चालू घडामोडी - ३० मे २०१७

Date : 30 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नासाची सुर्यावर स्वारी : 
  • नासा  अवकाश यान पाठवणार असून आतापर्यंत सूर्याच्या जवळ कोणीच जाऊ शकलं नाही तितक्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न नासा करणार आहे. अवकाश यानाला फक्त सर्वोच्च तापमानच नाही तर किरणोत्साराचा सामना करावा लागणार आहे.

  • नासा सूर्यावर पाठवण्यासंबंधी आपल्या मोहिमेसंबंधी महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. या मोहिमेअंतर्गत नासा सूर्याला स्पर्श करुन परत येणार आहे.

  • बुधवारी नासा एका विशेष कार्यक्रमात आपल्या सोलार प्रोब प्लस मिशनसंबंधी महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम टीव्ही तसंच एजन्सीच्या वेबसाईटवर लाईव्ह पाहता येणार आहे. हे अंतराळ यान २०१८ मध्ये उन्हाळ्यात सूर्यासाठी रवाना होईल.

  • सूर्याशी संबंधित जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. सूर्याचा सर्वात बाहेरील भाग 'कोरोना'चे तापमान कशाप्रकारे वाढते .

'CISCE'च्या परीक्षेत मुस्कान देशात प्रथम :
  • कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट्‌स एक्‍झामिनेशन (सीआयएससीई) ने बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर केला असून, त्यात पुन्हा मुलींनी बाजी मारली. बारावी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९६.४७, तर दहावीचे हेच प्रमाण ९८.५३ टक्के इतके आहे.

  • बारावीच्या परीक्षेत कोलकताच्या अनन्या मैती हिने ९९.५ टक्के मिळवीत देशात प्रथम क्रमांक पटकाविला, तर पुण्याच्या मुस्कान अब्दुल्ला पठाण आणि बंगळूरूच्या आश्‍विन राव यांनी दहावीच्या परीक्षेत ९९.४ टक्के मिळवून देशात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकाविला.

  • तसेच यंदा झालेल्या आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांत उत्तीर्ण होणाऱ्यांच्या प्रमाणात गेल्या वर्षीपेक्षा किरकोळ वाढ झाली आहे. बारावीच्या परीक्षेत ९७.७३ टक्के मुली, तर ९५९ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

राजू नायक यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर :
  • सासवड या आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी दोन महत्त्वाच्या संस्थांतर्फे दिला जाणारा आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार 'लोकमत'चे संपादक राजू नायक यांना जाहीर झाला आहे.

  • आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.

  • आचार्य अत्रे यांच्या पुण्यतिथीदिनी १३ जून रोजी सासवड येथे या पुरस्काराचे वितरण होईल. यापूर्वी हा पुरस्कार कुमार केतकर, किरण ठाकूर, संजय राऊत, राजीव साबडे, शरद कारखानीस, डॉ. दीपक टिळक, प्रकाश कुलकर्णी, राजीव खांडेकर, सुरेश भटेवरा, प्रवीण बर्दापूरकर यांना मिळाला आहे.

  • राजू नायक यांनी विविध मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांत पत्रकारिता केली आहे. पर्यावरणविषयक पत्रकारितेसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांची कित्येक पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यात पर्यावरणविषयक दोन पुस्तकांचा समावेश आहे. गोव्याच्या खाण व्यवसायाचा पर्दाफाश करणारे 'खंदक' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प इंदापुरात :
  • "जलविद्युत प्रकल्पाला मर्यादा आहेत. तर कोळशापासून वीजनिमिर्ती करताना प्रदूषण व कच्च्या मालाच्या उपलब्धतेसारख्या समस्या आहेत. राज्याची विजेची वाढती गरज लक्षात घेता सौरउर्जा हा सध्या उत्तम पर्याय आहे. मदनवाडी (ता. इंदापूर) येथे राज्यातील सर्वांत मोठा सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे, ही आनंदाची बाब आहे. त्याच्या यशस्वितेसाठी कंपनीने शेतकर्‍यांना प्रकल्पामध्ये सहभागी करुन घेतल्यास कंपनी व शेतकरी या दोघांचाही फायदा होईल,'' असे मत राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.

