चालू घडामोडी - २२ ऑगस्ट २०१७

Date : 22 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सुप्रीम कोर्ट कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर ६ महिने बंदी
  • गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी सुप्रीम कोर्टात निकाल वाचन सुरू झाले असून पाच न्यायाधीशांचे घटनापीठ देणार असलेल्या या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

  • देशभरातील मुस्लिम महिलांचं या निकालाकडे लक्ष लागले आहे.

  • मुस्लिम समुदायातील तिहेरी तलाकची प्रथा वैध आहे की अवैध?,  तिहेरी तलाकमुळे महिलांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत आहे की नाही, यावर कोर्ट निर्णय देणार आहे.  

  • निकाल सुनावणाऱ्या घटनापीठात पाच धर्मांच्या न्यायमूर्तींचा समावेश आहे. सरन्यायाधीश जे.एस. खेहर (शीख), कुरियन जोसेफ (ख्रिश्चन), आर.एफ. नरिमन (पारशी), यू.यू. ललित (हिंदू) आणि अब्दुल नजीर (मुस्लिम) यांचा समावेश आहे.

'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (इसिस) : जगातील धोकादायक संघटना
  • 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (इसिस) या दहशतवादी संघटनेचा इराक व सीरियातून बीमोड झाला असला तरी जगातील सर्वांत धोकादायक संघटना म्हणून गेल्या वर्षापर्यंत तिची ओळख होती.

  • मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालामध्ये याची नोंद करण्यात आली असून गेल्या आठवड्यात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

  • विद्यापीठाने जागतिक दहशतवादासंबंधीच्या संकलित केलेल्या माहितीनुसार 'इसिस' किंवा 'इस्लामिक स्टेट'ने (आयएस) गेल्या वर्षी चौदाशे हल्ले केले. त्यात सात हजार नागरिकांचा बळी गेला.

  • २०१५ च्या दहशतवादी कारवायांपेक्षा गेल्या वर्षीच्या हल्ल्यांमध्ये २० टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. जगाचा विचार करता २०१६ मध्ये दहशतवादी हल्ले आणि त्यातील मृत्यूचे प्रमाण दहा टक्‍क्‍याने वाढले होते.

  • स्पेनमधील बार्सिलोनामध्ये गेल्या आठवड्यात लास रामब्लास येथे वर्दळीच्या ठिकाणी व्हॅन घुसवून हल्ला केल्याचा दावा 'इसिस'ने केला आहे.

  • 'इसिस' शिवाय इराक आणि सीरियात गेल्या वर्षी अन्य दहशतवादी संघटनांनी केलेल्या हल्ल्यांची संख्या ९५० होती. यात तीन हजार नागरिक ठार झाले.

अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा प्रस्ताव मोदींना : सुब्रमण्यम स्वामी
  • अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या बाजूनेच न्यायालय निकाल देईल, अशी आशा भाजपचे खासदार सब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली आहे.

  • बाबरी मशीद बांधण्यापूर्वी त्या ठिकाणी एक मंदिर अस्तित्वात होते, असा अहवाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या दोन तज्ज्ञांच्या पथकाने दिला होता, असा दावाही त्यांनी केला.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधण्याचा प्रस्ताव संसदेत मांडावा, असे ते म्हणाले, या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच याबाबत निर्णय घेता येईल, असेही ते म्हणाले

  • अनेक दशकांपासून राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद सुरू आहे, या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अलाहाबादमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. या अहवालाच्या आधारावर .

  • भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि उमा भारती यांनी अयोध्येतील मशीद पाडली नाही, असा दावाही त्यांनी केला असून मुस्लिमांनी ४० हजार हिंदू मंदिरे तोडली होती. 

गुगलकडून 'अँड्रॉईड ओ' ही नवी ऑपरेटिंग सिस्टीमचे लाँच :
  • अँड्रॉईडच्या आत्तापर्यंतच्या सिस्टीम्सना खाद्यपदार्थांची नावे देण्यात आली असून त्याच पद्धतीनुसार या सिस्टीमला 'ओरियो' नाव देण्यात आले.

  • गुगलकडून 'अँड्रॉईड ओ' ही नवी ऑपरेटिंग सिस्टीमचे लाँच करण्यात आले आहे, न्यूयॉर्कमध्ये यासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

  • स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी 'अँड्रॉईड ओ'चे लाँचिंग करण्यात आले, गुगलकडून लॉन्च करण्यात आलेली नवी ऑपरेटिंग सिस्टीम अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे.

  • अँड्रॉईड ओ या सिस्टीममध्ये 'पिक्चर-इन-पिक्चर मोड' आणि नोटिफिकेशन डॉट अशी फिचर्स असणार आहेत.

