चालू घडामोडी - १८ ऑक्टोबर २०१७

Date : 18 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आता कोणत्याही क्षणी अण्वस्त्र युद्ध : उत्तर कोरिया
  • संयुक्त राष्ट्रे : अण्वस्त्र युद्ध आता कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकेल, असा इशारा उत्तर कोरियाचे संयुक्त राष्ट्रांतील उप राजदूत किम इन -योंग यांनी सोमवारी दिला.

  • कोरियन द्विपकल्पातील परिस्थिती ही धोक्याची/अनिश्चित अवस्थेला पोहोचली असून कोणत्याही क्षणी अण्वस्त्र युद्धाला तोंड फुटू शकेल, असे ºयोंग यांनी युनोच्या आमसभेच्या नि:शस्त्रीकरण समितीला सांगितले.

  • योंग म्हणाले, जगात उत्तर कोरिया हा एकमेव देश असा आहे की त्याला अमेरिकेकडून १९७० पासून ‘अशा प्रकारची टोकाची आणि थेट अण्वस्त्राची धमकी’ मिळाली आहे आणि त्यामुळे आमच्या देशाला स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्रे बाळगण्याचा हक्क आहे.’’

सोमालियाची राजधानी मोगादिशूत भीषण बॉम्बस्फोट
  • सोमालियाची राजधानी मोगादिशू शनिवारी सर्वात शक्तीशाली स्फोटाने हादरली. शनिवारी एका हॉटेल आणि बाजाराच्या बाहेर झालेल्या स्फोटात 276 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 300 लोक जखमी झाली आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो.

  • सोमालियाच्या परराष्ट्र मंत्रालयाला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता. एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर बॉम्बसाठा ठेवून तो एका गजबजलेल्या रस्त्यावर सोडण्यात आला. सोमालियातील अल शबाब नावाच्या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला घडवून आणल्याची माहिती आहे.

  • सोमालियाचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल्लाही मोहम्मद यांनी तीन दिवसाच्या दुखवट्याची घोषणा केली आहे. तसंच रक्तदान करून पीडितांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. शहरात झालेल्या या स्फोटामुळे इमारतीच्या खाली दबलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.  

अधिक चालू घडामोडी काही वेळात उपलब्ध होतील.... :)

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • अलास्का दिन - अमेरिका

जन्म /वाढदिवस

  • न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य यांचा जन्म : १८ ऑक्टोबर १८६१

  • इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) चे संस्थापक आणि अध्यक्ष झाकीर नाईक यांचा जन्म : १८ ऑक्टोबर १९६५

  • भारतीय लेखक अमिश त्रिपाठी यांचा जन्म : १८ ऑक्टोबर १९७४

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • पहिल्या यांत्रिकी संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज यांचे निधन : १८ ऑक्टोबर १८७१

  • पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचे निधन : १८ ऑक्टोबर १९५१

  • भारतीय कवी आणि लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचे निधन : १८ ऑक्टोबर १९७६

ठळक घटन

  • टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली : १८ ऑक्टोबर १९५४

  • राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या बळवंत संगीत नाटक मंडळी ने केला : १८ ऑक्टोबर १९१९

  • कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला : १८ ऑक्टोबर २००२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.