  • प्रकल्पाची वैशिष्ट्ये -

  • राज्यातील सर्वांत मोठा सौरउर्जा प्रकल्प.

  • १२० मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता.

  • एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक.

  • पाचशे स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चार देशांच्या दौऱ्यावर :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९ पासून जर्मनी, स्पेन, रशिया व फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यावर जात आहेत.

  • पंतप्रधान दौऱयादरम्यान आर्थिक, सुरक्षा, विज्ञान या विषयांवर युरोपीय देशांसोबत व्दिपक्षीय चर्चा करणार आहेत.

  • चर्चेदरम्यान व्यापार व दहशतवादाविरोधातील लढाई हा सुद्धा मुख्य विषय असणार आहे.

  • शिवाय, जर्मनी येथे होत असलेल्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत (आयजीसी) या परिषदेमध्येही ते सहभागी होणार आहेत.

  • तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर स्पेनचा दौरा करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान असणार आहेत. सन १९८८ मध्ये राजीव गांधी यांनी स्पेनचा दौरा केला होता.

बिहारमध्ये बारावीत ६५ टक्के विद्यार्थी नापास ! 
  • महाराष्ट्र राज्याचा सरासरी निकाल सरासरी ८९.५० टक्के टक्के लागला असताना बिहारच्या निकाल पाहून तुम्हाला धक्का बसेल. महाराष्ट्रासोबतच बिहारमध्येही आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.

  • धक्कादायक गोष्ट म्हणजे बिहारमध्ये बारावीत केवळ ३५ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. तर ६५ टक्के विद्यार्थी बारावीत नापास झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या निकालात मोठी घसरण झाली आहे.

  • बिहारमध्ये १२ लाख ४० हजार १६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ज्यापैकी केवळ ४ लाख ३५ हजार २३३ विद्यार्थीच पास झाले. विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्हीही शाखेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नापास झाले आहेत.

  • विज्ञान शाखेतून ८६.२ टक्के गुणांसह खुशबू कुमारी ही विद्यार्थीनी राज्यात पहिली आली आहे. वाणिज्य शाखेतून पटना येथील प्रियांशू आणि कला शाखेतून गणेश या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला होता.

केंद्र सरकारच्या त्या निर्णयाला कोर्टाची स्थगिती :
  • गो- संरक्षणासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या अध्यादेशाला मद्रास हायकोर्टाने चार आठवड्यांची स्थगिती दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणी चार आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. सरकार नागरीकांचं खाणं ठरवू शकत नाही.

  • सेल्व्हागोमती आणि आसिक इलाही बाबा यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात जनहीत याचिका दाखल केली होती. यावर झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती मुरलीधरन आणि सी. व्ही. कार्तिकेयन यांच्या खंडपीठाने अंतरिम निर्णय देत सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती दिली.

  • गो- संरक्षणासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गायी-म्हैस यांसह अनेक प्राण्यांना कत्तलींसाठी गुरांच्या बाजारात विकता येणार नाही, असा नवा नियम केला आहे. मात्र, त्यामुळे गरीब शेतकऱ्यांसहीत कत्तलखाना उद्योगालाही फटका बसणार आहे.

  • मे च्या पहिल्या पंधरवाडयाच याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. या नियमानुसार गुरांची खरेदी-विक्री आता शेतकऱ्यांपुरती मर्यादित ठेवण्यात आली असून, गाय, बैल, म्हैस, रेडा, कालवड, बछडे आणि उंट यांचा यात समावेश आहे.

दिनविशेष : 

जन्म, वाढदिवस

  • भारतातील प्रसिध्द भौतिकशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचा विक्रमपूर जिल्ह्यातील राणीखल या गावी जन्म झाला : ३० मे १८५८

ठळक घटना

  • अकबराचा मुलगा सलीम व राणा प्रताप यांच्यामध्ये हळदीघाट येथे घनघोर लढाई झाली : ३० मे १५५६

  • गोवा हे भारतातील २५ वे घटकराज्य मान्य करण्यात आले : ३० मे १९८७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.