चालू घडामोडी - ०९ जुलै २०१७

Date : 9 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सुधा सिंगला सुवर्णपदक :
  • भुवनेश्वर येथे सुरु असलेल्या २२ व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुधा सिंग हिने सुवर्णपदक पटकावले.

  • येथील कलिंगा स्टेडीयमवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात सुधाने ९ मिनिट ५९.४७ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली.

  • सुधाने २००९, २०११ आणि २०१३ च्या स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानले होते, परंतु यंदाच्या स्पर्धेत नुकतीच विवाहबध्द झालेल्या महाराष्ट्र कन्या ललिता बाबरने माघार घेतल्याने तिला सुवर्णपदकाची संधी होती.

  • ३१ वर्षीय सुधाने सुरवातीपासूनच आघाडी घेतली होती.

ट्रम्प स्वतः उठून नरेंद्र मोदींची भेट घेतात तेव्हा...
  • जी २० परिषदेत दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरु होण्यापुर्वी या दोन्ही नेत्यांनी उत्स्फुर्त संवाद साधला असे पानगगढिया यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

  • जी २० परिषदेच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी स्वतः पुढे जाऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.  

  • ट्रम्प यांनी घेतलेल्या उत्स्फुर्त भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचेही समजते, नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ अरविंद पानगढिया यांनी या भेटीचे काही क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करुन ट्वीट केले आहे. त्यानंतर ही छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.

  • दोन दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वीपक्षीय चर्चांसोबत विविध देशांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत त्याचप्रमाणे जर्मनीच्या चॅन्सलर अॅंजेला मर्केल आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तिना लगार्ड यांची त्यांनी भेट घेतली. 

भारताच्या मानेवर चीनचा सुरा :
  • जूनच्या सुरुवातीला भारताच्या सिक्कीम आणि आसपासच्या भागातील सीमेवर चीनच्या आणि भारतीय सैन्यात धक्काबुक्की झाल्याच्या बातम्यांनी देशात खळबळ माजवली.

  • उत्तर सीमेवर चीनकडून होणारी घुसखोरी आता नित्याचीच झाली आहे, अनेकदा या बाबी प्रसारमाध्यमे आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचतदेखील नाहीत. मात्र या वेळी या प्रकरणाने गंभीर वळण घेतले.

  • ७ आणि ८ जुलै रोजी तेथे झालेल्या जी-२० देशांच्या परिषदेत दोन्ही नेते समोरासमोर येऊन बोलणारही नाहीत अशी अटकळ होती. पण तेथे ब्रिक्स देशांच्या नेत्यांची अनौपचारिक बैठक झाली आणि त्यात मोदी व जिनपिंग यांनी भेटून काही वेळ चर्चाही केली.

  • दोन्ही बाजूंनी नमते घेण्यास नकार दिल्याने आणि दोन्ही देशांकडून आरोप-प्रत्यारोप होत राहिल्याने महिनाभर माध्यमांना चांगलेच खाद्य पुरवले.

  • त्यात चीनने भारताला १९६२ सालच्या युद्धातील पराभवाची आठवण करून देऊन आणखीनच डिवचले. भारतानेही आता आम्ही १९६२ प्रमाणे लेचेपेचे राहिलेलो नाही, असा टोला लगावला.

  • सुरुवातीला भारत, चीन आणि भूतानमध्ये मर्यादित असलेला हा वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याबरोबर जर्मनीपर्यंत पोहोचला.

दिनविशेष : 

जन्म, वाढदिवस

  • एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान : ०९ जुलै १९१६

  • गुरू दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक : ०९ जुलै १९२५

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले : ०९ जुलै १९६९

  • मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला : ०९ जुलै १८७३

  • भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली : ०९ जुलै १९५१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.