चालू घडामोडी - २० ऑगस्ट २०१७

Date : 20 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फ्लॉरेन्स लघुग्रह पृथ्वीच्या सर्वाधिक जवळून जाणार : ८०० लघुग्रहांची भाऊगर्दी
  • फ्लॉरेन्स लघुग्रहाची ही फेरी पृथ्वीपासून ७० लाख किमी म्हणजेच पृथ्वी व चंद्र यांच्यातील अंतराहून १३ पट अधिक दूरवरून होणार असली तरी ती लक्षणीय आहे.

  • ४.४ चौ. किमी आकाराचा फ्लॉरेन्स नावाचा लघुग्रह येत्या १ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार असून त्यामुळे कोणताही धोका नसल्याची खात्री वैज्ञानिकांनी दिली आहे.

  • ‘नासा’ने अंतराळात स्वैरपणे भ्रमण करणाºया लघुग्रहांवर देखरेख ठेवण्याचे काम २० वर्षांपूर्वी सुरु केल्यापासून एवढ्या मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाण्याची ही पहिलीच वेळ असेल.

  • आॅगस्टच्या अखेरच्या व सप्टेंबरच्या सुरवातीच्या दिवसात छोट्या दुर्बिणीतून फ्लॉरेन्स लघुग्रह दिसू शकेल. याआधी १२७ वर्षांपूर्वी म्हणजे सन १८९० मध्ये या लघुग्रहाने पृथ्वीच्या एवढ्या जवळून भम्रण केले होते.

  • शेल्टे बस या खगोल वैज्ञानिकाने सन १९८१ मध्ये आॅस्ट्रेलियातील एका प्रयोगशाळेतून निरीक्षण करताना फ्लॉरेन्स लघुग्रहाचा शोध लावला होता. आधुनिक नर्सिंगची मुहूर्तमेढ रोवणाºया मिसेस फ्लॉरेन्स नाईटेंगेल यांचे नाव या उपग्रहास देण्यात आले आहे.

बोल्ट आणि फराह यांची जागा घेणारे खेळाडू मिळणे कठीण :
  • उसेन बोल्ट आणि मो फराह हे जगातील दोन महान धावपटू अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर पडून ढसाढसा रडत होते. त्यांच्या पाणावलेल्या नयनांनी उपस्थित प्रेक्षकांच्याही डोळ्यांत आसवे आणली.

  • गेली ९-१० वष्रे क्रीडाप्रेमींचे निखळ मनोरंजन करणारे आणि प्रतिस्पर्धीच्या मनात आदरयुक्त भीती निर्माण करण्यात यशस्वी झालेले हे दिग्गज धावपटू जागतिक स्पध्रेत अखेरचे सहभागी झाले होते.

  • दूरचित्रवाणीसमोर बसलेले लाखो-कोटय़वधी चाहतेही त्या क्षणी स्तब्ध झाले. कारण तो क्षणच भावनिक होता.

  • जिंकल्यानंतरचा आनंद साजरा करण्याची त्यांची ती मुद्रा जगभरातील क्रीडा चाहत्यांमध्येही लोकप्रिय झाली. बोल्टचे ते एक हात आकाशाच्या दिशेने उंचावणे आणि फराहचे ते दोन्ही हातांची बोटे डोक्यावर ठेवणे, ही जणू आनंद साजरा करण्याची शैलीच बनली.

  • त्यांची ही विजयीमुद्रा पुन्हा प्रत्यक्ष पाहण्याची संधी आता मिळणार नाही. त्यामुळे कारकीर्दीतील अखेरच्या स्पध्रेत ही ‘विजयीमुद्रा’ डोळ्यात साठवण्यासाठी लंडन स्टेडियमवर जनसागर लोटला होता.

१० कोटी डॉलर्स किंमतीच्या तेलाची खरेदी : ४० वर्षांनी भारतात येणार अमेरिकेचं तेल
  • अमेरिकेन कॉंग्रेसने तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठविल्यानंतर भारताने १० कोटी डॉलर किंमतीच्या तेलाची खरेदी केली आहे. या तेलाचे जहाज अमेरिकेतून भारताच्या दिशेने निघाले असून सप्टेंबर महिन्यामध्ये ते भारतात येण्याची शक्यता आहे.

  • भारत हा जगातील तेल आयात करणारा जगातील तिसऱ्या क्रमाकांचा देश असून चीन, द. कोरिया आणि जपाननंतर भारत हा आशियातील अमेरिकचे तेल खरेदी करणारा चौथा देश बनला आहे.

  • आता भारतात पहिल्या खेपेत येणारे २ लाख बॅरल तेल १० कोटी डॉलर्स किंमतीचे आहे.

  • २०१६ साली अमेरिकेने तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवली, ओबामा सरकारच्या काळामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. उत्तर डाकोटा आणि अलास्कासारख्या तेलउत्पादक राज्यांनी ही बंदी उठवली जावी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

थोडक्यात बचावले मनोज तिवारी दिल्ली भाजपा प्रदेशाध्यक्षांवर हल्ला :
  • मनोज तिवारी यांच्यावर दगडफेक आणि लाकडाच्या दांड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, विरोधकांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोपही भाजपाच्या प्रवक्याने केला आहे

  • भाजपाचे नवी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला असून काल शनिवारी त्यांच्यावर एका कार्यक्रमात हा  हल्ला झाला, या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहेत. 

  • भाजपा प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, बवाना येथील निवडणुक प्रचाराच्या बैठकत प्रचार करत असताना मनोज तिवारी यांच्यावर काही अज्ञांत लोकांनी हल्ला केला.

