चालू घडामोडी - ०७ जुलै २०१७

Date : 7 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताने विंडीजविरुद्धची वनडे मालिका जिंकली :
  • निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून विजय मिळविला.

  • त्याचबरोबर भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर ३-१ विजय मिळविला.

  • पाचव्या आणि निर्णायक सामन्यात मोहम्मद शमी आणि उमेश यादवने भेदक मारा करत यजमान संघाला अवघ्या २०५ धावांत रोखल्यानंतर विराट कोहलीने शानदार शतकी खेळी करताना अजिंक्य रहाणे आणि दिनेश कार्तिकच्या साथीने जबरदस्त भागीदाऱ्या रचत भारताला विजय मिळवून दिला.

केशव शर्मा भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक :
  • इलेक्ट्रॉनिक्समध्ये मास्टर्स ऑफ सायन्स आणि एमफिल तसेच आयआयटीमधून मास्टर्स इन मॅनेजमेंट असे शिक्षण घेतलेल्या केशव शर्मा यांचा दिल्ली विमानतळाचे तसेच मुंबई विमानतळाच्या हवाई वाहतूक सेवेचे (एटीएस) आधुनिकीकरण या कामात मोठा वाटा आहे.

  • भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया) पश्चिम विभागाचे कार्यकारी व्यवस्थापकपदाची सूत्रे केशव शर्मा यांनी येथे स्वीकारले असून याआधी अलाहाबादच्या सिविल एविएशन ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य होते.

  • शर्मा यांनी १९८५ साली केंद्रीय लोकसेवा आयोमार्फत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयात एरोड्राम ऑफिसर म्हणून कामाला सुरुवात केली.

  • तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोल, एअरपोर्ट मॅनेजमेंट व सेफ्टी मॅनेजमेंट यात ते निष्णात मानले जातात.

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद खान यांना अध्यक्षपदावरून हटविले :
  • गंभीर स्वरूपाचे आरोप असलेले राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांना राज्य शासनाने आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविले आहे.

  • खान हे जळगाव जिल्ह्यातील असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

  • खान यांना जानेवारी २०१५ मध्ये आयोगाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले होते. काही प्रकरणांत त्यांनी स्वत: न्यायालय असल्याच्या थाटात आदेश पारित केले, अशी तक्रार झाली होती.

  • जमीन महसूल संहितेंतर्गत जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारांचा वापर ते करीत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. काही प्रकरणांत त्यांनी स्वत:ला अधिकार असल्याच्या थाटात सुनावणी दिल्याचेही तक्रारीत म्हटले होते.

येथे चिनी सैनिक इंग्रजी शिकतात !
  • भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती असली तरी चीन, व्हिएतनाम, नेपाळ, लाओसचे सैन्य अधिकारी एकत्रितपणे मध्यप्रदेशातील पचमढी येथील भारतीय लष्कराच्या शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालयात इंग्रजी भाषेचे धडे गिरवित आहेत.

  • द्विपक्षीय करारानुसार मित्र देशातील सैन्य अधिकारी परस्परांच्या देशात जावून संयुक्त सराव करीत असतात. तसेच वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी देखील जात असतात.

  • दोन देशाच्या सीमेवर तणावाचा यावर परिणाम होत नाही. भारत आणि चीन यांच्यामध्ये सध्या सीमेवरून वाद आहे.

  • चीन, नेपाळ, व्हिएतनाम आणि लाओसचे सैन्य अधिकारी पचमढी येथे इंग्रजी भाषेचा एकत्रितपणे अभ्यास करीत आहेत.

  • पचमढी येथील केंद्रात ऊर्दू, काश्मिरी आणि इंग्रजी या भाषांबरोबर शेजारी राष्ट्रांच्या भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास केला जातो.

महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवला कांस्यपदक :
  • पुरुषांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत लक्ष्मणने सुवर्णपदक जिंकून आशियाई अ‍ॅथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. दुसरीकडे मनप्रीत कौरने गोळाफेकने सुवर्ण, विकास गौडाने थाळीफेकमध्ये कांस्य, महिलांच्या लांबउडीत व्ही. नीनाने रौप्य, तर नयन जेम्सने कांस्यपदक जिंकले.

  • महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने महिलांच्या ५००० धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले.

  • ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने १६ मि. ००.२४ सेकंदाची वेळ नोंदवून कांस्यपदकावर आपला हक्क प्रस्थापित करून महाराष्ट्राची शान वाढविली.

  • तसेच कॅग्रीस्थानच्या दारीया मास्लोव्हाने १५ मि. ५७-९७ से.ची वेळ नोंदवून सुवर्ण, तर यूएईच्या आलिया मोहम्मदने १५ मि. ५९.९५ से.ची वेळ नोंदवून रौप्य जिंकले.

समुद्राच्या पिण्यायोग्य पाण्याची मोदींनी चाखली चव !
  • पंतप्रधान मोदी यांनी नेत्यानाहू यांच्यासोबत हैफा येथील वोगला बीचवरील गाल-मोबाइल जलशुद्धीकरण प्रकल्पालाही भेट दिली.

  • समुद्राचे पाणी क्षारमुक्त तसेच शुद्ध करून वापरण्याच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकही या वेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना देण्यात आले.

  • गाल-मोबाइल हे जलशुद्धीकरणाची चालती फिरती यंत्रणा आहे. त्यातून समुद्राचे पाणी क्षारमुक्त करून पिण्याजोगे केले जाते.

  • या शुद्धीकरण वाहनातूनहंी दोन्ही नेत्यांनी थोडा प्रवास केला. हे तंत्रज्ञान पूर, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी आणि दुर्गम भागात तैनात असणाऱ्या लष्करासाठी तसेच ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरेल.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • महेंद्र सिंह धोनी, भारतीय क्रिकेट खेळाडू : ०७ जुलै १९८१

  • महेश भूपती, भारतीय टेनिसपटू : ०७ जुलै १९७४

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • डॉ. स. गं. मालशे (सखाराम गंगाधर मालशे), मराठी वाडमयाचे ज्येष्ठ अभ्यासक : ०७ जुलै १९९२

  • सत्यभामाबाई टिळक (तापीबाई टिळक), टिळकांच्या पत्नी : ०७ जुलै १९१२

ठळक घटना

  • ट्रिनिटी कॉलेजने सर आयझॅक न्यूटनला एम.ए.ची पदवी प्रदान केली : ०७ जुलै १६६८

  • रणजीतसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला : ०७ जुलै १७९९

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.