चालू घडामोडी - २४ मे २०१७

Date : 24 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवांचं पीक :
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाबाबत सध्या सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे.

  • त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचं वातावरण आहे.

  • दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांबाबत वेगवेगळे मेसेज फिरत आहेत. यामध्ये बारावीचा निकाल २५ मे तर दहावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर होणार असल्याचं म्हटलं आहे.

  • मागील वर्षी बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाला होता. त्यामुळे काहींनी यंदाचा निकालही २५ मे रोजी जाहीर होणार असल्याचा मेसेज व्हायरल केला. परिणामी विद्यार्थीही संभ्रमात पडले आहे.

  • मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या निकालाच्या तारखा अधिकृत नाहीत. बोर्डाने निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन बोर्डातर्फे करण्यात आलं आहे.

मेलेनियाने पुन्हा करुन दाखवलं, ट्रम्प यांच्या 'हाती' निराशा : 
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा आपल्या पत्नीचा हात हातात घेण्याचा प्रयत्न फसलेला दिसला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हात पकडण्यासाठी आपला हात पुढे केला असता मेलेनिया ट्रम्प यांनी केसांना हात लावण्याच्या बहाण्याने अत्यंत चतुराईने हात लांब केला.

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वांसमोर पंचाईत झाल्याचं दिसत असून हा सर्व प्रकार कॅमे-यात कैद झाला असून हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपली पत्नी मेलेनिया ट्रम्पसोबत रोमला पोहोचले असता विमानाच्या दरवाजात उभं राहून उपस्थितांना हात दाखवत होते. यावेळी विमानाच्या पाय-या उतरताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलेनिया ट्रम्पच्या हातात हात देण्याचा प्रयत्न केला.

  • मेलेनिया ट्रम्प यांनी केस नीट करण्याच्या बहाण्याने अप्रत्यक्षपणे नकारच देऊन टाकला. आपली पंचाईत झाल्याचं लक्षात येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला हात पत्नीच्या पाठीवर ठेवत चालण्यास सुरुवात केली आणि सर्वकाही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. या दौ-यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पोप फ्रान्सिस यांची भेट घेणार आहेत.

मुस्लीम बोर्डाचे प्रतिज्ञापत्र ही निव्वळ धूळफेक - रोहटगी
  • ‘ट्रिपल तलाक’च्या प्रश्नावर ‘आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने समाजासाठी आणि काझींसाठी तयार केलेली मार्गदर्शिका आणि त्याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सादर केलेले प्रतिज्ञापत्र ही निव्वळ धुळफेक आणि समाजात थोडीफार वैधता मिळविण्यासाठी केलेली शेवटची धडपड आहे, अशी टीका अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी मंगळवारी केली.

  • असा प्रश्न उपस्थित करून रोहटगी म्हणाले की, सर्वांचा युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवला गेल्यानंतर बोर्डाने असे करणे हा न्यायालयाचे लक्ष भलतीकडे वळविण्याचा प्रकार आहे.

  • रोहटगी असेही म्हणाले की, माझ्या मते बोर्डाचे ताजे प्रतिज्ञापत्र ही धूळफेक आहे. बोर्डाला स्वत:ला काही वैधता नाही. ते मुस्लीम समाजातील किती लोकांच्या वतीने हे म्हणणे मांडत आहेत, हेही कळायला मार्ग नाही.

  • बोर्डाने सल्ला दिला म्हणून ‘निकाह’च्या वेळी किती काझी नवरदेवाला ‘ट्रिपल तलाक’ न देण्याबाबत सांगून तशी अट निकाहनाम्यात घालतील हेही स्पष्ट नाही.

‘मानवी ढाल’ करण्याचा निर्णय योग्यच, लष्कर प्रमुखांकडून मेजर गोगोईंचे कौतुक :
  • मेजर गोगोई काश्मीर खोऱ्यात अतिशय प्रतिकूल स्थितीत काम करत असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पुरस्कार देण्यात आल्याचे रावत यांनी म्हटले.

  • काश्मिरी व्यक्तीचा मानवी ढाल म्हणून वापर करणाऱ्या मेजर गोगोई यांचा करण्यात आलेला सन्मान योग्यच असल्याचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले आहे.

  • मेजर नितीन गोगोई यांनी दगडफेक करणाऱ्या जमावापासून बचाव करण्यासाठी एका व्यक्तीला लष्कराच्या जीपसमोर बांधले होते. मेजर गोगोई यांच्या या निर्णयाचे लष्कर प्रमुखांनी कौतुक केले आहे.

  • ‘गोगोई यांना देण्यात आलेल्या सन्मानामुळे सुरक्षा दलांचा आत्मविश्वास उंचावेल,’ असे बिपीन रावत यांनी म्हटल्याचे वृत्त ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिले आहे. ‘काश्मीर खोऱ्यातील हिंसेच्या घटनांना आळा घालून शांतता प्रस्थापित करणे, ही सैन्याची जबाबदारी आहे.

  • यामुळे जवानांचे मनोधैर्य उंचावेल आणि ते परिस्थिती हाताबाहेर जाऊ देणार नाहीत,’ असे लष्कर प्रमुखांनी म्हटले.

ऑलिम्पिकमध्ये पुन्हा पदक जिंकण्याची साक्षीला खात्री :
  • कुस्ती म्हणजे माझ्यासाठी देवाची प्रार्थना म्हणण्यासारखेच असून पुढच्या ऑलिम्पिकमध्ये पुन्हा पदक मिळवीन, असा आत्मविश्वास ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने व्यक्त केला.

  • साक्षीने गतवर्षी रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले व ऑलिम्पिक पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू होण्याचा मान पटकाविला.

  • ‘लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारी पहिली महिला कुस्तीपटू होण्याचे माझे स्वप्न आहे. मला समाजात जे काही स्थान मिळाले आहे, ते केवळ कुस्तीमुळेच. कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही. त्याकरिता खूप मेहनत घ्यावी लागते हे खेळामुळे कळू शकले.’

  • पॅरिस येथे ऑगस्टमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार असून, त्यामध्ये अव्वल कामगिरी करण्यासाठी मी सराव करीत आहे.

  • परदेशी महिला खेळाडू विवाहित असून काही खेळाडूंना दोन-तीन अपत्येही आहेत. या खेळाडू अजूनही ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करीत आहेत.’

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • सुप्रसिध्द डॉ. शास्त्रज्ञ ले. खर्नल कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांचा जन्म : २४ मे १८४९

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • लोकसभेचे माजी अध्यक्ष के. ऎस. हेगडे यांचा मृत्यू : २४ मे १९९०

  • ज्येष्ठ पत्रकार दि.र आ. भहगवत यांचे निधन : २४ मे १९९२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.