चालू घडामोडी - १२ ऑगस्ट २०१७

Date : 12 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बाबा रामदेव यांच्यावर आधारित पुस्तकाच्या विक्रीवर स्थगिती :
  • योगगुरु बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित 'गॉडमॅन टू टायकून : द अनटोल्ड स्टोरी ऑफ बाबा रामदेव' या पुस्तकाच्या विक्रीवर स्थगिती आणण्यात आली असून दिल्लीमधील न्यायालयाकडून ही स्थगिती आणण्यात आली आहे.

  • 'बाबा रामदेव यांच्यावर आधारित याआधी कोणतंच पुस्तक लिहण्यात आलं नसल्याने आम्हाला अशा प्रकारच्या स्थगितीची काहीच कल्पना नव्हती', असं प्रियांका यांनी सांगितलं आहे. 

  • जगरनॉट बुक्सने न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने प्रकाशक किंवा लेखकाची बाजू ऐकून न घेताच बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन आणि विक्रीवर स्थगिती आणली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

  • १० ऑगस्ट रोजी आपल्याला हा निर्णय कळवण्यात आला असून, लवकरच निर्णयाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार आहोत अशी माहिती प्रकाशकाने दिली आहे. प्रियांका पाठक नारायण यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

  • न्यायालयाच्या निर्णयाची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याची प्रतिक्रिया त्यांनी मुंबई मिररशी बोलताना दिली आहे.

भारतीय लोकशाहीचे सामर्थ्य : १५ ऑगस्ट २०१७ रोजी ७० वर्षे पूर्ण
  • आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांत लोकशाहीची धूळधाण झालेली दिसते, आपल्या आजूबाजूला पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, इराक, इराण आदी देशांत हुकूमशाहीचे भूत अधूनमधून डोके वर काढत असते.

  • भारतातील लोकशाहीचे श्रेय कोणा एका व्यक्तीला किंवा संस्थेला देता येणार नाही, हे सामुदायिक यश आहे.

  • उत्तम राज्यघटना, नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारे सर्वोच्च न्यायालय, सुबुद्ध नागरिक, नव्या युगातील सरकारवर वचक ठेवणारी वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीसारखी माध्यमे आणि निष्पक्षपाती निवडणूक आयोग यांमुळे हे सिद्ध होते.

  • घटनेने निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना संरक्षण दिले आहे. त्यांना पदावरून दूर करण्यासाठी 'महाभियोग' चालवावा लागतो.

भूतानने चीनला तोंडावर आपटलं : डोकलाम आमचा भाग आहे
  • भारत आणि चीन यांच्यात वादाचं केंद्र असलेला डोकलाम भागावरुन भूतानने चीनला तोंडावर पाडलं आहे, डोकलाम हा तुमचा नाही तर आमचा भाग आहे, असं भूतानने म्हटलं आहे.

  • चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काही दिवसापूर्वी डोकलाम हा आपलाच भाग असून, भूताननंही मान्य केल्याचा दावा केला असून त्यानंतर आज भूताननं चीनला हे प्रत्युत्तर दिलं आहे.

  • भूतानने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, १६ जून २०१७ रोजी चीनी सैन्याने डोकलाम भागात रस्त्याचं काम सुरु केलं आहे, मात्र चीनकडून १९८८ आणि १९९८ च्या सीमासुरक्षा कराराचं उल्लंघन होत आहे.

  • चीननं या भागात रस्ता निर्मिती करणं हे १९८८ आणि १९९८ च्या कराराचं उल्लंघन असल्याचंही भूतानने म्हटलं आहे, गेल्या काही दिवसात डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. 

प्रज्ञा पाटील यांच्या विक्रमामुळे पंतप्रधानही चकीत : योगासनांचे शिक्षण
  • अविरत योगासने करून जागतिक विक्रम करण्याची संकल्पना कशी सुचवली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गुजरातची मुलगी असूनही पाटील आडनाव कसे.. असे प्रश्न पडले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना.

  • सलग १०३ योगासने करत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणाऱ्या प्रज्ञा पाटील यांनी नुकतीच पंतप्रधानांची दिल्लीत भेट घेतली असून मूळच्या गुजरातच्या असणाऱ्या पाटील यांच्याशी जवळपास पंधरा मिनिटे पंतप्रधानांनी गुजराथी भाषेतून संवाद साधला.

