चालू घडामोडी - २८ मे २०१७

Date : 28 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
तीन वर्ष पूर्ण झाली, जनतेला उत्तर देणे सरकारचं काम : मोदी
  • सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. जनतेला उत्तर देणे सरकारचं काम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये म्हटले आहे.

  • महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओवरुन मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत असतात.

  • मन की बात या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली अर्पण केली.

  • आज स्वातंत्रवीर सावरकरांची जयंती , देशातील तरूणांना स्वातंत्र्यसैनीक आणि त्यांच्या आयुष्याबद्दल रुची आहे , ही महत्त्वाची गोष्ट आहे.

  • मुंबईतील वर्सोवा समुद्र किनारा स्वच्छ करणाऱ्या अफरोज शाहचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये कौतूक केले.

न्यूझीलंडविरुद्ध आज पहिला सराव सामना :
  • आयपीएलचा मोसम संपला. आता काही दिवसांमध्ये चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार असून त्यापूर्वी काही सराव सामने खेळण्याची संधी सर्वच संघांना मिळणार आहे.

  • अजिंक्य रहाणे आणि केदार जाधव यांच्या कामगिरीवरही साऱ्यांची नजर असेल. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, अश्विन, शमी, उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावर भारताची मदार असेल.

  • आयपीएलमध्ये कोहलीची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नव्हती. या लीगमध्ये त्याला फक्त ३०८ धावाच करता आल्या होत्या. दुखापतीमुळे अश्विन आयपीएलमधील एकही सामना खेळू शकला नव्हती.  

  • युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी हे संघातील अनुभवी खेळाडू असून त्यांची कामगिरी पाहणे उत्सुकतेचे असेल. मुंबई इंडियन्सने यंदाचे जेतेपद पटकावले असले तरी रोहित शर्माला सूर गवसलेला पाहायला मिळाला नाही.

'सचिन ए बिलीयन ड्रीम्स'ची पहिल्या दिवशी ८.४० कोटींची कमाई : 
  • मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक ‘सचिन ए बिलीयन ड्रीम्स’ या सिनेमाने चांगली ओपनिंग मिळवली आहे. या सिनेमाने भारतात सर्व भाषांमध्ये मिळून ८.४० कोटींची कमाई केली आहे.

  • शुक्रवारी कामकाजाचा दिवस असूनही सिनेमाला चांगले प्रेक्षक मिळाले. त्यामुळे या वीकेंडलाही सिनेमा चांगला गल्ला जमवण्याची शक्यता आहे. २६ मे रोजी म्हणजे शुक्रवारी हिंदी, मराठी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे.

  • दरम्यान या सिनेमाला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा बायोपिक धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमाचा विक्रम मोडता आला नाही.

  • धोनीच्या बायोपिकने पहिल्याच दिवशी २१.३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. शिवाय हा सिनेमा २०१६ या वर्षात पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला होता.

  • सचिन ए बिलीयन ड्रीम्स भारतात २४०० आणि परदेशात ४०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.

CBSE class 12th results २०१७ : सीबीएसईमध्ये पुन्हा मुलींची बाजी : 
  • सीबीएसईच्या १२ वी परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. आज (रविवारी) सकाळी वेबसाईटवर हा निकाल जाहीर झाला.

  • नोएडा येथील अमिटी इंटरनॅशनल स्कूलमधील रक्षा गोपाळ हिने ९९.६ टक्के मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर चंदिगडमधील भूमी सावंत हिने ९९.४ टक्के मिळवत दुसऱ्या आणि चंदिगड येथील आदित्य जैन याने ९९.२ टक्के मिळवत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे.

  • केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. हा निकाल २४ मे रोजी लागणे अपेक्षित होते.

  • ९ मार्च ते २९ एप्रिलदरम्यान झालेल्या या परीक्षेला देशभरातून १०,९८,८९१ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ६,३८,८६५ मुली तर ४,६०,०२६ मुले होती. एकूण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक म्हणजेच २,५८,३२१ विद्यार्थी एकट्या दिल्ली केंद्रातील होते.

  • एकूण विद्यार्थ्यांपैकी २,४९७ दिव्यांग विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

पाच महिन्यांत देशातील ६० वाघ दगावले !
  • जानेवारी २०१७ ते मे २०१७ या कालावधीत मध्य प्रदेश ,कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि इतर अशा १० राज्यांमध्ये ह्या वाघांचा मृत्यू नोंदवला गेला आहे.  यात मध्यप्रदेश व कर्नाटक या दोन राज्यात पाच महिन्यांत सर्वाधिक प्रत्येकी १३ वाघांचा मृत्यू झाला.

  • गेल्या ०५ महिन्यांत देशात ६० वाघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. वाघांच्या मृत्यूच्या अधिकृत आकडेवारीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मृत पावलेल्या वाघांचे वयोमान ४ ते ८ वर्षांदरम्यान आहे.

  • दुसरीकडे महाराष्ट्रात आठ वाघांचे मृत्यू झाल्याचे यावेळी नोंदवण्यात आलं आहे. यामध्ये १४ जानेवारी रोजी खापा व पूर्व पेंच प्रकल्पात, १४ फेब्रुवारी रोजी कोलितमारा, १४ एप्रिल पेंच, मानसिंगदेव, २४ एप्रिल ब्रम्हपुरी, ३ मे सावली, १८ मे तळोधी व २६ मे रोजी चिचपल्ली येथे उष्माघातामुळे वाघिणीचा मृत्यू झाला आहे.

  • उत्तरप्रदेशात चार, तामिळनाडूमध्ये दोन तर छत्तीसगड, ओडिशा व केरळ या राज्यात प्रत्येकी एका वाघाच्या मृत्यूची नोंद घेण्यात आलेली आहे.

दिनविशेष : 

जन्म, वाढदिवस

  • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारक, प्रभावी वक्ते, मराठी साहित्यिक : २८ मे १८८३

  • शंतनुराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती : २८ मे १९०३

  • एन. टी. रामाराव, लोकप्रिय तेलुगू अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री : २८ मे १९२३

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • प. कृ. गोडे, प्राच्यविद्या संशोधक : २८ मे १९६१

ठळक घटना

  • भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा राजीनामा : २८ मे १९९६

  • अमेरिकन क्रांती - पहिल्या कॉन्टिनेन्टल काँग्रेसला सुरुवात : २८ मे १७७४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.