  • डीसीपी ऋषिपाल सिंह यांनी सांगितले की, शनिवारी रात्री मनोज तिवारी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती मिळाली, मिळालेल्या माहितीनुसार तिवारी यांच्यावर लाकडाच्या तुकडे आणि दगडफेक केली. या सर्व घटनेची पोलिसांमध्ये तक्रार आली असून अज्ञांतावर गुन्हा दाखल केला आहे.

  • २३ ऑगस्ट रोजी बवानामध्ये निवडणुका होत आहेत, त्यासाठी प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावून प्रचार करत आहेत, या जागेसाठी भाजपाकडून वेद प्रकाश मैदानात आहेत, वेद प्रकाश यांनी आम आदमी पार्टीमधून भाजपात प्रवेश केला आहे.  

आज भारत-श्रीलंका पहिला वन-डे सामना, विराटला ३ नवे विक्रम :
  • विराट कोहलीने २०१९ मध्ये होणाºया विश्वकप स्पर्धेवर लक्ष केंद्रित करताना आगामी दोन वर्षांत काही खेळाडूंवर विशेष जबाबदारी सोपविण्याचे निश्चित केले आहे.

  • प्रतिस्पर्धी संघाचा विचार करून खेळाडूंचा वापर करणार का, याबाबत बोलताना कोहली म्हणाला, ‘कुठल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळत आहोत, हे महत्त्वाचे आहे.

  • खेळाडूवर विशेष जबाबदारी सोपविण्याची वेळ आलेली आहे. लोकेश राहुल मधल्या फळीत खेळणार असल्याचे निश्चित आहे तर केदार जाधव व मनीष पांडेदरम्यान उर्वरित स्थानासाठी चुरस राहील.’

  • ‘मालिकेतील पराभव विसरावा लागेल’ कसोटी मालिकेत ३-० ने पत्करावा लागलेला पराभव विसरून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मिळवलेल्या विजयाने मनोधैर्य उंचवावे लागेल, अशी प्रतिक्रिया श्रीलंका वन-डे संघाचा कर्णधार उपुल थरंगाने व्यक्त केली.

  • पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेतील पहिल्या लढतीच्या पूर्वसंध्येला बोलताना थरंगा म्हणाला,‘कसोटी मालिका व त्यात केलेल्या चुका आम्हाला विसराव्या लागतील.

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, के. एल. राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, एम. एस. धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुर्वेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर.

  • श्रीलंका : उपुल थरंगा (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुशल मेंडिस, धनुष्का गुणतिलका, चमारा कपूगेदारा, मिलिंद सिरिवर्धना, अकिला धनंजया, मलिंडा पुष्पकुमारा, लक्षण संदाकन, थिसारा परेरा, वानिंदू हसरंगा, लसिथ मलिंगा, दुष्मंता चामिरा, विश्वा फर्नांडो.

सीआयआयची शिखर परिषद अनुत्पादक भांडवलावरील उपाय :
  • अनुत्पादक भांडवलावरील (एनपीए) उपाययोजनांचा हेतू अडचणीतील उद्योगांना अवसायनात काढणे हा नसून, त्यांना साह्य करणे हा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.

  • कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीजच्या (सीआयआय) वतीने आयोजित दिवाळखोरी शिखर परिषदेत ते म्हणाले, एनपीएची समस्या हाताळण्यासाठी ज्या उपाययोजना सरकार करीत आहे, त्यांचा उद्देश उद्योगांना अवसायनात काढणे हा अजिबात नाही.

  • शक्य असल्यास सध्याच्या प्रवर्तकांच्या साह्याने अथवा नव्या भागीदारांच्या साह्याने कंपन्या आणि उद्योग वाचविणे हा त्यामागील उद्देश आहे.

  • कर्जवसुली लवादांनी प्रभावी काम न केल्यामुळे एनपीएची समस्या गंभीर झाली आहे, कर्जदारांची सुरक्षा करणाºया व्यवस्थेत आम्ही अनेक वर्षे राहिलो आहोत.

  • नव्या नादारी व दिवाळखोरी संहितेत कर्जदार आणि कर्जदाता यांच्यातील नातेसंबंधच पूर्ण बदलून टाकला आहे. कर्ज वसुलीला प्रधान्य दिले जाणार आहे.

  • जुन्या व्यवस्थेत कर्ज देणाºया संस्थांना वसुलीसाठी कर्जदारांचा पाठपुरावा करताना नाकीनऊ येत होते. नव्या व्यवस्थेने ती अडचण दूर झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • -

जन्म, वाढदिवस

  • राजीव गांधी, भारतीय पंतप्रधान : २० ऑगस्ट १९४४

  • एन.आर. नारायण मुर्ती, भारतीय उद्योगपती : २० ऑगस्ट १९४६

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • नरेंद्र दाभोलकर, बुद्धिवादी, सामाजिक कार्यकर्ते, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष : २० ऑगस्ट २०१३

  • प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक : २० ऑगस्ट १९९७

  • गोपीनाथ मोहांती, उडिया लेखक : २० ऑगस्ट १९९१

ठळक घटना

  • भारताचा खेळाडू सुशीलकुमार याला बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत कुस्ती या प्रकारात ब्रॉंझ पदक मिळाले : २० ऑगस्ट २००८

  • एस्टोनियाने स्वतःला सोवियेत संघापासून स्वतंत्र जाहीर केले : २० ऑगस्ट १९९१

  • इंडियन नॅशनल कॉंग्रेसची स्थापना : २० ऑगस्ट १८८५

  • नॅशनल फुटबॉल लीगची डेट्रॉइट येथे स्थापना : २० ऑगस्ट १९२०

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.