चालू घडामोडी - १५ ऑगस्ट २०१७

Date : 15 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लालकिल्ल्यावर ध्वजारोहण :
  • देशभरात आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असून भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्ष पूर्ण होत आहेत, सकाळी ७.३० वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लालकिल्ल्यावर ध्वजारोहण झालं.

  • न्यू इंडियामध्ये गरिबीला कोणतेही स्थान नसेल असं प्रतिपादन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना केलं आहे, रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती म्हणून पहिल्यांदाच देशाला संबोधित केलं आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन  सलग चौथ्यांदा देशवासियांनी संबोधित केले.  

  • देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या या शुभप्रसंगी देशवासिायंना कोटी-कोटी शुभेच्छा. संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचाही उत्सव साजरा करत आहे, सुदर्शन चक्राधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे.  

राज्यातील ५६ जणांना राष्ट्रपती पोलीस पदक :
  • पोलीस दलात गुणवत्तापूर्ण, उल्लेखनीय व शौर्यपूर्ण कामगिरी बजाविल्याबाबत राज्य पोलीस दलातील ५६ अधिकारी-अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस पदक व शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.

  • नागपूर परिमंडळाचे विशेष महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, मुंबई गुन्हा अन्वेषण विभागातील अपर आयुक्त के.एम. प्रसन्ना, उपायुक्त निसार तांबोळी, दिलीप सावंत, एसीबीचे उपमहानिरीक्षक केशव पाटील आदींचा त्यामध्ये समावेश आहे.

  • स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह विभागाकडून यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

  • गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस नाईक दोगू अत्राम व कॉन्स्टेबल स्वरूप अमृतकर यांना मरणोत्तर पोलीस शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

  • त्यांच्याशिवाय यवतमाळ जिल्ह्याचे पोलीसप्रमुख एम. राजकुमार, साहाय्यक निरीक्षक नितीन माने, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, प्रफुल्ल कदम, विजय रत्नपारखी, हवालदार मोतीराम मडावी, मल्लेश केडमवार, नाईक जितेंद्र मारगये, गजेंद्र सौजल (सर्व गडचिरोली) व उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे (अहमदनगर) यांना शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : 
  • एप्रिल ते ५ ऑगस्ट २०१७ पर्यंत  ५६ लाख नवीन लोकांना कर परतावा दाखल केला असून वर्षभरापूर्वी ही संख्या २२ लाख एवढी होती, कधीच आयकर भरला नव्हता अशा १ लाख लोकांनी कर भरला. तीन वर्षात सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा बाहेर काढला.

  • १९४२-१९४७ दरम्यान देशानं सामूहिक शक्ती प्रदर्शन केले. पुढील 5 वर्ष याच सामूहिक शक्ती बांधिलकी व मेहनतीसोबत देशाला पुढे न्यायचे आहे.  

  • टीम इंडियाच्या न्यू इंडिया संकल्पाची हीच योग्य वेळ आहे. आपण सर्वांना मिळून असे भारत घडवायचा आहे की जेथे गरीबांकडे घर, वीज आणि पाणी उपलब्ध असेल, एक असा भारत घडवू जेथे देशातील शेतकरी चिंतेची नाहीतर शांततेची झोप घेईल. 

  • भारत छोडो आंदोलनाचे हे ७५ वे वर्ष आहे. बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली होती त्याचेही यंदा १२५ वे वर्ष आहे.

  • २१ व्या शतकात जन्म घेणाऱ्यांसाठी २०१८ हे वर्ष निर्णायक असेल. युवकांनो देशाच्या विकासात योगदान द्या, देश तुम्हाला निमंत्रित करतोय. चालतंय, चालू द्या, हा जमाना गेला, आता बदल होतोय, बदलत आहेचा जमाना आला आहे. 

  • आपण ९ महिन्यात मंगळावर यान पाठवतो, पण ४२ वर्षांपासून एक प्रकल्प अडकलेला होता, केंद्र सरकारानं प्रकल्पांची अंमलबजावणी व्हावी यावर लक्ष केंद्रीत केले आहे. सरकारच्या कोणत्याही योजनेस विलंब होतो तेव्हा सर्वाधिक नुकसान गरीब परिवारांचं होते. 

न्यू इंडिया निर्माण करू : राष्ट्रपती रामनाथ कोविंद
  • स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यू इंडियाचे चित्र देशासमोर उभे केले, या न्यू इंडियामध्ये सर्वजण सुखी राहावेत, न्यू इंडिया सर्वांच्या डीएनएमध्ये वसला पाहिजे. 

  • देशाचे १५ वे राष्ट्रपती म्हणून नुकतीच शपथ घेतलेल्या कोविंद यांनी प्रथमच देशवासियांना संबोधित केले, या वेळी स्वातंत्रसैनिकांनी देशासाठी केलेला त्याग, देशाची होत असलेली प्रगती आणि सरकारच्या निर्णयांना जनतेकडून होत असलेले सहकार्य यांचा उल्लेख करतानाच त्यांनी वेगाने आकार घेत असलेल्या न्यू इंडियाचा ठळकपणे उल्लेख केला.

  • स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानालाही त्यांनी उजाळा दिला. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचाही विशेष उल्लेख केला.

  • तसेच राजकीय लक्ष्य प्राप्त करणे हा या व्यक्तींचा उद्देश नव्हता, असे ते म्हणाले. सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

नोटाबंदीनंतर ३ लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट उद्ध्वस्त : पंतप्रधान मोदी
  • नोटाबंदीनंतर देशातील ३ लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट उद्ध्वस्त केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन बोलताना सांगितलं. देशाच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित केलं. 

  • पंतप्रधान म्हणाले की, ”गेल्या तीन वर्षात सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा बाहेर काढला. यात १ लाख लोकांनी करचुकवेगिरी करुन हा पैसा दडवला होता, तसेच नोटाबंदीमुळे ३ लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले.”

  • नोटाबंदीबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ”नोटाबंदीनंतर जी माहिती संकलित झाली. त्यावरुन असं समजलं की, देशातील ३ लाख कंपन्या अशा आहेत.

  • ज्यांचा काळा बाजार, हवाला रॅकेट आदीच्या माध्यमातून लाखोंचे आर्थिक व्यवहार सुरु आहेत. आतापर्यंत अशा पावणे दोनलाख कंपन्यांना सरकारनं टाळं ठोकलं आहे.”

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : भारत, कॉँगो, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया.

  • सेना दिन : पोलंड.

जन्म, वाढदिवस

  • भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक : १५ ऑगस्ट १९१३

  • श्री ऑरोबिंदो (योगी अरविंद), भारतीय तत्त्वज्ञानी : १५ ऑगस्ट १८७२

  • विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू : १५ ऑगस्ट १९७५

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री : १५ ऑगस्ट २००४

  • शेख मुजिबुर रहमान, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष : १५ ऑगस्ट १९७५

ठळक घटना

  • भारतामध्ये दूरदर्शनचे रंगीत प्रक्षेपण सुरु झाले : १५ ऑगस्ट १९८२

  • भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य : १५ ऑगस्ट १९४७

  • पनामा कालव्यातून पहिले जहाज पार झाले : १५ ऑगस्ट १९१४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.