चालू घडामोडी - २३ ऑगस्ट २०१७

Date : 23 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ब्लू व्हेल गेम; फेसबुक, गुगलस याहूला नोटीस : दिल्ली हायकोर्टाने
  • ब्लू व्हेल  गेम प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी फेसबुक, गुगल, याहू या कंपन्यांच्या भारतातील युनिट्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

  • ब्लू व्हेल गेमवर बंदी घालण्यासाठी कोणती पावलं उचलली, याची माहिती पुढील सुनावणी वेळी द्या, असे आदेशही दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.

  • भारतात ब्लू व्हेल गेममुळे अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत, या गेमच्या लिंक हटवण्याचे आदेश इंटरनेट कंपन्यांना देण्यात यावेत, अशा मागणीची याचिका  अॅड. गुरमीत सिंग यांनी कोर्टात दाखल केली होती.

  • मंगळवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली असून ब्लू व्हेल गेमवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी उत्तर द्यावं, त्याचा अहवालही सादर करावा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत

देशभरातील प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील १७ शहरांचा समावेश :
  • पर्यावरण विभागाच्या एकदिवसीय 'शुद्ध हवा संकल्प महाराष्ट्र' या विषयावरील राष्ट्रीय परिषेदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पोटे बोलत होते.

  • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या देशभरातील प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील १७ शहरांचा समावेश आहे.

  • राज्यमंत्री म्हणाले, 'देशात १२३ शहरे प्रदूषित आहेत. त्यात महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश आहे. प्रदूषणमुक्तीसाठी सरकार विविध उपाययोजना करीत असले, तरी प्रत्येकाने स्वच्छतेची सुरवात आपल्या घरापासून करावी.

  • प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे असे महानगरपालिकेने २५ टक्के निधी प्रदूषणाव्यतिरिक्त महत्त्वाच्या कामासाठी खर्च केला पाहिजे.'

  • हवेच्या गुणवत्तेची पातळी निर्धारित मानकापेक्षा अधिक असलेली शहरे :- अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर आणि उल्हासनगर.

बुद्धिबळातील ग्रॅण्डमास्टर किताबाचे चक्रव्यूह भेदण्यात यश : अभिमन्यू पुराणिक
  • अभिमन्यू हा राज्यातील सर्वांत कमी वयाचा ग्रॅण्डमास्टर ठरला आहे. सध्या त्याचे वय १७ वर्षे, ६ महिने आणि १९ दिवस इतके आहे. या आधी हा विक्रम नाशिकचा ग्रॅण्डमास्टर विदित गुजराथी याच्या नावावर होता.

  • बुद्धिबळाच्या क्षेत्रात पुण्याचे भूषण असलेला अभिमन्यू पुराणिक याने बुद्धिबळातील ग्रॅण्डमास्टर किताबाचे चक्रव्यूह भेदण्यात यश प्राप्त केले आहे.

  • ग्रॅण्डमास्टर हा किताब पटकावणारा अभिमन्यू हा पुण्यातील तिसरा, राज्यातील सातवा, तर देशातील ४९ वा बुद्धिबळपटू ठरला आहे.

  • २०१३ मध्ये १८ वर्षांचा असताना त्याने हा किताब मिळविला होता. अभिजित कुंटे आणि अक्षयराज कोरे हे पुणेकर अनुक्रमे वयाच्या २३ व्या व २४ व्या वर्षी ग्रॅण्डमास्टर बनले होते.

  • २५०० एलो रेटिंग गुणांचा टप्पा ओलांडत या १७ वर्षीय खेळाडूने २१ रोजी ग्रॅण्डमास्टर किताबासाठी आवश्यक तिसरा व अंतिम नॉर्म पूर्ण केला.

परदेशी विद्यापीठांमध्ये जाण्यासाठी स्कॉलरशिप : करारांतर्गत होणार
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची संधी ‘ईरासमस प्लस’ या प्रोजेक्ट अंतर्गत उपलब्ध झाली आहे.

  • यासाठी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपही देण्यात येणार आहे, त्याचबरोबर परदेशी विद्यापीठातील विद्यार्थी ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षणासाठी येऊ शकणार आहेत.

  • विजय खरे यांनी सांगितले, ‘‘युरोपीय संघाच्या एज्युकेशन युरो कल्चर अंतर्गत ‘सोसायटी, पॉलिटिक्स अँड कल्चर इन ग्लोबल काँटेक्स्ट’ याअंतर्गत संयुक्त पदवी देण्यात येणार आहे. 

  • युरोपीय संघाच्या ‘ईरासमस प्लस’ हा प्रकल्प राबविला जातो, सामाजिक क्षेत्रात नवीन उपक्रम तयार करून नवे उद्योजक तयार करण्यासाठी हा प्रकल्प युरोपियन संघाच्या वतीने राबविण्यात येतो.

  • विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. यावेळी प्रभारी कुलसचिव अरविंद शाळीग्राम, आंतरराष्टÑीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे उपस्थित होते.

  • इस्राईलचे आंतरविद्याशाखा प्रणाली केंद्र (हरजेलिया) हे याचे मुख्य संयोजक आहेत. इस्राइलमधील ओरेनीम कॉलेज आॅफ एज्युकेशन, किब्बज, सफायर अ‍ॅकेडमिक, तेल-हाय अ‍ॅकेडमिक कॉलेज साकलेन, जर्मनीतील टेक्निशियन विद्यापीठ (बर्लिन), ईडनबर्ग विद्यापीठ (इंग्लंड), वेलशेस वेन (क्रोएशिया), टेक्निको विद्यापीठ (पोर्तुगाल), कलिंगा विद्यापीठ (ओरिसा) यांचा यामध्ये समावेश आहे.

दाऊद इब्राहिम तीन पत्ते आणि २१ नावांनिशी पाकिस्तानमध्ये वास्तव्यास :
  • मोस्ट वाँटेड दहशतवादी म्हणून ७ नोव्हेंबर २००३ मध्ये दाऊदविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर अटक वॉरंट जारी करण्यात आले असून त्यानंतर तो पाकिस्तानमध्येच वास्तव्यास असल्याते समोर आले.

  • अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये तीन वेगवेगळ्या पत्त्यावर आणि 21 नावांनिशी राहत असल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंडच्या महसूल विभागाने आज ही माहिती उघड केली आहे.

  • इंग्लंडच्या वित्त मंत्रालयाने सोमवारी 'फायनँशियल सेक्शन्स टार्गेट्स इन द यूके' या नावाने यादी जारी केली आहे, यामध्ये दाऊद इब्राहिम कासकर या नावाने खोली क्रमांक ३७, डिफेन्स रोड, हाऊसिंग अ‍ॅथॉरिटी, कराची, पाकिस्तान.

  • तर दुसरा पत्ता खोली क्रमांक २९, मरगाला रोड, एफ ६-२ स्ट्रीट नंबर २२, कराची, पाकिस्तान. नूरबाद, पाकिस्तान, कराची, (त्याशिवाय पाकिस्तान पलातियाल बंगला, हिल परिसर) आणि व्हाईट हाऊस, सौदी मशिदीजवळ, किल्फटन, कराची, पाकिस्तान. असे गोंधळवून टाकणारे पत्ते त्याने दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल तिहेरी तलाक घटनाबाह्य :
  • पतीने एकाच वेळी लागोपाठ तीन वेळा 'तलाक' म्हणून पत्नीला सोडचिठ्ठी देण्याची हनाफी सुन्नी मुस्लीम समाजामधील १४०० वर्षांपासूनची प्रचलित प्रथा सर्वोच्च न्यायालयाने २२ ऑगस्ट रोजी घटनाबाह्य ठरवून रद्दबातल केली.

  • सामाजिक आणि राजकीयदृष्ट्याही अत्यंत संवेदनशील अशा या विषयावरील हा निकाल पाच बहुधर्मीय न्यायाधीशांच्या घटनापीठाने ३ विरुद्ध २ अशा बहुमताने दिला.

  • सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग खेहर व न्या. एस. अब्दुल नझीर यांनी तिहेरी तलाक रद्द करण्यास नकार दिला. तर न्या. कुरियन जोसेफ, न्या. रोहिंग्टन फली नरिमन आणि न्या. उदय उमेश लळित यांनी ही प्रथा घटनाबाह्य आणि बेकायदा असल्याचे जाहीर केले.

  • तसेच यानुसार ३:२ बहुमताच्या निर्णयाने 'तलाक-ए-बिद्दत' म्हणजेच तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य ठरवून रद्द केली गेली.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • -

जन्म, वाढदिवस

  • मलाइका अरोरा खान, हिंदी चित्रपट अभिनेत्री : २३ ऑगस्ट १९७३

  • हॅमिल्टन ओ. स्मिथ, अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ : २३ ऑगस्ट १९३१

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • मूळ शामू, सीवर्ल्डमधील ओर्का देवमासा : २३ ऑगस्ट १९७१

  • चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ : २३ ऑगस्ट १८०६

ठळक घटना

  • मराठवाडा विद्यापिठाचा प्रारंभ : २३ ऑगस्ट १९५८

  • विजापूरच्या आदिलशहाचा 'वजीर मरार जगदेव' याने परिंडा किल्ल्यावर मोगलांच्या ताब्यात असलेली मुलुक-ए-मैदान तोफ विजापूर येथे आणली : २३ ऑगस्ट १६३२

  • पहिल्या महायुद्धातील एकमेव श्यामवर्णीय वैमानिक युजीन बुलार्ड याला मृत्युपश्चात सेकंड लेफ्टनंटचे पद देण्यात आले : २३ ऑगस्ट १९९४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.