चालू घडामोडी - २४ ऑगस्ट २०१७

Date : 24 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लंकेला पराभूत करण्यासाठी भारत सज्ज : दुसरी वन डे आज
  • कसोटी कर्णधार आणि सर्वांत आक्रमक फलंदाज दिनेश चंदीमल याला अंतिम एकादशमध्ये स्थान देण्यात आले नाही तर चंदीमल खेळतो त्या चौथ्या स्थानावर डावाला सुरुवात करणारा कर्णधार उपुल थरंगा स्वत: फलंदाजी करीत आहे.

  • लंकेला २०१९च्या विश्वचषकाची पात्रता मिळविण्यासाठी किमान दोन वन-डे जिंकावे लागतील. असे न झाल्यास ३० सप्टेंबरपर्यंतच्या मर्यादेत वेस्ट इंडिजच्या तुलनेत हा संघ मागे पडेल.

  • विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ दुसºया वन डेत आज गुरुवारी श्रीलंकेवर पुन्हा एक विजय नोंदवून विजयाचा अश्वमेध दौडत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कसोटी मालिकेत ३-० ने ‘क्लीन स्विप’ करणा-या भारतीय संघाने पहिला वन डेदेखील नऊ गडी राखून सहज जिंकला होता.

  • लंकेचे गोलंदाज भारतीय संघाला आॅल आऊट करण्यात अपयशी ठरल्याने निवडकर्त्यांवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

  • कसोटी मालिकेदरम्यान पहिल्या आणि सातव्या स्थानावरील संघांमधील फरक स्पष्टपणे जाणवला. दाम्बुला येथे वन डेत तिसºया स्थानावरील भारत आणि आठव्या स्थानावरील लंका संघाच्या कामगिरीत किती तफावत आहे, हे दिसून आले.

  • त्यासाठी लंकेच्या फलंदाजांना जबाबदारीने खेळावे लागेल. या संघातील आघाडीचे फलंदाज धावा काढतात; पण मध्यम आणि तळाचे फलंदाज योगदान देत नाहीत, ही मुख्य समस्या आहे.

रेल्वे बोर्डाच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती : अश्विनी लोहानी
  • एकाच आठवड्यात दोन मोठे रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे बोर्डचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांनी राजीनामा दिला होता, त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता.

  • एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) अश्विनी लोहानी यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे असून यासंबंधी आदेश जारी करण्यात आला आहे.

  • दुसरीकडे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवला होता, परंतु, मोदींनी त्यांचा राजीनामा फेटाळला आहे.

  • अपघातानंतर सुरेश प्रभूंनी उत्कल एक्स्प्रेसची जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले होते.

  • रेल्वेने मोठी कारवाई करत उत्तर रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक आर.एन. कुलश्रेष्ठ आणि दिल्ली विभागाचे  डीआरएम आर.एन. सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. काही अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते.

सुमारे नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर कर्नल पुरोहित तुरुंगाबाहेर :
  • २२ ऑगस्ट रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयाने औपचारिकता पूर्ण केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगातून सोडण्याचे आदेश देण्यात आले.

  • २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर लेप्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित हे नऊ वर्षांनी कारागृहाबाहेर पडले.

  • नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून पुरोहितांची सुटका करण्यात आली.

  • प्रसाद पुरोहित यांनी लवकरात लवकर लष्करात रुजू होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, ते मुळचे पुण्याचे रहिवाशी आहेत.

मुंबईतील प्रो-कबड्डी सामन्यांसाठी मिळाला मान अमृता फडणवीस गाणार राष्ट्रगीत :
  • अमृता फडणवीस या क्रीडाप्रेमी असून मुंबईत होत असलेल्या आगामी महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या त्या आश्रयदाता आहेत. तसेच, यंदा पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या डेव्हिस कप स्पर्धेसाठीही अमृता फडणवीस मुख्य आश्रयदाता होत्या.

  • प्रो-कबड्डी लीग स्पर्धेचे २५ आॅगस्टपासून मुंबईमध्ये सामने खेळविले जाणार आहेत विशेष म्हणजे शुक्रवारी होत असलेल्या यजमान यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स सामन्याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस राष्ट्रगीत गाणार आहेत.

