चालू घडामोडी - २१ जुलै २०१७

Date : 21 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रामनाथ कोविंद नवे राष्ट्रपती : 
  • भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपाप्रणित रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचीच गुरुवारी निवड झाली आहे.

  • रामनाथ कोविंद यांना ७ लाख २ हजार ४४ (६५.६५ टक्के) मते तर काँग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवार मीराकुमार यांना ३ लाख ६७ हजार ३१४ (३५.३४ टक्के) मते मिळाली.

  • कोविंद यांनी मीराकुमार यांचा ३ लाख ३४ हजार म्हणजे जवळपास दुप्पट मतांनी पराभव केला. रामनाथ कोविंद यांच्या रूपाने राष्ट्रपतिपदी प्रथमच भाजपचा नेता विराजमान होत आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविंद्र यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व पराभूत उमेदवार मीरा कुमार यांनीही कोविंद यांचे अभिनंदन केले.

रिझर्व्ह बँकेकडून लवकरच व्यवहारात येणार नवी नोट :
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच महात्मा गांधी मालिका-२००५ची २० रूपयांची नवीन नोट सादर करणार आहे.

  • सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या नव्या नोटेची रचना सध्या बाजारात असलेल्या नोटेप्रमाणेच असेल.

  • आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकाप्रमाणे या नव्या २० रूपयांच्या नोटेच्या नंबर पॅनलवर इनसेट लेटरमध्ये 'S' हे आद्याक्षर लिहिलेले असेल. यावर विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.

  • आरबीआयने म्हटले आहे की, या नोटेच्या दोन्ही नंबर पॅनलमधील इनसेट लेटरमध्ये ‘S’ लिहिलेले असेल. त्याचबरोबर या नोटेची रचना बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या नोटेप्रमाणेच असेल, असेही आरबीआयने म्हटले आहे.

  • तसेच २० रूपयांच्या सध्या व्यवहारात असलेल्या नोटाही व्यवहारात असतील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. जुन्या २० रूपयांच्या नोटांच्या इन्सेट लेटरमध्ये ‘R’ हे आद्याक्षर आहे.

'हायपरलूप' भुयारी प्रकल्पामुळे न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन प्रवास फक्त २९ मिनिटांचा :
  • प्रसिद्ध तंत्रज्ञ एलोन मस्क यांनी गुरुवारी हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारीत भुयारी वाहतूक प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचे टि्वटरवरुन जाहीर केले असून हा प्रकल्प आकाराला आला तर, न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन या दोन शहरांमधील अंतर फक्त २९ मिनिटात पार करता येईल. 

  • एलोन मस्क हे इलेक्ट्रिक कार मेकर टेस्ला आणि रॉकेट कंपनी स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मेट्रो आणि मोनो रेल प्रमाणे हायपरलूप तंत्रज्ञान भविष्यातील वाहतुकीचे प्रभावी साधन बनू शकते.

  • मस्क यांनी तोंडी मंजूरी मिळाल्याचे जाहीर केले असले तरी, अशा कोणत्याही प्रकल्पाला मंजुरी दिली नसल्याचे वॉशिंग्टन व न्यूयॉर्कमधील अधिका-यांनी सांगितले.

गुजरातचा छोकरा बनला इंग्लंडमधील सर्वात युवा डॉक्टर :
  • लंडनमध्ये राहणारा गुजरातमधील एक तरुण इंग्लंडमधील सर्वात तरुण डॉक्टर ठरला आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून उत्तर-पूर्व इंग्लंडमधील एका रुग्णालयातून तो आपल्या रुग्णसेवेस सुरुवात करणार आहे.  

  • अनिवासी भारतीय असलेल्या अर्पण आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल म्हणतो,  जोपर्यंत माझ्या मित्रांनी इंटरनेटवर शोध घेतला नाही तोपर्यंत मला मी इंग्लंडमधील सर्वात युवा डॉक्टर ठरल्याचे मला माहितच नव्हते.

  • अर्पण दोषी असे या तरुणाचे नाव असून, त्याने  शेफिल्ड विद्यापीठातून बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी या पदव्या घेतल्या आहेत. पदवी घेतली तेव्हा त्याचे वय २१ वर्षे ३३५ दिवस होते.

  • त्यामुळे सर्वात तरुण डॉक्टर बनण्याचा मान त्याच्या नावावर नोंदला गेला आहे.  

महिला विश्वचषकात भारतीय संघ अंतिम फेरीत :
  • अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत मोक्याच्या वेळी झुंजार अ‍ॅलेक्स ब्लॅकवेलचा त्रिफळा उडवत दीप्ती शर्माने घेतलेल्या बहुमूल्य बळीच्या जोरावर भारताने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

  • अष्टपैलू हरमनप्रीत कौरने झळकावलेल्या तुफानी दीड शतकानंतर गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या भारताने गतविजेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी नमवले.

  • प्रथम फलंदाजी करताना भारताने ४२ षटकांत ४ बाद २८१ धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला ४०.१ षटकांत २४५ धावांवर रोखले.

  • तसेच विश्वविजेतेपदासाठी भारतीय महिला संघ यजमान इंग्लंडविरुद्ध २३ जुलैला लॉडर्स मैदानावर अंतिम फेरी खेळतील.

कर्मचारींना निवृत्तीच्या दिवशीच मिळणार पीएफ आणि पेन्शन :
  • कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटने (ईपीएफओ)ने स्वतःच्या कार्यक्षेत्रातील कंपन्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच पीएफ देण्याचे निर्देश दिले आहेत.

  • प्रश्नोत्तराच्या तासाला संसदेत यासंदर्भात चर्चा करण्यात आली असता केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ही माहिती दिली असून ईपीएफओच्या माध्यमातून सर्व क्षेत्रिय कार्यालयांना हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(ईपीएफ) योजना, १९५२ आणि कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस), 1995च्या सदस्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शनचा भरणा करावा, असे स्पष्ट निर्देश कंपन्यांना ईपीएफओने केले आहेत.

  • केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय म्हणाले, ग्रॅच्युइटी देयके कायदा १९७२ अंतर्गत ज्या व्यक्तीला ज्या वेळेपासून ग्रॅज्युटीचे पैसे द्यावे लागणार आहेत, त्यांना ३० दिवसांच्या आतच सर्व रक्कम देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • मुक्ती दिन : गुआम.

  • वांशिक सलोखा दिन : सिंगापुर.

जन्म, वाढदिवस

  • अमरसिंग चमकीला, पंजाबी गायक : २१ जुलै १९६१

  • रवींद्र पुष्पकुमार, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू : २१ जुलै १९७५

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार : २१ जुलै २००२

  • ऍलन शेपर्ड, अमेरिकन अंतराळवीर : २१ जुलै १९९८

ठळक घटना 

  • अमेरिकेतील जगभर दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळे काढले : २१ जुलै २००२

  • नील आर्मस्ट्रॉँग व एडविन आल्ड्रिन हे चंद्रावर पाउल ठेवणारे पहिले मानव झाले : २१ जुलै १९६९

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.