चालू घडामोडी - ११ ऑगस्ट २०१७

Date : 11 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
व्यंकया नायडू यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ :
  • व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदाची शुक्रवारी शपथ घेतली आहे, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते.

  • राष्ट्रपती भवनात आज सकाळी दहा वाजता व्यंकय्या नायडू शपथ घेतील. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारमधील अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.

  • व्यंकय्या नायडूंनी आंध्र प्रदेशच्या नेल्लूरपासून नवी दिल्ली असा मोठा राजकीय प्रवास केला असून देशाच्या दुसऱ्या मोठ्या घटनात्मक पदाची जबाबदारी ते आज स्वीकारणार आहेत, भारताचे तेरावे उपराष्ट्रपती म्हणून ते आज शपथ घेणार आहेत.

  • उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानासाठी १४ खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे ७८५ पैकी ७७१सदारांनीच मतदान केलं, एनडीएचे उमेदवार वंकय्या नायडू यांना ५१६ मतं मिळाली. 

युवा कबड्डीपटूला राष्ट्रीय पुरस्कार : विराज डबरे
  • युवकांच्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नेपाळच्या संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावण्यात या खेंळाडूचा मोठा वाटा होता. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या संस्थेने राष्ट्रीय कबड्डीपटूचा किताब दिला आहे.

  • बदलापूरजवळील जांभळे गावात राहणार्‍या विराज डबरे याला लहानपणापासून कबड्डीची आवड होती. ही आवड पूर्ण करत असताना त्याने गावातील संघातूनच सरावाला सुरुवात केली, जांभळे हे गाव कबड्डीपटूंचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या वरिष्ठ खेळाडूंकडून त्याला चांगले मार्गदर्शन मिळाले.

  • विराजच्या खेळाची दखल घेत त्याची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली, त्यानंतर, लागलीच २१ वर्षांखालील भारतीय संघातही त्याची निवड निश्चित झाली, तसेच त्याची चमकदार कामगिरी पाहून १९ वर्षांखालील युवकांच्या महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली, पुढे त्याने या संघाचे कर्णधारपदही भूषवले.

  • नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत (रूरल ऑलिम्पिक) २१ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करत असताना विराजच्या संघाने नेपाळचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेत भारताच्या दिग्गजांना विश्रांती ?
  • सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांनाही श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते, याव्यतिरीक्त जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीलाही आगामी वन-डे मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते.

  • ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतल्यानंतर आगामी वन-डे मालिकेत भारताच्या दिग्गजांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

  • निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद हे गेल्या काही दिवसांमधली भारतीय खेळाडूंची कामगिरी आणि आगामी मालिकांचं व्यस्त वेळापत्रक पाहता वन-डे मालिकेसाठी संघ निवडणार आहेत.

  • युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, कृणाल पांड्या या नवोदीतांना आगामी मालिकेत संघात जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • आगामी काळात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे, तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 

परिवहन विभागातर्फे 'आरटीओ महाराष्ट्र' अ‍ॅप :
  • राज्यातील वाहन चालकांना तक्रार करणे सोयीचे व्हावे, यासाठी परिवहन विभागाने 'आरटीओ महाराष्ट्र' हे नवीन अ‍ॅप चालकांच्या सेवेत दाखल केले. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याची माहिती देण्यासाठी अ‍ॅपमध्ये विशेष (एसओएस) बटणाची व्यवस्था आहे.

  • विविध कामांसाठी नागरिक आरटीओमध्ये गर्दी करतात. त्यामुळे कार्यालयांबाहेर मोठ्या रांगा लागतात. परिणामी, रांगेपासून सुटका मिळवण्यासाठी 'आरटीओ महाराष्ट्र' हे अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे.

  • अ‍ॅपमध्ये राज्यातील रिक्षा-टॅक्सी व अन्य वाहनांविरुद्ध तक्रार करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना आपत्कालीन परिस्थितीत नातेवाइकांना माहिती देण्यासाठी अथवा त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी 'एसओएस' क्लिक ही सेवादेखील पुरवण्यात आली आहे.

  • तसेच अ‍ॅपमुळे रिक्षा-टॅक्सी आणि खासगी वाहतूकदारांकडून होणार्‍या प्रवासी लुबाडणुकीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी :
  • कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिरातील सोन्याचे अलंकार, देवीचे चांदीचे दागिने, कोट्यवधींची रोकड, तसेच भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या किमती ऐवजावर पुजाऱ्यांनीच डल्ला मारला आहे.

  • पंढरपूर, शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची घोषणा गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत केली. येत्या तीन महिन्यांत हा कायदा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

  • शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, तसेच कॉंग्रेसचे सत्यजित पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

  • विधानसभेत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी आक्रमक होत पुजाऱ्यांच्या बेसुमार लुटीच्या कथा ऐकवत या लुटीची 'एसआयटी' चौकशी करण्याची मागणी करताना अंबाबाईला पुजाऱ्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी केली.

नागपूर मेट्रोच्या निर्मितीचा 'जलद' आणि 'स्वस्त' प्रवास : 
  • नागपूर मेट्रोचं काम वेगानं पूर्ण करताना, मेट्रो प्राधिकरणाला तब्बल 800 कोटींची बचत करण्यातही यश आलं असून त्यामुळे या यशात गडकरी इफेक्ट तर नाही ना ? अशी चर्चा सध्या नागपुरात सुरू आहे.

  • पुढच्या आठवड्यात नागपूर मेट्रोची चाचणी होणार आहे, त्यामुळे मेट्रोनं प्रवास करण्यासाठी राज्याची उपराजधानी सज्ज झालीय. विशेष म्हणजे, कामाच्या वेगामुळं, आणि योग्य नियोजनामुळं नागपूर मेट्रो प्रकल्पाची किंमत तब्बल ८०० कोटींनी कमी झाली आहे.

  • यात डीपीआर म्हणजेच, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्टनुसार नागपूर मेट्रोचा खर्च ८ हजार ६६० कोटी इतका होता, त्यात १० टक्क्यांची बचत करण्यात अधिकाऱ्यांना यश आलं आहे.

  • देशातल्या इतर मेट्रोच्या निर्मितीसाठी प्रति किलोमीटरमागे २०० ते २५० कोटी खर्च येतो, मात्र नागपूर मेट्रोसाठी हाच खर्च फक्त १७० १८० कोटींच्या घरात येणार आहे, त्यामुळे प्रकल्पाचा खर्च कमी करण्यासाठी नागपूर मेट्रोनं लढवलेली शक्कल खरचं कौतुकास्पद आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • विद्यार्थी दिन : ब्राझिल.

जन्म, वाढदिवस

  • वि.स. वाळिंबे (विनायक सदाशिव वाळिंबे), मराठी लेखक : ११ ऑगस्ट १९२८

  • यशपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू : ११ ऑगस्ट १९५४

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • क्रांतीवीर खुदीराम बोस : ११ ऑगस्ट १९०८

  • डॉ. इरावती कर्वे, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक : ११ ऑगस्ट १९७०

ठळक घटना

  • चाडला फ्रांसपासून स्वातंत्र्य : ११ ऑगस्ट १९६०

  • शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदांचे गाजलेले भाषण : ११ ऑगस्ट १८९३

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.