चालू घडामोडी - १८ ऑगस्ट २०१७

Date : 18 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
संरक्षणमंत्री अरुण जेटली : भारतीय लष्करासाठी लढाऊ हेलिकॉप्टर्सला मंजूरी
  • प्रभावी युद्धसज्जतेसाठी लढाऊ हेलिकॉप्टर मिळावीत ही लष्कराची फार काळापासूनची प्रलंबित मागणी होती. ही 'अ‍ॅपाचे' हेलिकॉप्टर मिळाल्यावर लष्करास तशा प्रकारची हेलिकॉप्टर प्रतणच उपलब्ध होतील.

  • भारतीय लष्करासाठी ४१६८ कोटी रुपये खर्च करून सहा 'अ‍ॅपाचे' लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावास संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील 'डिफेन्स अ‍ॅक्विझिशन कौन्सिल'च्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

  • नौदलाच्या युद्धनौकांसाठी ४९० कोटी रुपये खर्च करून दोन गॅस टर्बाईन खरेदी करण्याच्या प्रस्तावासही 'डीएसी'ने मंजुरी दिली.

इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांनी आपल्या पदाचा राजीनामा :
  • विशाल सिक्का यांनी इन्फोसिसच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला असून त्यांच्याजागी प्रविण राव यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • इन्फोसिसकडून पत्राव्दारे शेअर बाजाराला सिक्का यांच्या राजीनाम्याची माहिती कळवण्यात आली, सिक्का यांची इन्फोसिसमध्ये उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • १८ ऑगस्टला झालेल्या संचालक मंडाळाच्या बैठकीत सिक्का यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला, सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदासाठी नव्या चेह-याचा शोध सुरु झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 

  • सॉफ्टवेयर एक्सपोर्ट क्षेत्रातील इन्फोसिस भारताची दुस-या क्रमांकाची कंपनी आहे. इन्फोसिसचे सीईओ म्हणून सिक्का यांनी नुकतीच तीनवर्ष पूर्ण केली होती. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार : 
  • १०१४-१५ या वर्षाच्या पुरस्कारांसाठी राज्यभरातून १९ ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांची राज्यस्तरीय निवड समितीने निवड केली आहे.

  • सन २०१४-१५ आणि २०१५-१६ वर्षांसाठीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ. एस.आर. रंगनाथन कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आले.

  • ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, या ग्रंथालयांकडून जनतेला चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे हा यामागील उद्देश आहे, तसेच २०१५-१६ सालासाठी एकूण १३ ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांची निवड करण्यात आली आहे.

  • वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावे यासाठी ग्रंथालयांना पुरस्कार दिला जातो.

मोदी सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीकास्त्र :
  • राजधानीमध्ये गुरुवारी झालेल्या मेळाव्यात सर्व विरोधी नेत्यांनी भाजपा, मोदी सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीकास्त्र सोडले.

  • देशाला चीन किंवा पाकिस्तानपेक्षा आत बसलेल्यांकडूनच धोका आहे, असे सांगून ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या वेळी आमच्याकडे पर्याय होता की, जिना यांना निवडायचे की गांधी यांना.

  • नितीश कुमार यांनी भाजपासमवेत घरोबा केल्याने संतप्त झालेल्या शरद यादव यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, फारूख अब्दुल्ला, सीताराम येचुरी, डी. राजा या सर्वांनीच जातीयवादी, धार्मिक विद्वेष निर्माण करणाºया आणि राज्यघटनेची मोडतोड करू पाहणाºयांचा पाडाव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.

  • संघावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, देशात सत्तेत येईपर्यंत या मंडळींनी राष्ट्रध्वजाला सलाम केला नाही. ते आता राज्यघटना बदलू पाहत आहेत. मोदींची सर्व आश्वासने खोटी ठरली आहेत. 

  • या संमेलनाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, डी. राजा, रामगोपाल यादव (सपा), सुखेन्दु शेखर (टीएमसी), वीर सिंह (बसपा), जयंत चौधरी (आरएलडी), तारिक अन्वर (एनसीपी) यांच्यासह बाबूलाल मरांडी, रमईराम उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनी भारत सरकारतर्फे जाहीर होणारे 'पद्म' पुरस्कार :
  • केंद्र सरकारने यात थोडी सुधारणा करून केवळ सरकारी शिफारशीचे बंधन काढून टाकले आहे. यापुढे देशातील कोणीही नागरिक 'पद्म' पुरस्कारासाठी नावांची ऑनलाइन शिफारस करू शकेल.

  • विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रजासत्ताक दिनी भारत सरकारतर्फे जाहीर होणारे 'पद्म' पुरस्कार यापुढे देशातील जनतेच्या शिफारशींवरून दिले जातील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

  • निती आयोगाने उद्योजकांसाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आतापर्यंत 'पद्म' पुरस्कारांसाठी निवड विविध मंत्रालयांच्या शिफारशींच्या आधारे केली जात असे.

  • असा आमच्या सरकारचा दृढ विश्वास आहे व म्हणूनच देशाला बलवान करण्यासाठी नागरिकांच्या या बलस्थानांचे एकत्रीकरण करणार आहे.

  • तसेच या बदलामुळे प्रसिद्धीच्या झोतात न राहता काम करणार्‍या खर्‍या 'हीरों'च्या कामाचे योग्य मूल्यमापन होईल, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक नागरिक आपल्या परीने देशासाठी काही तरी करू शकतो आणि तो तसे करत असतो.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • -

जन्म, वाढदिवस

  • विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक : १८ ऑगस्ट १८७२

  • थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे : १८ ऑगस्ट १६९९

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी : १८ ऑगस्ट १९४५

  • नारायण धारप, मराठी लेखक : १८ ऑगस्ट २००८

  • वॉल्टर पी. क्रायस्लर, अमेरिकन उद्योगपती : १८ ऑगस्ट १९४०

ठळक घटना

  • रिगा शहराची स्थापना : १८ ऑगस्ट १२०१

  • पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने राजीनामा दिला : १८ ऑगस्ट २००८

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.