चालू घडामोडी - १४ जून २०१७

Date : 14 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सरकार ‘एफटीआयआय’सह देशातील ४२ स्वायत्त संस्थांचा ‘मेकओव्हर’ करण्याच्या तयारीत :
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) या संस्थेचे दिल्लीच्या जेएनयू किंवा जामिया इस्लामिया मिलिया विद्यापीठात विलीनकरण होऊ शकते.

  • केंद्र सरकारकडून देशातील ४२ स्वायत्त संस्थांसंदर्भात लवकरच निर्णायक पाऊल उचललेले जाण्याची शक्यता असून, यामध्ये राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय), सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था आणि दिल्ली सार्वजनिक वाचनालय यासारख्या देशातील महत्त्वपूर्ण संस्थांचा समावेश आहे.

  • सध्या नीती आयोग आणि पंतप्रधान कार्यालयाकडून देशातील ६७९ स्वायत्त संस्थांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारमधील विविध खात्यांच्या अखत्यारित येणाऱ्या ११४ स्वायत्त संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

  • ११४ पैकी ४२ स्वायत्त संस्थांमध्ये मोठे फेरबदल करण्याची गरज नीती आयोगाने व्यक्त केली. 

आयसीसी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये कोहली प्रथम स्थानावर :
  • दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए.बी. डिव्हिलियर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांना मागे टाकत कोहली अव्वल स्थानावर पोहोचला.

  • चॅम्पियन्स ट्रॉफीत साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

  • टीम रॅकिंगमध्ये द. आफ्रिका पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानार तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

  • तसेच या रॅंकिंगमध्ये विराट कोहलीच्या नावे ८६२ अंक आहेत, तर दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या वॉर्नरच्या नावावर ८६१ गुण आहेत. एबीडीच्या नावावर ८४७ गुण आहेत.

टाटा मोटर्सच्या वाहन विभागाच्या प्रमुखपदी गिरीश वाघ :
  • टाटा मोटर्स एका महत्वाच्या परिवर्तनाच्या टप्प्यावर असताना पीसारोडी यांची एक्झिट आणि गिरीश वाघ यांची नियुक्ती झाली आहे.

  • भारतातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन विभागाच्या प्रमुखपदी गिरीश वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच ते कार्यकारी समितीचे सदस्यही असतील.

  • रवींद्र पिसारोडी यांनी टाटा मोटर्सच्या कार्यकारी संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर आठवडयाभराने गिरीश वाघ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

  • अधिक परिणामकारक पद्धतीने काम करण्यासाठी कंपनीमध्ये अंतर्गत पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले असून, १४०० लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे तर, अनेकांच्या जबाबदा-या बदलण्यात आल्या आहेत.

राजू नायक यांना आचार्य अत्रे पत्रकार पुरस्कार प्रदान :
  • आचार्य अत्रे यांच्या ४८ व्या स्मृतिदिनानिमित्त सासवड येथे अत्रे प्रतिष्ठान व साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या वतीने नायक यांना आचार्य अत्रे पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी सत्काराला उत्तर देताना नायक बोलत होते.

  • आचार्य अत्रे हे पत्रकारितेतील उतुंग व्यक्तिमत्व होते. आजही पत्रकारिता सुरु करताना पत्रकार त्यांचा आदर्श पुढे ठेवला जातो. त्यांचाच घेतलेला वसा आम्ही खाली ठेवणार नाही, असे प्रतिपादन 'लोकमत'च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनी केले.

  • तसेच या कार्यक्रमात कवी अनिल कांबळे याना आचार्य अत्रे साहित्यिक पुरस्कार व बंडा जोशी यांना आचार्य अत्रे कलाकार पुरस्काराने गौरविण्यात आले.

  • अत्रे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जयसाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

माल्ल्याचा पुन्हा उद्दामपणा, मी पैसे परत करणार, स्वप्न बघा 
  • भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून फरार झालेल्या विजय माल्ल्याच्या प्रत्यर्पण खटल्याची सुनावणी डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली गेली आहे.

