चालू घडामोडी - १३ जुलै २०१७

Date : 14 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्षांना कारावास :
  • ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष लुइस इनासिओ लुला दा सिल्वा यांना भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाने बुधवारी नऊ वर्षं सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

  • पेट्रोब्रास कंपनीकडून लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. दरम्यान, न्यायालयाने त्यांना निर्णयाविरुद्ध अपील करण्यास मुभा दिली आहे.

  • लुला दा सिल्वा हे सत्तेवरुन सहा वर्षापूर्वी पायउतार झाले असून सामाजिक परिवर्तनवादी नेता अशी त्यांनी जागतिक पातळीवर प्रशंसा मिळवली आहे.

  • तर गेल्या वर्षीसुद्धा ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षा डिल्मा रोसेफ (६८) यांना पदावरून हटविण्यात आले होते. राष्ट्रीय अर्थसंकल्पात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता.

अनुराग म्हामल भारताचा ४८ वा ग्रॅण्डमास्टर :
  • बुद्धिबळातील सर्वोच्च किताब असलेल्या 'ग्रॅण्डमास्टर'चा मान अपेक्षितपणे अनुराग म्हामल याने पटकाविला.

  • ग्रॅण्डमास्टर किताब मिळवणारा अनुराग हा पहिला गोमंतकीय खेळाडू ठरला. भारताचा तो ४८ वा ग्रॅण्डमास्टर आहे.

  • अनुराग सध्या स्पेन येथे व्या बेनास्क्वे आंतरराष्ट्रीय ओपन स्पर्धेत खेळत आहे. त्याने पाच फेऱ्यांत ४.४ एलो गुण मिळवले आणि २५०० रेटिंगचा टप्पा गाठला. या कामगिरीनंतर अनुरागने 'ग्रॅण्डमास्टर' किताबाला गवसणी घातली.

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर :
  • जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत २०१७-१८ चा १६८ कोटी ७० लाख रुपयांचा अर्थसंकल्प अवलोकनार्थ ठेवण्यात आला होता. या अर्थसंकल्पात ४२ विषय मांडण्यात आले होते.

  • तसेच त्यापैकी महिला व बाल कल्याण समितीचे विषय वगळता अन्य सर्व विषयांमध्ये किरकोळ दुरुस्त्या सुचवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला.

  • जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची ही दुसरी सर्वसाधारण सभा होती सदस्य निवडून येऊन तब्बल चार महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर त्यांना अर्थसंकल्प कसा असतो, हे पहिल्यांदा अनुभवायला मिळाले.

पनामागेट प्रकरण : नवाज शरीफांची खुर्ची गेल्यास यांच्याकडे पंतप्रधानपद?
  • देशदेशातील बड्या व्यक्तींची अवैध संपत्ती उघड करणारा पनामा पेपर गेटप्रकरणी कुटुंबीयांसहीत अडचणीत आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची खुर्ची जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • या पार्श्वभूमीवर  पाकिस्तानमधील राजकारणात त्यांच्या उत्तराधिका-यासंदर्भात जोरदार चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे.    

  • मंगळवारी संयुक्त तपास पथकाकडून सुप्रीम कोर्टात सोपवण्यात आलेल्या अहवालानंतर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंजाबचे मुख्यमंत्री व त्याचे भाऊ शहबाज शरीफ यांना बैठकीसाठी बोलावले होते.

  • या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये शहबाज शरीफ यांच्या व्यतिरिक्त शरीफ यांचा पक्ष ''पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज''मधील कित्येक मोठे नेतेही उपस्थित होते. 

धावांच्या एव्हरेस्टवर मिताली ‘राज’! 
  • भारताची स्टार फलंदाज मिताली राज हिने महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदून ६००० धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू बनली.

  • आयसीसी महिला विश्वचषकात आॅस्ट्रेलियाविरुद्ध साखळी फेरीतील सामन्यात ३४ धावा करताच मिताली राज हिने धावांचा ‘एव्हरेस्ट’ सर केला.

  • ६ हजार धावा पूर्ण करण्यासाठी तिला ४१ धावांची आवश्यकता होती. लेग स्पिनर क्रिस्टीन बिम्सच्या चेंडूवर षटकार ठोकत तिने विश्वविक्रमही नोंदवला.

  • तिने इंग्लंडची माजी कर्णधार चार्लाेट एडवर्ड्सचा विक्रम मोडला. एडवर्ड्सने १९१ सामन्यांत ५९९२ धावा केल्या असून जून १९९९ मध्ये पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय कर्णधार मिताली राजचा १८३ वा एकदिवसीय सामना होता. 

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती : १३ जुलै १९०४

  • उत्पल चटर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू : १३ जुलै १९६४

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • निळू फुले मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते : १३ जुलै २००९

  • बाजीप्रभू देशपांडे : १३ जुलै १६६०

ठळक घटना

  • इस्रायेलने बैरुत विमानतळावर हल्ला चढवला : १३ जुलै २००६

  • न्यू यॉर्कमधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालुट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ : १३ जुलै १९७७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.