चालू घडामोडी - १८ जून २०१७

Date : 18 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मानवी ढाल बचावाची आदर्श पद्धत असू शकत नाही- लष्करप्रमुख 
  • मानवी ढालीचा वापर दगडफेक करणाऱ्यांपासून बचाव करण्याचा आदर्श मार्ग असू शकत नाही, असे लष्कप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले आहे.

  • ‘मेजर गोगोई यांनी दगडफेक करणाऱ्या जमावापासून बचाव करण्यासाठी मानवी ढालीचा वापर केला होता. मात्र दगडफेक करणाऱ्यांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मानवी ढाल ही काही आदर्श पद्धत असू शकत नाही,’ असे रावत यांनी म्हटले आहे.

  • लष्कराने कायमच मानवाधिकारांचा सन्मान केला असून कायमच मानवाधिकारांचे संरक्षण केले आहे, असेदेखील रावत यांनी सांगितले.

  • सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्यांचा मुकाबला कसा करणार, असा प्रश्न बिपिन रावत यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मानवी ढालीचा वापर आदर्श पर्याय असू शकत नाही, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. याआधी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी मेजर गोगोई यांच्या कृत्याचे समर्थन केले होते..

ट्रम्प यांच्याकडून ओबामांचे क्युबा धोरण रद्द
  • अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी जाहीर केलेले क्युबा धोरण विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केले असून ते धोरण एकतर्फी होते, अशी टीका केली आहे.

  • शीतयुद्ध काळातील शत्रू असलेले क्युबा व अमेरिका यांच्यातील संघर्ष ओबामा यांच्या धोरणामुळे  मिटला होता, पण आता पुन्हा एकदा त्यांच्यात वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • राऊल कॅस्ट्रो यांची मक्तेदारी चालू देणार नाही असा इशारा ट्रम्प यांनी दिला. अमेरिका व क्युबा यांच्यातील संबंध पूर्ववत केले जातील, असे ओबामा यांनी २०१४ मध्ये असे जाहीर केले होते. त्यानंतर वर्षभराने अमेरिकी दूतावास क्युबातील हवाना येथे सुरू करण्यात आला होता.

  • ओबामा यांनी २०१६ मध्ये क्युबाला ऐतिहासिक भेट दिली होती. क्युबा हा कम्युनिस्ट देश असून शीतयुद्धाच्या काळात त्यांचे अमेरिकेशी संबंध विकोपाला गेले होते.

  • ओबामा यांचे धोरण बदलून ट्रम्प यांनी सांगितले की, मी आताच्या आता ओबामा यांचे एकतर्फी असलेले क्युबा धोरण रद्द करीत आहे व प्रचारातील आश्वासनानुसार नवीन धोरण जाहीर केले जाईल.

महायुद्ध! विराटसेना सज्ज : चॅम्पियन्स ट्रॉफी 
  • अंगात रक्त सळसळत आहे. भावनांवर नियंत्रण राखणे आता आपल्या हातात नाही. भारताला जेतेपदाशिवाय दुसरे काहीच नको. पुन्हा एकदा पाकला हरवायचे आहे आणि केवळ हरवायचेच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा बचावही करायचा आहे.

  • विराट सेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चार वर्षांपूर्वी धोनी सेनेने ‘साहेबांना’ धूळ चारत पटकाविलेली चॅम्पियन्स ट्रॉफी ती कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानने हिसकावून नेता कामा नये, यासासाठी विराट सेनेने कंबर कसली आहे.

  • ४ जूनला विराट सेनेने पाकिस्तानला धूळ चारली होती; पण नियतीने पुन्हा एकदा या दोन शेजाऱ्यांना २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत आमने-सामने आणले आहे. ‘रणांगणा’वर भारताविरुद्ध पाकला वारंवार नामुष्की पत्करावी लागली आहे.

  • ‘रनसंग्रामा’तही कदाचित त्यांची तीच इच्छा असावी. पाकने केवळ नशिबाच्या जोरावर अंतिम फेरीत स्थान मिळविले, तर भारताने कामगिरीच्या जोरावर पात्रता मिळविली.

  • आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत पाकिस्तानचा ‘बाप’ आहे आणि आज, रविवारी ‘फादर्स डे’पण आहे. आयसीसी स्पर्धेत भारताने १३ वेळा जेतेपदाचा मान मिळविला, तर पाकिस्तानला केवळ दोनदा अशी कामगिरी करता आली.

आयकर वसुलीत २६.२ टक्क्यांची वाढ, मुंबईतून सर्वाधिक करवसुली :
  • यंदा संपूर्ण देशातून आयकर वसुली चांगली झालू असून, १५ जूनपर्यंत करवसुलीच्या प्रमाणात २६.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

  • आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ जूनपर्यंत संपूर्ण देशभरातून १,०१,०२४ कोटी रुपये आयकर वसुली झाली असून गेल्यावर्षी याच काळातील हा आकडा ८०,०७५ कोटी रुपये होता. आयकर वसुलीचे प्रमाण वाढल्याने, देशाची आर्थिक स्थिती भक्कम होण्यास पुरक ठरेल असं बोललं जात आहे.

  • आयकर विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ जूनपर्यंत चार महानगरातील मुंबईतून सर्वाधिक करवसुली झाली.

  • यात मुंबईतून करवसुलीचं प्रमाण १३८ टक्क्यांनी वाढू होऊन, २२,८८४ कोटी आयकर वसुली झाली आहे. गेल्यावर्षी हाच आकडा ९,६१४ कोटी रुपये होता. संपूर्ण देशाचा विचार केल्यास मुंबईतून करवसुलीचं प्रमाण एक तृतीयांश असल्याचं सांगण्यात येत आहे.

दिनविशेष : 

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • रणरागिनी, झाशीची राणी लक्ष्मीबाई ग्वाल्हेर येथे इंग्रजाशी लढताना धारातीर्थी : १८ जून १८५८

  • ग्रंथकार व संपादक तसेच ’मोचनगड’ ही मराठीतील पहिली ऎतिहासिक कादंबरी लिहिणारे लेखक रामचंद्र गुंजीकर यांचे निधन : १८ जून १९०१

ठळक घटना

  • महाराणा प्रताप व अकबर यांच्यात ’हळदी घाटा’ ची सुप्रसिध्द घनघोर लढाई झाली : १८ जून १७७६

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.