  • कदाचित पुढच्यावर्षी पर्यंत ही सुनावणी लांबणीवर पडू शकते. भारत सरकारकडून पुरावे सादर होऊ न शकल्याने या महत्वाच्या प्रत्यर्पण खटल्याची सुनावणी लांबणीवर पडली आहे.

  • मध्य लंडनमधील वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात कोर्ट रूम क्र. ३ मध्ये चीफ मॅजिस्ट्रेट एम्मा लाऊझी ऑर्बथनॉट यांनी सुनावणीसाठी 4 डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे. 

  • भारताच्यावतीने खटला लढवणारे वकिल एरॉन वॅटकीन्स यांनी भारताकडून पुरावे मिळायला आणखी तीन ते चार आठवडयांचा कालावधी लागेल असे न्यायालयाला सांगितले. 

८०० शहरांमध्ये पासपोर्ट सुविधा केंद्र सुरू होणार :
  • येत्या दोन वर्षांत ८०० शहरांमध्ये पासपोर्ट सुविधा केंद्र सुरू होणार आहे. जिल्हा मुख्यालयाच्या मुख्य पोस्ट ऑफिस (जीपीओ) मध्ये ती असतील, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी दिली.

  • अर्थमंत्री अरुण जेटलींनी अर्थसंकल्पात या आशयाची घोषणा केली होती. त्याला अनुसरून यावर्षी १५० टपाल कार्यालयांत ही केंद्रे सुरू होत आहेत, असे नमूद करून राज्यमंत्री सिंग म्हणाले की दोन वर्षांत ही संख्या ८०० वर जाईल.

  • सध्या पासपोर्ट मिळवण्यासाठी दूर अंतरावरच्या पासपोर्ट कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागतात आता ते टळेल. दुर्गम भागातल्या लोकांनाही फार तर जिल्हा मुख्यालयापर्यंतच यावे लागेल.

  • पासपोर्टचे अर्ज स्वीकारण्यापासून त्याच्या कायदेशीर छाननीनंतर नागरीकांना तिथेच पासपोर्ट देण्याचे काम ही केंद्रे करणार आहेत. पासपोर्ट मंजूर करण्याचे काम यापुढे परराष्ट्र व्यवहार व डाक विभाग करणार आहे.

इंग्लंड-पाकिस्तान सामन्याला ३८ टक्के भारतीय प्रेक्षक ! 
  • आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सेमीफायनल बुधवारी कार्डीफच्या मैदानावर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे.

  • पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र या सामन्याचे 38 टक्के तिकिटं भारतीय प्रेक्षकांनी खरेदी केली आहेत.

  • पहिल्या सेमीफायनलचे सर्व तिकिटं अगोदरच बूक करण्यात आली आहेत. यापैकी एक तृतीयांश तिकिटं भारतीय प्रेक्षकांनी खरेदी केली आहेत, अशी माहिती गलीमोरगन क्रिकेट क्लबच्या (जीसीसी) अधिकाऱ्याने दिली आहे.

  • जीसीसीला या सामन्याचं आयोजन करण्यास सांगितलं तेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीत कोणता संघ सहभाग घेणार आहे, मात्र दोन महिन्यांपूर्वीच या सामन्याची सर्व तिकिटं बूक झाली आहेत आणि यामध्ये 38 टक्के भारतीय प्रेक्षक आहेत, अशी माहिती जीसीसीचे अधिकारी हेयो मॉरिस यांनी दिली.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक रक्तदाता दिन

जन्म, वाढदिवस

  • कार्ल लॅण्डस्टेनर, रक्तगटांचे संशोधक : १४ जून १८६८

  • स्टेफी ग्राफ, प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू : १४ जून १९६९

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • गोविंद बल्लाळ देवल, जुन्या काळातील प्रसिद्ध नाटककार : १४ जून १९१६

  • सुहासिनी मुळगावकर, मराठी अभिनेत्री व संस्कृत पंडित : १४ जून १९८९

ठळक घटना

  • अमेरिकेने स्टार्स अँड स्ट्राइप्सचा आपला ध्वज म्हणून स्वीकार केला : १४ जून १७७७

  • फॉर्म्युला वन कार या स्पर्धेमध्ये कार चालवणारा नरेन कार्तिकेयन हा पहिला भारतीय ठरला : १४ जून २००१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.