चालू घडामोडी - १७ जून २०१७

Date : 17 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोहम्मद आमिरचा मंदपणा, उत्साहाच्या भरात 'गेम प्लॅन' जाहीर :
  • आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ भिडणार आहेत. मात्र या महामुकाबल्यापूर्वीच पाकिस्तानचा गेम प्लॅन लीक झाला आहे. पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिरने त्याच्या संघाचा प्लॅन सार्वजनिक केला.

  • पाकिस्तान संघाच्या बैठकीत भारताच्या सुरुवातीच्या २-३ विकेट लवकर घेण्याची रणनिती ठरवण्यात आली. संघ या विकेट घेण्यात यशस्वी झाला तर ठिक, नाही तर भारतीय फलंदाज ३०० पेक्षा अधिक आव्हान देतील, जे पाकिस्तानसाठी आव्हानत्मक असेल, अशी चर्चा बैठकीत झाल्याचं मोहम्मद आमिरने सांगितलं.

  • पाकिस्तानच्या रणनितीचा प्रमुख विषय म्हणजे ते तीन फलंदाज सलामीवीर रोहित शर्मा, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली हे आहेत.

  • या तिन्ही फलंदाजांनी या मालिकेत दमदार फलंदाजी केली आहे.

मोदी सरकारच्या काळ्या पैशाविरोधातील लढाईला मोठे यश; स्वित्झर्लंड भारताला संशयास्पद खात्यांची माहिती देणार :
  • मोदी सरकारच्या काळ्या पैशाविरोधातील लढाईला मोठे यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी विदेशातील काळ्या पैशाचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता.

  • स्वित्झर्लंड सरकारकडून शुक्रवारी यासंदर्भातील एका कराराला मंजूरी देण्यात आली.  मोदी सरकारच्यादृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे. या करारामुळे आता स्वित्झर्लंडकडून भारताला स्विस बँकेतील संशयास्पद खात्यांची माहिती दिली जाणार आहे.

  • स्वित्झर्लंडने भारत आणि इतर ४० देशांबरोबर बँकिंगविषयक माहिती आदान-प्रदान करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

  • त्यामुळे २०१९ पासून स्वित्झर्लंडमधील भारतीयांच्या बँक खात्यांची माहिती भारताला मिळू शकेल. स्वित्झर्लंडच्या मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यामुळे देशाबाहेर काळा पैसा जाण्यावर अंकुश बसेल.

संपर्क तंत्रज्ञान निर्यातीत भारत अग्रेसर :
  • माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत सर्वात मोठा देश म्हणून पुढे आला असल्याचे मत संयुक्त राष्ट्राने व्यक्त केले आहे.

  • जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (डब्ल्यूआयपीओ) दहाव्या आवृत्तीत ही माहिती देण्यात आली आहे.

  • भारत हा आशियातील उदयोन्मुख नावीन्यपूर्ण केंद्र असल्याचे मत यात व्यक्त करण्यात आले आहे. तथापि, राजकीय स्थिरता आणि सुरक्षितता यात भारत १०६ व्या क्रमांकावर आहे.

  • जगातील उदयोन्मुख १३० देशात भारताचे स्थान ६० वे आहे. मध्य व दक्षिण आशियात भारत प्रथम क्रमांकावर आहे. गतवर्षीच्या 66व्या स्थानावरून भारत यंदा ६० व्या स्थानावर आला आहे.

  • भारत, केनिया, व्हिएतनामसह अन्य काही देशांनी आपल्या समकक्ष देशांपेक्षा या क्षेत्रात आघाडी घेतली आहे.

५० हजारांपेक्षा जास्त व्यवहारासाठी आधार कार्ड अनिवार्य :
  • बँकेत खाते उघडण्यासाठी आणि ५० हजार रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेची देवाण घेवाण करण्यासाठी सरकारने आता आधार कार्ड अनिवार्य केले आहे.

  • महसूल विभागाने याचा आदेश काढला आहे. विद्यमान बँक खातेधारकांना आधार कार्ड 31 डिसेंबर २०१७ पर्यंत जमा करण्यास सांगण्यात आले.

  • आधार नंबर न दिल्यास बँक खाते सक्रीय राहणार नाही. २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात सरकारने आधारला पॅनशी जोडणे अनिवार्य केलेले आहे.

  • करातून पळवाट काढण्यासाठी लोकांनी एकापेक्षा अधिक पॅनकार्डचा वापर करु नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.

  • आता व्यक्ती, कंपनी आणि भागीदारीतील कंपनी यांना ५० हजार रुपयांपेक्षा अधिकच्या व्यवहारासाठी आधारसोबत पॅन नंबर, फॉर्म नंबर ६० देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

अमेरिकेमध्ये होणार इंडियन अॅकॅडमी अॅवॉर्ड सोहळा :
  • बॉलिवूड, मराठी सिनेमा तसेच टॉलिवू़डच्या सिनेमांनाही गौरवण्यात येणार आहे. तसेच हॉलिवूडच्या सिनेमात जे भारतीय कलाकार आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना खिळवून ठेवतात अश्या दिग्गजांचाही या पुरस्कार सोहळ्यात विशेष गौरव होणार आहे.

  • भारतीय सिनेमा आता जगातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला आहे. इतर देशात भारतीय सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणं करत आहे. या भारतीय सिनेमाचे जागतिक पातळीवर कौतुक होण्यासाठी इंडियन अॅकॅडमी अॅवॉर्डस सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील सॅनफ्रान्सिसको शहरात हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा रंगणार आहे. गोव्यात सध्या सुरू असलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.

  • या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे शाहरूख खान इंडियन अॅकॅडमी अॅवॉर्ड सोहळ्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

जर्मनीचे माजी चान्सलर हेलमट कोल यांचे निधन :
  • जर्मनीचे माजी चान्सलर हेलमट कोल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

  • १९८२ ते १९९८ या प्रदीर्घ कालावधीत ते जर्मनीचे चान्सलर होते. जर्मनीच्या एकीकरणात हेलमट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

  • हेलमट कोल यांचा जन्म ०३ एप्रिल १९३० रोजी झाला होता. १९४६ च्या काळात ते राजकारणात आले आणि ख्रिश्चन डेमोक्रेटीक युनियनमध्ये ते सामील झाले.

  • १९९० च्या दशकात बर्लिन भिंत कोसळली आणि पूर्व-पश्चिम जर्मनी एकत्र आले. जर्मनीच्या एकत्रीकरणात हेलमट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

  • जर्मनीच्या चान्सलर पदावर सर्वाधिक काळ (१६ वर्ष) राहण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीने विकासाच्या दिशेने वाटचाल केली.

दिनविशेष : 

जन्म, वाढदिवस

  • शेन वॉट्सन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू : १७ जून १९८१

  • एडवर्ड पहिला, इंग्लंडचा राजा : १७ जून १२३९

  • चार्ल्स बारावा, स्वीडनचा राजा : १७ जून १६८२

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • जिजाबाई, शिवाजी महाराजांची आई : १७ जून 

  • राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी (लढाईत) : १७ जून १८५८

ठळक घटना

  • अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले : १७ जून १९६३

  • भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात ३४० मिमी (१३ इंच पाउस) पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले : १७ जून २०१३

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.