चालू घडामोडी - १० ऑगस्ट २०१७

Date : 10 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतासह ८० देशांना कतारमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश :
  • भारतासह युरोपातील डझनभर देश, लेबनन, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि यूएसमधील नागरिकांना कतार देशात ऑन अरायव्हल टुरिस्ट व्हिसा मिळणार असून ३३ देशातील नागरिकांना १८० दिवस (सहा महिने) तर उर्वरित ४७ देशातील नागरिकांना ३० दिवसांपर्यंत कतारमध्ये वास्तव्य करता येईल.

  • शेजारी आखाती राष्ट्रांनी टाकलेल्या दोन महिन्यांच्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर कतार सरकारने हवाई वाहतूक आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

  • सुरक्षा आणि आर्थिक निकष, त्याचप्रमाणे देशाच्या क्रयशक्तीवरुन ही विभागणी करण्यात आली असून भारतासह तब्बल ८० देशातील नागरिकांना कतारने व्हिसा-फ्री प्रवेश जाहीर केला आहे.

  • सौदी अरेबिया, इजिप्त, बहारेन आणि यूएईने ५ जून रोजी कतारवर बहिष्कार लादला होता. इराणशी जवळीक साधल्याचा आणि दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आरोप करत कतारशी या देशांनी वाहतुकीचे संबंध तोडले.

अमेरिकेतील फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत रवींद्रने सुवर्ण कमाई : 
  • महाराष्ट्राच्या रवींद्र जगताप याने अमेरिकेत तिरंगा फडकवला असून अमेरिकेतील फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत रवींद्रने सुवर्ण कमाई केली आहे.

  • अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आयोजित जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाच्या रवींद्र जगतापनं ७० किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

  • त्यानं आदल्याच दिवशी ७१ किलो ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात रौप्य पदक जिंकलं होतं.

  • दोन्ही कुस्ती प्रकारात पदकं मिळवून रवींद्र जगतापनं नवीन इतिहास रचला आहे. याआधी हिंदकेसरी मारुती माने यांनी जाकार्ता येथील राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत अशीच दुहेरी कामगिरी केली होती.

गणपती मिरवणुकी दरम्यान डिजेचा वापर टाळण्याचे आवाहन :
  • गणेशोत्सवा दरम्यान डिजेच्या दणदणाटाला आवर घालण्यासाठी रायगड पोलिसांनी पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे, गणेशोत्सव मंडळांना तसेच नागरिकांना गणपती मिरवणुकी दरम्यान डिजेचा वापर टाळण्याचे आवाहन केले जात आहे.

  • अलिबाग पोलिसांनी नुकतेच याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. गणेशोत्सव मंडळांना तसेच नागिरकांना हे परिपत्रक वाटले जाणार आहे.

  • गणपती मिरवणुका काढताना ध्वनी प्रदुषण होणार नाही. याची खबरदारी घेण्याचे, डिजेचा वापर टाळण्याचे, आणि पारंपिरक वाद्यांचा वापर करून मिरवणुका काढण्याचे आवाहन केले जाणार आहे.

  • राज्यात ध्वनीप्रदुषण अधिनियम २००० अस्तित्वात आला आहे. यानुसार ध्वनिप्रदुषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतुद करण्यात आली आहे.

  • ध्वनीप्रदुषणाचे नियम मोडणाऱ्यांवर १ लाख रुपये दंड आणि ५ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतुद आहे.

ऑनलाइन पेपर तपासण्याचं टेक्निक : मुंबई विद्यापीठ
  • मुंबई विद्यापीठात झालेला पेपर तपासणीचा घोळ, त्यावरून झालेले वाद, मुलांसह पालकांचा टांगणीला लागलेला जीव या साऱ्याविषयी गेले काही दिवस वृत्तपत्रांत आपण वाचतोच आहोत.

  • तसंही पेपर फुटणं, उत्तरपत्रिका गहाळ होणं, पास झालेले नापास होणं इत्यादी सारे चमत्कार काही आपल्याकडे नवीन नाहीत, यंदाच्या वर्षी पेपर हातानं तपासण्याऐवजी आॅनलाइन तपासण्याचा निर्णय जानेवारी महिन्यामध्ये मुंबई विद्यापीठानं जाहीर केला.