  • तब्बल १०३ तास साधारणत: २५ योगासनांचा अविरत परिपाठ करत योग प्रशिक्षिका तथा उद्योजिका प्रज्ञा पाटील यांनी नव्या विश्व विक्रमाची नोंद केली असून या यशानंतर अलिकडेच त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली.

  • प्रज्ञा पाटील या मूळच्या गुजरातच्या. अहमदाबादमध्ये त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाले. यामुळे उभयतांमध्ये संपूर्ण संवाद गुजराथीमधूनच झाला.

  • अविरत योगासनांद्वारे विश्वविक्रमाची संकल्पना कशी सुचली, याबद्दल पंतप्रधानांनी माहिती जाणून घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. शिक्षण कुठे व कसे झाले, योगासनांचे शिक्षण व मार्गदर्शक कोण याविषयीची माहिती देखील त्यांनी घेतली.

लढाऊ जॅग्वार भारतीय वायुदलाची ताकद :
  • जॅग्वार या विमानात पहिल्यांदाच अत्याधुनिका एईएसए रडार असणार आहे, या रडारमुळे शत्रूच्या ठिकाणांची अचूक माहिती मिळण्यास मदत होते आणि ते उद्ध्वस्त करायलाही मदत होणार आहे.

  • हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएल या कंपनीने जॅग्वार या लढाऊ विमानाची निर्मिती करत त्यात आधुनिक रडार तंत्रज्ञान वापरले आहे.

  • 'जॅग्वार ड्रेन थ्री'ची निर्मिती एचएल कंपनीने भारतीय वायूदलासाठी करण्यात आली आहे. एकाच वेळी अनेक ठिकाण शोधण्यासाठी नव्या रडार तंत्रज्ञानाची मदत होणार आहे.

  • 'इंटरलिव्ड मोड ऑफ ऑपरेशन', 'हाय अॅक्युरसी अँड रेझ्युलेशन' अशा अनेक प्रणाली या विमानात विकसित करण्यात आल्या आहेत.

  • एचएल आणि इस्त्रायलमधल्या एका फर्मच्या मदतीने रडार तयार करून ते या विमानात बसवण्यात आले आहेत. या रडारमुळे हे लढाऊ विमान एकाच वेळी अनेक लक्ष्य भेदू शकते.

हार्दिक पांड्या भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होऊ शकतो : कपील देव
  • भारतीय संघाचे माजी कर्णधार कपील देव यांनी टीम इंडियाचा हरहुन्नरी खेळाडू हार्दिक पांड्याच्या खेळाचं कौतुक केलं आहे. “आगामी काळात पांड्या भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनू शकतो.

  • यासाठी त्याला सतत सर्वोत्तम कामगिरी करत राहण्याची गरज आहे, ” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत कपिल देव यांनी आपलं मत मांडलं, गेल्या वर्षभरात आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्याने बजावलेली कामगिरी हा सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय बनलेली आहे.

  • भारतामधल्या हजारो खेळाडूंप्रमाणे पांड्याने आयपीएलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने संघाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. 

  • गेल्या काही दिवसात भारताच्या जलदगती गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीबद्दल कपील देव यांना विचारलं असता, “सध्या भारत आपल्या जलदगती गोलंदाजांवर अवलंबून आहे.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • -

जन्म, वाढदिवस

  • विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ : १२ ऑगस्ट १९१९

  • ग्यानेंद्र पांडे, भारतीय क्रिकेट खेळाडू : १२ ऑगस्ट १९७२

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • जॉर्ज स्टीफनसन्स, वाफेवर चालणार्‍या रेल्वेचा शोध : १२ ऑगस्ट १८४८

  • दयानंद बांदोडकर, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री : १२ ऑगस्ट १९७३

ठळक घटना

  • मुंबई मध्ये मग्रुर रिक्षा टॅक्सी चालकांना आवर घालण्या साठी जागरुक प्रवाशांनी स्वयंस्फूर्तीने 'मीटर जॅम' आंदोलन पुकारले : १२ ऑगस्ट २०१०

  • सर्वप्रथम फोर्ड मॉडेल टी कार तयार झाली : १२ ऑगस्ट १९०८

  • आय.बी.एम.ने पहिला वैयक्तिक संगणक विकायला काढला : १२ ऑगस्ट १९८१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.