  • पिक्चर इन पिक्चर मोडद्वारे आयकॉनच्या डिझाईनमध्ये बदल करता येणार आहेत. याशिवाय नवे इमोजीही उपलब्ध होणार आहेत.

क्रीडामंत्री विजय गोयल : अर्जुन पुरस्कारांचे नियम बदलणार
  • अर्जुन पुरस्कारापासून कुठलाही पात्र खेळाडू वंचित राहू नये, यासाठी क्रीडा मंत्रालय पात्रता नियमांत बदल करण्याच्या विचारात आहे.

  • नव्या बदलामुळे शिफारस न केलेल्या खेळाडूंच्या नावाचादेखील पुरस्कारासाठी विचार शक्य होणार आहे.

  • क्रीडामंत्री विजय गोयल यांनी पात्रता नियमात बदल करण्याबाबत पुढाकार घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

  • क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिका-याने सांगितले, की निवड समितीच्या विश्वसनीयतेवर कुठलीही शंका घेण्यात आली नाही. याशिवाय पारदर्शीपणा जपण्याचा निर्णय झाला आहे.

  • समितीत नेहमी प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असतो. पण पुढील वर्षी योजनेत संशोधन होईल. लवकरच नवे निर्देश निघतील.

  • तसेच यानुसार ज्या खेळाडूंच्या नावाची शिफारस झाली नसेल किंवा संबंधित महासंघाने त्याचे नाव पाठविले नसेल तरीही त्या खेळाडूच्या कामगिरीची दखल घेत पुरस्कारासाठी विचार केला जाईल.

टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती केल्याचा दावा :
  • हैदराबाद येथिल सतीशकुमार या मेकॅनिकल इंजिनिअरने संशोधनाद्वारे अशाच प्रकारे प्लॅस्टिकच्या पुनर्वापराचा एक पर्य़ाय शोधला आहे.

  • भारतात प्लॅस्टिकची मोठी समस्या असून त्यावर मात करण्यासाठी विविध संशोधने होत आहेत.

  • टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती केल्याचा दावा त्यांनी केला असून त्यांनी पुनर्वापरासाठी अनेकदा प्रक्रिया केल्यानंतर आणखी प्रक्रिया न होऊ शकणाऱ्या टाकाऊ प्लॅस्टिकपासून कृत्रीम इंधन तयार केले आहे.

  • सतीशकुमार यांच्या म्हणण्यानुसार, या टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीसाठी केवळ तीन टप्प्यातील रिव्हर्स इंजिनिअरिंगची प्रक्रिया वापरण्यात आली आहे.

  • टाकाऊ प्लॅस्टिक हे अप्रत्यक्षपणे निर्वात पोकळीत तापवले जाते, त्याला डिपॉलमराईज्ड करून वायूरूपात आल्यानंतर ते पुन्हा घनरुपात आणले जाते. त्यानंतर त्यावर विशिष्ट प्रक्रीया करून द्रवरूपात इंधन म्हणून वापरण्यात येते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला :
  • भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली असून गेल्या अनेक दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या लांबलेल्या युद्ध मोहिमेविषयी काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले. फोर्ट मायर या ठिकाणी त्यांनी अमेरिकन सैनिकांशी संवाद साधला.

  • गेल्या १६ वर्षांपासून अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून आहे, अजूनही विजय मिळवता न आल्यामुळे अमेरिकन जनतेला या युद्धाचा कंटाळा आला असून भूतकाळात अमेरिकन नेत्यांनी इराकमध्ये जी चूक केली ती आपल्याला पुन्हा करून चालणार नाही.

  • अफगाणिस्तानमधून एका झटक्यात सैन्य माघारी घेतल्यास कदाचित न स्विकारता येण्याजोगे परिणाम पाहायला मिळू शकतात. या गोष्टी टाळणे गरजेचे आहे. सप्टेंबर २०११ पूर्वी अशीच माघार घेतल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आयसिस व अल कायदाने फायदा घेतला.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • -

जन्म, वाढदिवस

  • चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता : २२ ऑगस्ट १९५५

  • मॅट्स विलँडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू : २२ ऑगस्ट १९६४

  • डेनिस पॅपिन, प्रेशर कुकरचा शोध लावणारे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ : २२ ऑगस्ट १६४७

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • किशोर साहू, अभिनेता व दिग्दर्शक : २२ ऑगस्ट १९८०

  • एकनाथजी रानडे, विवेकानंद केंद्राचे आद्य प्रवर्तक : २२ ऑगस्ट १९८२

ठळक घटना

  • जीन हेन्री यांनी आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेची स्थापना केली : २२ ऑगस्ट १८६४

  • भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना तयार करुन मॅडम भिकाजी कामा यांनी तो प्रदर्शित केला : २२ ऑगस्ट १९०७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.