चालू घडामोडी - १७ ऑगस्ट २०१७

Date : 17 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जागतिक स्पर्धेला जाण्यापासून रोखले होते : दविंदरसिंग कांग
  • भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) जागतिक स्पर्धेत मला जाण्यापासून रोखले होते, असे दविंदरने म्हटले आहे.

  • लंडन येथे नुकत्याच झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करून ऐतिहासिक कामगिरीची नोंद करणाऱ्या भारतीय दविंदरसिंग कांगने बुधवारी धक्कादायक माहिती दिली. 

  • दविंदरवर उत्तेजक सेवन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता पण दुसरीकडे देशाची नाचक्की होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले

  • त्याच्या शरीररामध्ये सापडलेले उत्तेजक हे खेळासाठी घातक नसल्याचे निष्पन्न झाले होते. उत्तेजकाचा ठपका ठेवल्यामुळे दविंदरला जागतिक स्पर्धेत न पाठवण्यासाठी एएफआय प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात होते, पण एएफआयने हा दावा फेटाळून लावला.

  • जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्रावर भारतीयांच्या आशा असताना दविंदरने अविश्वसनीय कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. 

राष्ट्रपतिपदक जाहीर श्री. प्रतापसिंह पाटणकर यांना :
  • श्री. पाटणकर यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण तडवळे संमत कोरेगाव, तर महाविद्यालयीन शिक्षण कोरेगाव येथील डी.पी. भोसले महाविद्यालयात झाले.

  • मूळचे तडवळे संमत कोरेगाव (ता. कोरेगाव) येथील रहिवाशी व सध्या नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे.

  • पुढील शिक्षण पुण्यात झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या परीक्षेतून १९८४ मध्ये श्री. पाटणकर यांची पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली.

  • नंदुरबार, अहेरी व नवी मुंबई येथे त्यांनी या पदावर सेवा केली, १९९७ मध्ये त्यांची पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती झाली.

  • पोलिस अधीक्षकपदी हिंगोली, सिंधुदुर्ग, पुणे रेल्वे, समोदशक रा.रा.पो.बल गट क्रमांक ११ नवी मुंबई, पोलिस उपायुक्त झोन ३ नागपूर २०१७ मध्ये पदोन्नती झाल्याने अपर पोलिस आयुक्त ठाणे शहर, नागपूर शहर व जानेवारी २०१७ पासून नागपूर परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकपदावर आजपर्यंत कार्यरत आहेत.

स्वातंत्र्यदिनी मोदींनी नेहमीच्या गाडीऐवजी ‘या’ : लॅंड रोवर
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेहमीच्या वापरातील कार बीएमडब्ल्यूची ७ सिरीज आहे, मात्र १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी लाल किल्ल्यावर जाताना मोदींनी ही नेहमीची कार वापरली नाही.

  • पण त्यांनी अचानक आपली गाडी बदलल्याने अनेकांना आश्चर्यही वाटले, मग नेमक्या कोणत्या गाडीने ते लाल किल्ल्यावर पोहोचले याबाबत सगळ्यांच्याच मनात उत्सुकता आहे. 

  • मंगळवारी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मोदी काळ्या रंगाच्या लॅंड रोवर कंपनीच्या रेंज रोवर कारने लाल किल्ल्यावर गेले, या मॉडेलचे नाव 2010 Range Rover HSE असून मूळची जर्मन कंपनी असलेल्या या कारची वैशिष्टे जाणून घेऊयात

  • कारमध्ये ५ लीटरचे व्ही८ हे इंजिन आहे, या वाहनाची क्षमता ३७५ ब्रेक हॉर्स पॉवर (बीएचपी) इतकी असून यामध्ये ६ वेगवान ऑटोमॅटीक ट्रान्समीशन यंत्रणा देण्यात आली आहे. ही गाडी ० ते ९६ किलोमीटर प्रति तास इतका वेग केवळ ७.२ सेकंदांमध्ये पार करते.

  • सुरक्षेच्या दृष्टीनेही ही गाडी अतिशय चांगली असून त्यामध्ये रडार बेस अॅडॅप्टीव्ह क्रूज कंट्रोल, ऑप्शनल सराऊंड कॅमेरा सिस्टीम देण्यात आली आहे. यामुळे गाडीचा चालक गाडीच्या चारही बाजूचे पाहू शकतो.

सुधारित नियमानुसार 'शांतता क्षेत्र' जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारला :
  • सुधारित नियमानुसार 'शांतता क्षेत्र' जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारला देण्यात आला आहे, असे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाला सांगितले.

  • राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने ध्वनिप्रदूषणाच्या नियमांत सुधारणा केल्याने 'शांतता क्षेत्र' घोषित करण्याचा अधिकार सरकारला मिळाल्याची माहिती सरकारने उच्च न्यायालयाला दिली.

  • नियमांत सुधारणा केल्याने जो परिसर राज्य सरकार 'शांतता क्षेत्र' म्हणून अधिसूचित करेल त्याच परिसराला 'शांतता क्षेत्र' म्हणून गणण्यात येईल, असे सरकारने न्यायालयात स्पष्ट केले.

  • उत्सव काळात ध्वनिक्षेपक रात्री १० ऐवजी मध्यरात्रीपर्यंत वापरण्याची सवलत देण्याची तरतूद या नियमांत आहे. केंद्र सरकारची अधिसूचना १० ऑगस्टपासून अमलात आली. मात्र, सरकारने अद्याप राज्यातील एकही ठिकाण 'शांतता क्षेत्र' म्हणून जाहीर केलेले ना

  • सवलत वर्षभरातील केवळ १५ दिवसच दिली जाऊ शकते, हे १५ दिवस ठरविण्याचा अधिकार सरकारला आहे; परंतु सुधारित नियमांनुसार सवलतीचे १५ दिवस ठरविण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी : महेश जाधव
  • कोल्हापूरसह सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या देवस्थान समितीचे अध्यक्षपद २०१० पासून रिक्त होते, त्याशिवाय समितीचे खजीनीसपदही रिक्त होते, तोपर्यंत या पदावर ऍड. गुलाबराव घोरपडे कार्यरत होते.

  • गेली काही वर्षे रेंगाळलेल्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांची तर खजानिसपदी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर यांची नियुक्ती झाली.

  • नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर 'शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भारतीय जनता पक्षात केल्यानंतर त्यांना एप्रिलमध्ये पुणे-म्हाडाचे अध्यक्षपद देण्यात आले.

  • गेल्या सात वर्षापासून या पदावर नियुक्तीच झालेली नव्हती. दरम्यानच्या काळात तत्कालीन जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, राजाराम माने, अमित सैनी आणि त्यानंतर विद्यमान जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यावर अध्यक्षदाची जबाबदारी होती.

फिल्म सिटीत ‘नो कॅमेरा, नो अ‍ॅक्शन’ : फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी आणि सचिव पिठवा
  • कामाचे तास, योग्य कंत्राट करून कामाचा मोबदला, ओव्हर टाइम, कामाच्या निश्चित वेळा, विमा, खाण्या-पिण्याची सोय यांसारख्या विविध मूलभूत विषयांवरून गेले तीन दिवस फिल्म सिटीमध्ये चित्रपट आणि टेलिव्हीजन कामगारांनी फिल्म सिटी समोर आंदोलन सुरू केले आहे.

  • गेल्या तीन दिवसांपासून गोरेगाव फिल्म सिटीमध्ये ‘नो कॅमेरा, अ‍ॅक्शन’ चे वातावरण आहे, विविध मागण्यांसाठी फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एप्लॉइजने संप पुकारला आहे.

  • या संपात एकूण २२ युनियन्सचा समावेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या रात्रीपासून हा संप सुरू आहे फिल्म सिटी परिसरात बुधवारी संपक यांच्या घोषणांमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता, 

  • बुधवारी संपाचा तिसरा दिवस होता. संपा वेळी काही कामगार काम करत असल्याची माहिती संपकºयांना मिळाल्यानंतर त्यांची समजूत काढायची आहे, असे म्हणत त्यांनी गेटच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला.

  • हा संप आम्हा सर्वांच्याच भल्यासाठी असल्याचे संपकºयांनी म्हटले आहे.

  • या संपात टेक्निशिअनपासून स्पॉटबॉयपर्यंत सर्वांचा समावेश आहे; पण आत शिरण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला, यावेळी एका निर्मात्याला धक्काबुक्की झाल्याचेही समजले.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • -

जन्म, वाढदिवस

  • जीन क्रांट्झ, नासाचा उड्डाण निदेशक : १७ ऑगस्ट १९३३

  • व्ही.एस. नायपॉल, इंग्लिश लेखक : १७ ऑगस्ट १९३२

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • मोहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष : १७ ऑगस्ट १९८८

ठळक घटना

  • विमान अपघातात पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार : १७ ऑगस्ट १९८८

  • अमेरिकेत आपल्याच जमिनींवरुन हुसकून लावलेल्या लकोटा जमातीच्या लोकांनी मिनेसोटा नदीच्या किनारी असलेल्या श्वेतवर्णीय वसाहतींवर हल्ला केला : १७ ऑगस्ट १८६२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.