चालू घडामोडी - २३ जून २०१७

Date : 23 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सर्वात छोट्या उपग्रहाचे प्रक्षेपण :
  • तामिळनाडूतील विद्यार्थ्यांच्या एका संघाने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यांनी तयार केलेल्या जगातील सर्वात छोट्या उपग्रहाचे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने प्रक्षेपण केले.

  • उपग्रहाचे वजन केवळ ६४ ग्रॅम आहे.

  • तामिळनाडूच्या पल्लापट्टी येथील रिफाथ शारुक या विद्यार्थ्याने नासासाठी जगातील सर्वात छोटा आणि हलका उपग्रह तयार केला होता. त्याचे प्रक्षेपण करून रिफाथ व त्याच्या सहकाऱ्यांनी जागतिक अंतराळ क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला.

  • ‘कलामसॅट’ असे या उपग्रहाचे नाव आहे. भारताचे मिसाइल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावरून ते ठेवण्यात आले होते.

ध्वनिक्षेपकास शांतता क्षेत्रात परवानगी नाही :
  • 'शांतता क्षेत्रात' मोडणाऱ्या माहीम पोलीस ठाण्यातच उरूसदरम्यान ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली.

  • 'शांतता क्षेत्रात' ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी न देण्याचा आदेश राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आला असून हि माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली.

  • सरकारने दिलेल्या या माहितीनंतर उच्च न्यायालयाने माहीम पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांवर काढलेली अवमान नोटीस रद्द केली.

  • उच्च न्यायालयाने माहीम पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना व साहाय्यक पोलीस आयुक्तांना अवमान नोटीस बजावली. गेल्या सुनावणीत दोन्ही अधिकाऱ्यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली.

कर्जमाफीच्या मुद्दयावर मुख्यमंत्री आणि शरद पवारांची दिल्लीत बैठक :
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेळापूर्वीच दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

  • त्यानंतर मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ६ जनपथकडे रवाना झाले आहेत.

  • शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात बैठक होणार असल्याचं समजतं आहे. दरम्यान, या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रकांत  पाटीलही हजर असणार आहेत.

साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार ल.म. कडू यांना जाहीर :
  • कोकणी भाषेतील युवा पुरस्कार अमेय विश्राम नाईक यांना (मोग डॉट कॉम हा काव्यसंग्रह) आणि विन्सी क्वाड्रोस यांना (जादूचे पेतुल कादंबरी) बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • मराठी साहित्यासाठीचा यंदाचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार ल.म. कडू यांना तर युवा पुरस्कार राहुल कोसंबी यांना जाहीर झाला.

  • तसेच ताम्रपत्र व ५० हजार रुपये रोख असे या पुरस्कारांचे स्वरूप असून १४ नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात ते प्रदान करण्यात येतील.

  • अकादमीचे अध्यक्ष प्रा. विश्वनाथ त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या गुवाहाटी येथे झालेल्या बैठकीत २४ भाषांमधील साहित्याची बालसाहित्य पुरस्कार व युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

धूत ट्रान्समिशन स्कॉटलंडची कंपनी खरेदी करणार :
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या करारामुळे धूत ट्रान्समिशनला पश्चिम युरोपातील बाजारपेठेत अधिक जोरकसपणे प्रवेश करणे सुकर होईल.

  • मुंबईस्थित गुंतवणूक बँक सिंगी अ‍ॅडव्हायजर्स हे या व्यवहाराचे सल्लागार आहेत.

  • जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी 'धूत ट्रान्समिशन' या कंपनीने स्कॉटलंडमधील 'टीएफसी केबल्स असेंब्लिज लिमिटेड' ही कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून तसेच युरोपमध्ये व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने कंपनीचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

…तोपर्यंत टीम इंडियाला कुंबळेंच्या राजीनाम्याची कल्पना नव्हती !
  • टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनामानाट्यानंतर रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

  • कुंबळे आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात सहा महिन्यांपासून संवाद नसल्याचं समोर आल्यानंतर आता आणखी एक नवीन बाब उघड झाली आहे.

  • कुंबळे हे आपल्यासोबत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर येणार नाहीत, याची कल्पनाही संघातील खेळाडूंना नव्हती. लंडनहून खेळाडू वेस्ट इंडिजला रवाना झाले तरी याबाबत ते अनभिज्ञ होते. इतकेच नाही तर, खेळाडू सेंट लुसियात पोहोचले आणि त्यांनी आपले मोबाईल फोन स्वीच ऑन केल्यानंतर कुंबळेंनी राजीनामा दिल्याचे त्यांना समजले.

दिनविशेष :

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचे श्रीनगर आंदोलनात स्थानबध्द असताना निधन झाले : २३ जून १९५३

  • श्रीमती इंदिरा गांधी यांचे दुसरे सुपुत्र संजय गांधी यांचे विमान अपघातात दिल्ली येथे निधन : २३ जून १९८०

  • कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व मुंबईचे माजी महापौर स. का. पाटील यांचे निधन : २३ जून 

ठळक घटना

  • भारतीय नभोवाणी प्रारंभ : २३ जून १९२७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.