चालू घडामोडी - ०९ ऑगस्ट २०१७

Date : 9 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भाजपाचे खासदार संवरलाल जाट यांचे निधन : 
  • भाजपाचे खासदार संवरलाल जाट यांचे निधन झाले आहे, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, काही दिवसांपूर्वी प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानं त्यांना एअर अॅम्ब्युलन्सनं नवी दिल्ली येथे आणण्यात आले होते.

  • २२ जुलै रोजी जयपूर येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक सुरू असतानाच खासदार संवरलाल जाट हे बेशुद्ध पडले. यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • जाट यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले व ते बेशुद्ध पडले, यानंतर त्यांना तातडीनं एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीनं नवी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. 

सरकारकडून परदेशस्थ भारतीयांसाठी विविध योजना :
  • 'मेक इन इंडिया' द्वारे परदेशस्थ भारतीयांनी देशात गुंतवणूक करावी, यासाठी त्यांना विविध सवलती दिल्या जात आहेत, भारताला 'पॉवर हाउस' बनविण्यासाठी अनिवासी भारतीयांची मदत घेण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत.

  • अनिवासी भारतीय हे देशाचे मोठे भांडवल असून, त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी विशेष योजना तयार केल्या जात आहेत.

  • परदेशात मोठा व्यवसाय उभा करणाऱ्या अनिवासी भारतीयांना (एनआरआय) देशात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्याकरता केंद्र सरकारने अनिवासी भारतीय आणि परदेशस्थ भारतीयांसाठी थेट परकी गुंतवणुकीचे (एफडीआय) नियम शिथिल केले आहेत.

  • देशातील परकी गुंतवणुकीचा ओघ वाढण्यासाठी अनिवासी भारतीय (एनआरआय), परदेशस्थ भारतीय (ओआयसी) भारतीय वंशाचे परदेशी नागरिक (पीआयओ) यांच्यासाठी परकी गुंतवणुकीच्या (एफडीआय) नियमांत दुरुस्ती केली आहे.

  • केंद्र सरकारच्या या बदलांमुळे 'मेक इन इंडिया' आणि 'मेक इन महाराष्ट्र'द्वारे संरक्षण, रेल्वे, विमा, वैद्यकीय उपकरणे, मसाले या क्षेत्रात गुंतवणुकीस परदेशस्थ भारतीय उत्सुक आहेत.

विजयानंतर अहमद पटेल यांची प्रतिक्रिया : सत्यमेव जयते
  • अत्यंत आव्हानात्मक ठरलेल्या निवडणुकीत भाजपाध्यक्ष अमित शहांची रणनीती आणि भाजपाचे सर्व प्रयत्न हाणून पाडत विजय मिळवल्यानंतर अहमद पटेल यांनी सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  • काल राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान झाल्यानंतर राजकीय नाट्य रंगले होते, मात्र अनेक वळणे घेतल्यानंतर आज मध्य रात्री पावणे दोन वाजता निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात अहमद पटेल यांनी ४४ मते मिळवत अर्ध्या मताने विजय मिळवला.

  •  "ही निवडणूक माझ्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात अवघड निवडणूक होती. बऱ्याच निवडणुका लढवल्या मात्र एवढे आव्हान कधी मिळाले नव्हते.

  • भाजपाकडून मला पराभूत करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करण्यात आले, केंद्र आणि राज्य सरकारने मला पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती. त्यांचा यामागे काय हेतू होता हे माहीत नाही." असे अहमद पटेल म्हणाले.

ऐतिहासिक आंदोलनासाठी मराठा समाज सज्ज :
  • मराठा क्रांती मूक मोर्चाच्या (९ ऑगस्ट) पूर्वसंध्येलाच पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातून हजारो नागरिक नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. शाळा, महाविद्यालयांसह एपीएमसीमध्ये आंदोलकांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे.

