चालू घडामोडी - २२ एप्रिल २०१७

Date : 22 April, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फेरनिवड 'तृणमूल'च्या अध्यक्षपदी ममता बॅनर्जी -
  • फेरनिवडीनंतर त्या म्हणाल्या की, पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अन्य कोणाला दिली असती, तर ते अधिक योग्य झाले असते. कार्यकर्ता म्हणून काम करण्यास मला आवडते. कारण नेते नाही, तर कायकर्ते हेच पक्षाची संपत्ती आहे. तृणमूल कॉंग्रेस पक्ष नागरिकांसाठी काम करतो.

  • पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली. ही निवड सहा वर्षांसाठी असेल.

  • पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीनंतर उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची याबाबत घोषणा केली. या प्रसंगी ममता बॅनर्जी उपस्थित होत्या.

'टाईम'च्या १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदींचा समावेश -
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन व ब्रिटीश पंतप्रधान टेरेजा मे यांचाही समावेश आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेटीएम चे संस्थापक विजय शंकर शर्मा टाइम मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे.

  • टाइम मासिकाच्या यादीत जगभरातील कलाकार, नेते व महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात येतो.

  • मासिकामध्ये प्रसिद्ध लेखक पंकज मिश्रा यांनी मोदींची माहीती लिहीली असून त्यांनी म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनण्याआधी नरेंद्र मोदी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान बनले होते.

सेवा शुल्क पूर्णपणे ऐच्छिकच -
  • हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये होणारी सेवा शुल्क आकारणी पूर्णपणे ऐच्छिक असून, ती बंधनकारक नसल्याचे केंद्रीय अन्न व ग्राहक कल्याणमंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केले.

  • सरकारने सेवा शुल्क आकारणीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांना मंजुरी दिली. यापुढे हॉटेलांत आणि रेस्टॉरंट्समध्ये गेल्यावर बिलासोबत सेवाशुल्क द्यायचे की नाही, हे पूर्णपणे ग्राहकांनीच ठरवायचे असून, तेथील व्यवस्थापन तुमच्या संमतीशिवाय सेवाशुल्क आकारू शकणार नाही.

  • केंद्र सरकारने या संदर्भातील मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून, त्याचे पालन सर्व रेस्टॉरंट्स आणि हॉटेलांना करावेच लागेल.

नौदलाकडून ब्राह्मोसची यशस्वी चाचणी -
  • भारताच्या बहुतेक आधुनिक युद्धनौकांवर हे क्षेपणास्त्र आहे; पण आतापर्यंत ते फक्त शत्रूच्या युद्धनौकांवर डागण्याचेच कौशल्य आपल्याकडे होते. मात्र, आता शत्रूदेशाच्या अंतर्भागात असलेली महत्त्वाची ठिकाणेही ब्राह्मोसच्या साह्याने नष्ट करता येतील.

  • नौदलाने आपल्या भात्यातील ब्राह्मोस हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आयएनएस तेग या युद्धनौकेवरून यशस्वीरित्या डागले.

  • ध्वनिपेक्षाही जास्त वेगाने जाणारे क्रूझ क्षेपणास्त्र नौकेवरून जमिनीवर डागण्याचे कौशल्य असलेल्या नौदलांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे.

  • भारत व रशिया या दोघांनी हे क्षेपणास्त्र संयुक्तपणे विकसित केले आहे. यापूर्वी भारताने हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर तसेच जहाजांवर डागण्याची क्षमता विकसित केली असून आता हे क्षेपणास्त्र जहाजावरून सोडण्यात यश आल्याने युद्धनौकेवरून हे क्षेपणास्त्र शत्रूदेशाजवळ नेऊन ते शत्रूदेशात डागण्याची क्षमता भारताला मिळाल्याचे मानले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'चहा टपरी'चा होणार लवकर कायापालट -
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या स्टेशनवर चहा विकायचे त्या स्टेशनचा लवकरच कायपालट होणार आहे.

  • नरेंद्र मोदी आपल्या लहानपणी ज्या स्टेशनवर चहा विकायचे त्याचं नाव 'वडनगर रेल्वे स्टेशन'. वडनगर रेल्वे स्टेशनला एक नवं रुप देण्यासाठी सरकारकडून ८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, 

  • वडनगर रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी जवळपास ८ कोटी रुपये स्वीकारण्यात आल्याचीही माहिती त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान दिली. 

  • २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा 'वडिलांसोबत वडनगर स्टेशनवर चहा विक्री केली', असा उल्लेख केला आहे.

  • पंतप्रधान मोदींची जन्मभूमीदेखील आहे. 

दिनविशेष -

जागतिक दिवस

  • वसुंधरा दिन : २२ एप्रिल १९७२

जन्म, वाढदिवस

  • साहित्य समीक्षक डॉ. अशोक रामचंद्र केळकर : २२ एप्रिल १९२९

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन 

  • --

ठळक घटना 

  • आचार्य विनोबा भावे यांनी संपूर्ण होगत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले : २२ एप्रिल १९७९

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.