चालू घडामोडी - १३ ऑगस्ट २०१७

Date : 13 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
स्मार्ट सिटीची बैठक लांबणीवर : श्रावण हर्डीकर
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराच्या विकासासाठी देश पातळीवरील शंभर शहरांचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार स्पर्धाही घेण्यात आली.

  • अध्यक्षांना वेळ नसल्याने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची पहिली सभा लांबणीवर पडली, लवकरच कंपनीची सभा होणार असून नवीन सदस्यांना सामावून घेणे, कंपनी सचिव नियुक्त करणे, कंपनी सील, पॅनसिटी आणि एरिया बेस प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्तीचा विषय यांवर चर्चा होणार आहे.

  • गुणवत्ता असतानाही स्मार्ट सिटीत समावेश झाला नव्हता. त्यामुळे पहिल्या आणि दुसºया यादीत शहरावर अन्याय झाला होता.

  •  पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पिंपरी-चिंचवडचा समावेश करू, असे आश्वासन दिले होते, महापालिका निवडणुकीनंतर या संदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्यास मंंजुरी मिळाली.

  • त्यानंतर एसपीव्हीची स्थापना करण्यात आली. तसेच प्रशासनाने पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलपमेंटचे नियोजन करण्यात आले. कंपनी स्थापनेनंतर पहिली बैठक, सभा महापालिकेतील मुख्य भवनात सभा शनिवारी सकाळी ११ला होणार होती.

  • या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर असणार होते. तसेच या बैठकीस संचालक मंडळातील सदस्य उपस्थित राहणार होते.

शरद यादवना केले नेतेपदावरून दूर : नितीशकुमारांचा निर्णय 
  • जेडीयूच्या राज्यसभेतील गटनेतेपदावरून शरद यादव यांना काढून त्यांच्या जागी आर. सी. पी. सिंग यांची निवड केली आहे, यादव यांना दूर करून, पक्षाने सत्ताधारी रालोआसोबत जाण्याचे जणू नक्की केले आहे.

  • भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी नितीशकुमार यांना तसे आवाहनच केले होते, अन्सारी यांची हकालपट्टी

  • जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या १९ आॅगस्टच्या बैठकीत तसा निर्णय अपेक्षित आहे.

  • दुसरीकडे विरोधी पक्षांच्या शुक्रवारच्या बैठकीला हजेरी लावल्यामुळे खासदार अली अन्वर अन्सारी यांचीही पक्षाने हकालपट्टी केली आहे.

  • शरद यादव हे सध्या बिहारच्या दौºयावर असून, खरा पक्ष आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नितीशकुमार यांच्याकडे फक्त ‘सरकारी जेडीयू’ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

डावखु-या प्रतिभावंतांचे गोव्यात संग्रहालय : १३ आॅगस्ट
  • आज १३ आॅगस्ट... आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन. याचे औचित्य साधून लोटली येथील बिग फूट म्युझियममध्ये उभारलेल्या जगभरातील डावखु-या प्रतिभावंतांच्या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे.

  • सध्या या संग्रहालयात २१ प्रज्ञावंतांचे मेणाचे पुतळे बसविण्यात आले आहेत, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते संग्रहालयाचे उद्घाटन होईल.

  • इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबच्या नवीन अ‍ॅपचेही लाँचिंग होणार असल्याची माहिती इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबचे संदीप विष्णोई यांनी शनिवारी दिली असून जागतिक मान्यता मिळालेल्या १०० डावखुºया व्यक्तींचे पुतळे टप्प्याटप्प्याने संग्रहालयात ठेवले जाणार आहेत.

  • संग्रहालयाची माहिती प्रिन्स चार्ल्स, बिल गेट्स, लक्ष्मी मित्तल, अँजेलिना ज्योली, ज्युलिया रॉबटर््स व इतर मान्यवरांना दिलेली असून, भविष्यात ते संग्रहालयाला भेट देणार असल्याचे विष्णोई म्हणाले.

