २० दिवसांनी चीनच्या यिवु शहरात पोहोचली.

दिल्लीचा सुमीतकुमार 'हिंदकेसरी'चा मानकरी, अभिजीत कटकेला उपविजेतेपद :
  • अभिजीत कटके हा मूळचा पुण्याचा असून, यंदा महाराष्ट्र केसरीत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. आता हिंदकेसरी स्पर्धेतील कामगिरीनं ते अपय़श धुवून काढण्याचा अभिजीतचा प्रयत्न राहील.

  • दिल्लीच्या छत्रसाल आखाड्याचा पैलवान सुमितकुमार २०१७ सालचा हिंदकेसरी ठरला आहे. सुमितकुमारनं हिंदकेसरी किताबाच्या निर्णायक कुस्तीत महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेवर ९-२ अशी मात केली. 

  • पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं यंदा हिंदकेसरी स्पर्धेचं आयोजन सारसाबागेतल्या सणस मैदानात करण्यात आलं होतं.

  • या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही सुमितनं अभिजीतला हरवलं होतं. मात्र त्या पराभवानं खचून न जाता अभिजीतनं परतीच्या लढतीत आक्रमक खेळ केला आणि क्रिशनकुमारला ८-३ असं हरवून फायनल गाठली होती. फायनलमध्ये सुमितनं त्याच्यावर पुन्हा वर्चस्व गाजवलं.

  • पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं सारसबागेतील सणस मैदानात हिंदकेसरी स्पर्धा भरवण्यात आली असून, या स्पर्धेला इंडियन स्टाईल रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यताही आहे.

राज्यात आजपासून ‘रेरा’ कायदा :
  • प्राधिकरण स्थापनेत मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्र आघाडीवर  घरखरेदीदारांना दिलासा,आतापर्यंत सहा राज्ये आणि सहा केंद्रशासित प्रदेशांनी नियम जारी केले आहेत.

  • केंद्रीय रिअल इस्टेट कायदा १ मेपासून देशभरात लागू झाला असून ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त १२ राज्यांनी याबाबतचे नियम जारी केले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.

  • महाराष्ट्रातील नियमानुसार, विकासकाला करारनामा करण्याआधी १० टक्के, तर करारनामा झाल्यानंतर ३० टक्के रक्कम घेता येणार आहे. प्रकल्प सुरू केल्यानंतर प्लिंथपर्यंत काम होईपर्यंत ४५ टक्के रक्कम घेण्याची मुभा राज्याच्या नियमांनी दिली आहे.

  • केंद्रीय कायद्यानुसार फक्त १० टक्के रक्कम घेण्याची मुभा होती; परंतु ही रक्कम किती असावी, याचा निर्णय राज्यांवर सोपविण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्राने पुढाकार घेत नियम तयार केले असले तरी प्राधिकरणाची अद्याप स्थापना झालेली नाही. परंतु हंगामी प्राधिकरण असल्यामुळे आता विकासकांना नव्या प्रकल्पांची घोषणा करण्याआधी रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे.

  • उर्वरित २० राज्यांनी अद्याप नियमही जारी केलेले नसून राज्यांमध्ये आजही विकासकांना नवे प्रकल्प जारी करता येणार आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीबाबत असा दुजाभाव असल्यामुळे विकासकांमध्ये नाराजी पसरली आहे. केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय मंत्रालयानेच नियम तयार केले आहेत.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • महाराष्ट्र दिन : महाराष्ट्र.

  • गुजरात दिन : गुजरात.

  • कामगार दिन : अमेरिका व अमेरिकाप्रभावित देश वगळता जगभर.

  • राष्ट्रीय प्रेम दिन : चेक प्रजासत्ताक.

  • कायदा दिन : अमेरिकेची संयुक्त संस्थाने.

जन्म, वाढदिवस

  • ‘अंचल’ रामेश्वर शुक्ल, आधुनिक हिंदी कवी : ०१ मे १९१५

  • सुरेश कलमाडी, भारतीय राजकारणी : ०१ मे १९४४

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन 

  • कमलनयन बजाज, भारतीय उद्योगपती : ०१ मे १९७२

  • नानासाहेब गोरे उर्फ ना. ग. गोरे, समाजवादी विचारवंत : ०१ मे १९९३

  • गंगुताई पटवर्धन, शिक्षणतज्ञ : ०१ मे १९९८

ठळक घटना 

  • मुंबई विद्यापिठाचा पहिला पदवीदान समारंभ : ०१ मे १८६२

  • स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना : ०१ मे १८९७

  • सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले : ०१ मे १९३०

  • पोलियोची लस जनतेस उपलब्ध : ०१ मे १९५६

  • सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती : ०१ मे १९८१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.