  • राज्याच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या मराठा बांधवांच्या पाहुणचारासाठी शहरातील शेकडो स्वयंसेवकांनी स्वत:ला झोकून दिले असून नाष्टा, जेवणासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

  • मोर्चासाठी रूग्णवाहिका, डॉक्टरांसह वाहन दुरूस्ती पथकही तयार केले आहे. समाजबांधवांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन केले आहे.

  • 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा देत राज्याच्या विविध जिल्ह्यातून आंदोलक मुंबई, नवी मुंबईमध्ये येण्यास सुरवात झाली आहे.

न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांची सरन्यायाधीशपदी निवड : 
  • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा भारताचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत, आज (मंगळवार) कायदा व न्याय मंत्रालयाने याबाबत अधिकृतरित्या घोषणा केली.

  • सध्याचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर हे येत्या २७ ऑगस्टला निवृत्त होतील. त्यानंतर त्यांचा पदभार दीपक मिश्रा सांभाळणार आहेत.

  • दीपक मिश्रा यांनीच याकूब मेमनचा खटला पहाटे ५ वाजता निकाली काढत पुढच्या दोन तासात याकूबला फाशी देण्यात येईल, याशिवाय दिल्लीतल्या निर्भया प्रकरणात चारही दोषींना त्यांनी फाशीची शिक्षाही सुनावली होती, याच प्रकरणानंतर ६३ वर्षीय दीपक मिश्रा प्रकाशझोतात आले होते.

नेपाळचे पंतप्रधान येणार भारताच्या दौऱ्यावर : 
  • ०४ ऑगस्ट रोजी देऊबा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतील त्याचप्रमाणे विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही ते चर्चा करतील, शेर बहादूर देऊबा बोधगया आणि तिरुपती येथील बालाजी मंदिरासही ते भेट देतील.

  • डोकलाम येथिल परिस्थितीमुळे भारत आणि चीन यांच्यामध्ये सध्या संबंध ताणले गेले आहेत, अशा स्थितीत नेपाळचे पंतप्रधान देऊबा यांनी पदावरती पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • काठमांडू येथे दौऱ्याचा निर्णय जाहीर करताना नेपाळचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री कृष्ण बहादूर महारा यांनी या दौऱ्याची तयारी सुरु असून त्यामधील कार्यक्रम ठरवण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे सांगितले.

  • २४ ऑगस्ट रोजी देऊबा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतील त्याचप्रमाणे विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही ते चर्चा करतील. 

अभियांत्रिकीसाठी राज्यात सीईटी आवश्यक :
  • राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी राज्यस्तरावरील सामाईक प्रवेश परीक्षाच (एमएचटी-सीईटी) राहणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) स्पष्ट करण्यात आले आहे.

  • राज्य शासनाने पुढील शैक्षणिक वर्षासाठी 'सीईटी'ची तयारी करण्याबाबत 'डीटीई'ला पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे सध्या तरी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) की सीईटी हा विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होणार आहे.

  • राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश यंदा सीईटीमार्फत करण्यात आले. देशपातळीवर संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई बंधनकारक होती.

  • 'नीट'च्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षीपासून अभियांत्रिकी प्रवेशासाठी 'जेईई' ही एकच परीक्षा असणार की नाही, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • राष्ट्र दिन : सिंगापुर.

  • राष्ट्रीय महिला दिन : दक्षिण आफ्रिका.

जन्म, वाढदिवस

  • विनायक कृष्ण (व्ही.के.) गोकाक, कानडीभाषेतील लेखक : ०९ ऑगस्ट १९०९

  • जूप डेन उइल, नेदरलँड्सचा पंतप्रधान : ०९ ऑगस्ट १९१९

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • विष्णुदास भावे, मराठी नाट्यपरंपरेचे जनक : ०९ ऑगस्ट १९०१

ठळक घटना

  • क्रांतिदिन. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले : ०९ ऑगस्ट १९४२

  • भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेगाडीची लूट : ०९ ऑगस्ट १९२५

  • चले जाव चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली : ०९ ऑगस्ट १९४२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.