  • शालेय जीवनामध्ये टेनिसपटू असलेल्या अमृता यांनी १६ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्वही केले आहे.

  • गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मुंबईतील वरळी येथील एनएससीआय स्टेडियममध्ये कबड्डी सामने सुरू होत असून यावेळी अमृता फडणवीस यांना राष्ट्रगीत गाण्याचा मान देण्यात आला आहे.

जिओ फोनची प्री-बुकिंग आज संध्याकाळी पाच वाजता होणार सुरू : ५०० रूपयात होणार बुकिंग
  • रिलायन्स कंपनीच्या बहुचर्चित जिओ फोनची प्री-बुकिंग गुरूवारी संध्याकाळी पाच वाजता सुरू होणार असून ५० कोटी मोबाइल यूजर्सपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचा निर्धार कंपनीनं केला आहे.

  • हा फोन पूर्णपणे 'मेड इन इंडिया' असून त्याचं वर्णन रिलायन्सनं 'इंडिया का इंटेलिजन्ट फोन' असं केलं आहे. तसंच प्रत्येक आठवड्याला ५० लाख फोनची निर्मिती करण्याचं लक्ष रिलायन्सने समोर ठेवलं आहे. 

  • कंपनीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिओफोनची बुकिंग २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता सुरू होईल. या फोनचं प्री-बुकिंग करण्यासाठी ग्राहकाला ५०० रूपये भरावे लागणार आहेत.

  • रिलायन्सच्या वेबासाइटवर, मायजिओ अॅपवर आणि रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये फोनचं प्री-बुकिंग केलं जाईल.

  • कंपनीने या फोनची किंमत सिक्युरिटी डिपॉझिटच्या माध्यमातून १५०० रुपये ठेवली आहे, तीन वर्षांनंतर या पैशांचा पूर्ण रिफंड ग्राहकांना मिळणार आहे, प्री बुकिंग करतान ग्राहकांना ५०० रुपये भरावे लागणार आहेत, तर उर्वरीत १००० रूपये फोन मिळाल्यानंतर भरायचे आहेत. 

समाजकल्याणच्या आणखी दोन योजना मंजूर :
  • समाजकल्याण विभागाकडून लाभार्थींच्या योजना गेल्या दोन वर्षांत रखडल्या, त्यामुळे गेल्यावर्षी निवड झाल्यानंतरही लाभार्थींना वस्तूंचे वाटप झाले नाही.

  • जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या १ कोटी ९३ लाख रुपयांच्या योजनांसोबतच आणखी ४९ लाख रुपयांच्या खर्चातून दोन योजना राबवण्यास समितीच्या झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

  • त्यानुसार रोटाव्हेटर आणि टिनपत्र्यांसाठी १८ सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे निश्‍चित केल्याचे सभापती रेखा देवानंद अंभोरे यांनी सांगितले असून चालू वर्षी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांना लाभ कोणत्याही परिस्थितीत मिळणे आवश्यक आहे.

  • यामध्ये लाभार्थींना एचडीपीई पाइप, प्लास्टिक ताडपत्री, पेट्रोकेरोसिन पंप, डीझल पंप, इलेक्ट्रिक पंप, पीव्हीसी पाइप, दिव्यांग लाभार्थींना पिठाची गिरणी, तीनचाकी सायकल, झेरॉक्स मशीनचा पुरवठा करण्याच्या योजनांचा समावेश आहे.

  • तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळालेल्या योजनांसाठी लाभार्थी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • -

जन्म/वाढदिवस

  • मराठी साहित्यिक न. चिं. केळकर जन्मदिन : २४ ऑगस्ट १८७२

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • क्रिकेटमहर्षि दि. ब. देवधर यांचे निधन  : २४ ऑगस्ट १९९३

  • थोर समाजसुधारक व शिक्षणतज्ञ रा. गो. भांडारकर यांचे निधन : २४ ऑगस्ट १९२५

ठळक घटना

  • राममनोहर लोहिया यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली : २४ ऑगस्ट १९५५

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.