चालू घडामोडी - २७ मे २०१७

Date : 27 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘पीएफ’साठी सक्तीचे योगदान १० टक्क्यांपर्यंत घटण्याचे संकेत
  • कामगारांच्या निवृत्ती निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘कर्मचारी भविष्य निधी संघटना – ईपीएफओ’चे निर्णायक मंडळ असलेल्या विश्वस्त समितीच्या शनिवारी पुण्यात नियोजित बैठकीत, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी अर्थात ईपीएफसाठी दरमहा सक्तीचे योगदान हे सध्याच्या मूळ वेतनाच्या १२ टक्क्य़ांवरून १० टक्क्य़ांवर आणण्याचा निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे.

  • असा निर्णय घेतला गेल्यास कर्मचाऱ्यांच्या योगदानाप्रमाणे पीएफमधील नियोक्त्यांचे अंशदानही १० टक्क्य़ावर येईल.

  • योगदानाची मर्यादा कमी करण्याबाबत अनेकांकडून आलेल्या शिफारसी लक्षात घेत  केंद्रीय कामगार मंत्रालयाने हा प्रस्ताव पुढे आणला आहे.

  • कामगारांकडे दरमहा खर्च व उत्पन्नाची तोंडमिळवणी करताना थोडा अधिक पैसा हाती राहील आणि नियोक्त्याचे दायित्वही कमी झाल्याने तो पैसा व्यवसायवाढीसाठी वळल्याने अर्थव्यवस्थेसाठी ते फायदेशीर ठरेल, असे या प्रस्तावामागे कारण पुढे करण्यात आले आहे.

'सचिन..अ बिलिअन ड्रीम्स' हा सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त :
  • ब्रिटीश दिग्दर्शक जेम्स एर्स्किन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. देशभरातील सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, सचिनच्या आयुष्यातील अनेक माहिती नसलेल्या गोष्टी या चित्रपटातून समजणार आहेत.

  • भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारीत 'सचिन..अ बिलिअन ड्रीम्स' हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त झाला आहे.

  • क्रीडा क्षेत्रात सचिन दिलेल्या योगदानाचा सन्मान आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा या दुहेरी उद्देशाने महाराष्ट्र सरकारने या चित्रपटावरील मनोरंजन कर माफ केला आहे.

  • तसेच ओडिसा, केरळ आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये हा चित्रपट आधीच करमुक्त झाला आहे.

पुरुषाच्या मेंदूचा आकार मोठा; परंतु महिलांचा वेगवान
  • वैज्ञानिक पातळीवर वस्तुस्थिती अशी आहे की, महिलांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत छोटा आहे; परंतु मेंदू छोटा असूनही महिला पुरुषांबरोबर किंवा कधी-कधी त्यांच्यापेक्षाही जास्त चांगले काम करतात.

  • पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मेंदू १४ टक्के लहान असतो. छोट्या मेंदूूबद्दल वैज्ञानिकांचे म्हणणे असे आहे की, पुरुषांकडे ब्रेन सेल्सची संख्या जास्त आहे, तर महिलांकडे ब्रेन सेल्सची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी आहे.

  • बे्रन सेल्सची उपलब्धताच कोणत्याही व्यक्तीच्या मेंदूचा आकार सांगत असते. वैज्ञानिक संशोधनात हे स्पष्ट झाले की, पुरुष आणि स्त्री यांना मनोवैज्ञानिक रूपाने वेगळे करणे आतापर्यंत तरी अशक्य बनले होते; परंतु मेंदूचा आकार विचारात घेऊन दोघांच्याही मनोविज्ञानाबद्दल माहीत करून घेता येईल.

  • महिलांच्या मेंदूचा आकार जरी लहान असला तरी पुरुषांच्या तुलनेत त्या कौशल्याने त्याचा वापर करतात. वैज्ञानिकांचे म्हणणे असे आहे की, पुरुषांकडे भलेही ब्रेन सेल्सचे भांडार असेल; परंतु महिलांकडे युक्तिवाद आणि न्यूरॉन यांच्यामध्ये उत्तम नाते असते.

'सुपरकॉप' के पी एस गिल कालवश :
  • खलिस्तानी दहशतवादाचे आव्हान समूळ नष्ट करणाऱ्या गिल यांना तत्कालीन माध्यमांनी 'सुपरकॉप' अशी पदवी बहाल केली होती. गिल यांनी पंजाब राज्याचे पोलिस महासंचालक पद दोनदा भूषविले होते.

  • पंजाबमधील खलिस्तानी दहशतवादाचा नि:पात करण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडलेल्या के पी एस गिल यांचे २६ मे रोजी दुपारी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

  • निवृत्तीनंतर गिल यांची नियुक्ती भारतीय हॉकी संघटनेच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती. गिल यांना १९८९ मध्ये पद्मश्रीनेही गौरविण्यात आले होते.

चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास :
  • दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका व वेस्ट इंडिजने प्रत्येकी एकदा जेतेपद मिळवले आहे.

  • आतापर्यंत सातवेळा खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी दोनवेळा बाजी मारली आहे.

  • २००२ साली भारत व श्रीलंकेला पावसाच्या व्यत्ययामुळे संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले.

  • क्रिकेटच्या इतिहासामध्ये न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आयसीसी स्पर्धा म्हणून केवळ याच स्पर्धेचे विजेतेपद आहे.

  • दोन महिन्यांच्या आयपीएल सर्कसनंतर क्रिकेटप्रेमींना वेध लागले ते आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे. आयसीसी क्रमवारीतील अव्वल आठ संघांमध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा यंदा 'चॅम्पियन्सचा वर्ल्डकप' म्हणूनही ओळखली जात आहे.

  • विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारतीय संघ गतविजेता असल्याने भारतीयांची उत्सुकता ताणली आहे.

महाराष्ट्र टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय पाटील :
  • पुणेस्थित एमटीई सोसायटीच्या संस्थेच्या मालकीवरून सध्या न्यायालयीन स्तरावर वाद सुरू आहे. सचिव श्रीराम कानिटकर यांच्या गटाचे अध्यक्ष म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख सध्या कार्यरत आहेत.

  • वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी खासदार संजय पाटील यांची निवड झाली आहे.

  • तसेच त्याचा उच्चार वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सातव्या पदवीदान समारंभात करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार पाटील यांनी वालचंद महाविद्यालयाच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर होतील, असा विश्‍वास व्यक्त केला.

  • संस्थेचे पुण्यात होमिओपॅथी महाविद्यालय असून सांगलीत वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मालकीचा दावा देशमुख गटाने केला असून आता या वादाला खासदार पाटील यांच्या निवडीने दोन्ही बाजूने भाजप अंतर्गत संघर्षाचा राजकीय रंग मिळाला आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • मातृ दिन : बॉलिव्हिया

  • बाल दिन : नायजेरिया

जन्म, वाढदिवस

  • डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे, कादंबरीकार, कवी, मर्मग्राही समीक्षक : २७ मे १३३२

  • इब्न खल्दून, ट्युनिसीयाचा इतिहासकार : २७ मे १९३८

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान : २७ मे १९६४

  • प्रा. अरविंद मंगरुळकर, संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक : २७ मे १९८६

ठळक घटना

  • फोर्ड मोटर कंपनीने मॉडेल टी कारचे उत्पादन बंद केले व मॉडेल ए तयार करणे सुरू केले : २७ मे १९२७

  • दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रूझवेल्टने आणीबाणी जाहीर केली : २७ मे १९४१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.