  • आपल्याकडचे पेपर सेट करण्याची पद्धती, त्यांची वाहतूक, परीक्षा केंद्रे, उत्तरपत्रिकांची वाहतूक या सर्वांमध्ये पेपरफुटी, कॉपी, चोरी या सगळ्या गुन्ह्यांना भरपूर वाव आणि वाटा आहेत.

  • प्रत्येक वर्षी नव्या प्रकारची कॉपीची प्रकरणं समोर येत असतात. पेपरफुटी आणि उत्तरपत्रिकांची होणारी हेळसांड, गुण मोजताना होणाऱ्या चुकाही समोर येतात.

  • इतकेच नव्हे तर उत्तरपत्रिकेवर दिलेले गुण गुणपत्रिकेत भरताना डेटा एण्ट्रीमध्येही मोठ्या चुका होतात (किंवा केल्या जातात). हे सगळे दोष टाळण्यासाठी आॅनस्क्रीन मार्किंग किंवा आॅनस्क्रीन करेक्शन म्हटलं जाणारी ही पद्धती अवलंबायचं विद्यापीठानं ठरवलं.

विश्व पोलीस फायर क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण :
  • अमेरिकेत सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला दोन सुवर्ण, एक रौप्यपदक मिळाले. त्यात कोल्हापूरच्या जयश्री बोरगी, मुंबईची सोनिया मोकल यांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्ण, तर मुंबईच्याच रवींद्र जगताप याने कुस्तीत रौप्यपदक पटकाविले.

  • लॉस एंजिल्स येथे सुरू असलेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने 5 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यापाठोपाठ सोनिया मोकल हिने ८०० मीटर धावणे स्पर्धेत देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.

  • तसेच ७१ किलोगटात ग्रीको रोमन प्रकारात मुंबईच्या रवींद्र जगतापने रौप्यपदक मिळवून दिले.

  • सन २०१५ मध्ये अमेरिकेतील फेअर फॅक्स राज्यातील व्हर्जिनिया येथे झालेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. त्यासह तिने भारतीय पोलीस दलातील धावपटू रहमान याने नोंदविलेला ११.३१.२९ ही विक्रमी वेळही मोडत ११.०३.२१ अशी वेळ नोंदवत ५००० मीटर व १०००० मीटर धावण्यात सुवर्ण, तर ५००० मीटर चालण्यात रौप्यपदकाची कमाई केली होती.

  • अशाप्रकारची कामगिरी करणारी ती पोलीस दलातील एकमेव महिला धावपटू ठरली आहे.

नामविस्तारास सोलापूर विद्यापीठाचा विरोध : प्रस्ताव
  • सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठास दिले होते.

  • विद्यापीठाने तसा प्रस्ताव पाठवला तर नाहीच; उलट, नामविस्तार केल्यास विद्यापीठाच्या विकासात अडथळा होईल. त्यामुळे विद्यापीठाचे सध्याचे नाव आहे तसेच ठेवावे, असे राज्य सरकारला कळवले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिली.

  • नाशिकचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जयवंत जाधव यांनी या संदर्भातला तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. मे २०१७ मध्ये मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठास पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासंदर्भातला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले होते.

  • सोलापूर विद्यापीठाने कळवले की, विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत विविध संघटना व राजकीय पक्षांनी दिलेली निवेदने विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात आली होती.

  • तसेच जातीय तेढ निर्माण होऊन विद्यापीठाच्या निकोप विकासाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सोलापूर विद्यापीठाचे नाव सोलापूर विद्यापीठ राहील, असा सर्वानुमते घेण्यात आलेला निर्णय कायम ठेवावा, असे विद्यापीठाने राज्य सरकारला कळवले आहे.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : इक्वेडोर.

जन्म, वाढदिवस

  • पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ : १० ऑगस्ट १८६०

  • भारताती-इंग्रजी उद्योगपती पेरीन वॉर्सी यांचा जन्म : १० ऑगस्ट १९५६

  • भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री व्ही. व्ही. गिरी यांचा जन्म : १० ऑगस्ट १८९४

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • जनरल अरुणकुमार वैद्य, माजी लष्कर सेनापती : १० ऑगस्ट १९८६

  • कवी व नाट्यसमीक्षक नारायण पेडणेकर यांचे निधन : १० ऑगस्ट १९९७

ठळक घटना

  • मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहावर पोचले : १० ऑगस्ट १९९०

  • इक्वेडोरची राजधानी क्विटोने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले : १० ऑगस्ट १८०९

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.