  • महात्मा गांधी ते नरेंद्र मोदी...अचाट गुणवत्तेने जगभरात नावलौकिक मिळविलेल्या डावखुºया व्यक्ती सर्वांच्या परिचयाच्या आहेत, पण ते ‘डावखुरे’ असल्याची माहिती सर्वांना असेलच, असे नाही.

धमक्यांचे परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प
  • उत्तर कोरियाच्या धमक्यांमुळे संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिणाम भोगायला तयार राहा, असे उत्तर कोरियाचे लष्करशहा किम जोंग उन यांना सुनावले आहे, तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

  • युद्धाच्या शक्यतेमुळे उत्तर कोरियातील तब्बल ३५ लाख लोकांनी सैन्यात दाखल होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त तेथील सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे.

  • उत्तर कोरियातील लष्करात सध्या सव्वा लाख जवान असून, पावणे आठ लाख लोकांचे राखीव दलही त्या देशाकडे आहे, मात्र क्षेपणास्त्रांच्या आधारे युद्ध करण्याची भाषा असल्याने एवढ्या मोठ्या सैन्याची गरज काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

  • गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये शाब्दिक रोज चकमकी सुरू आहेत. किम जोंग-उनने अशाच धमक्या देणे सुरू ठेवल्यास विनाशकारी हल्ल्याला उत्तर कोरियाला सामोरे जावे लागेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीही म्हटले होते.

पंतप्रधानांनी योगी सरकारकडून अहवाल मागवला : गोरखपूर दुर्घटना
  • आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेलही गोरखपूर रूग्णालयाचा दौरा करणार गोरखपूरच्या बाबा राघव दास रूग्णालयांच्या मृत्यू प्रकरणी आता योगी आदित्यनाथ सरकारनं अहवाल द्यावा असं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे.

  • तसंच या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लक्ष असल्याचंही पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट केलं आहे, आत्तापर्यंत गोरखपूरच्या रूग्णालयात सुमारे ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • उत्तर प्रदेशात १९७८ पासून मेंदूज्वराची समस्या आहे. येथील लहान मुलांच्या अकाली मृत्यूला कोण जबाबदार असेल तर, ती अस्वच्छता आहे, उघड्यावर मलविसर्जन करण्याची सवय आहे, मेंदूज्वर एक मोठे संकट आहे.

  • आपल्यासाठी हे खूप मोठे आव्हान असून आपल्याला त्यावर मात करायची आहे, मात्र, त्यासाठी सरकारला दोष देऊन चालणार नाही. सरकार ही कधीच समस्या असून शकत नाही. 

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • -

जन्म, वाढदिवस

  • त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी, मराठी कवी : १३ ऑगस्ट १८९०

  • विश्राम बेडेकर, मराठी साहित्यिक : १३ ऑगस्ट १८९८

  • पंडित काशिनाथशास्त्री जोशी, भागवत अभ्यासक, प्रवचनकार : १३ ऑगस्ट १९२३

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • अहल्याबाई होळकर : १३ ऑगस्ट १७९५

  • लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचे निधन. 'प्रथमपुरुषी एकवचनी' हे त्यांचे आत्मचरित्र. 'रक्त आणि अश्रू' हा लेखसंग्रह, 'विषकन्या', 'स्वामीनी', 'महाराणी पह्यिमी' ही त्यांची नाटके गाजली : १३ ऑगस्ट १९८०

  • दिग्दर्शक गजानन जागीरदार यांचे निधन. पुण्याच्या चित्रपट आणि दूरदर्शन प्रशिक्षण संस्थेचे ते पहिले प्राचार्य होते : १३ ऑगस्ट १९८८

ठळक घटना

  • के. के. बिर्ला या उद्योगपतीस कांचीपूरम येथे विद्यासेवारत्न सन्मान प्रदान केला गेला : १३ ऑगस्ट २००२

  • ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि आधुनिक भारतीय साहित्य क्षेत्रातील एक उत्तूंग व्यक्तिमत्व प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर : १३ ऑगस्ट १९९१

  • नागपूरमध्ये संतापलेल्या स्त्रियांनी अक्कू यादव या गुंडाला न्यायालयाच्या आवारात घेरुन ठार मारले : १३ ऑगस्ट २००४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.