चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ एप्रिल २०२०

Date : 3 April, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इलॉन मस्क जगभरात मोफत व्हेंटिलेटर्स द्यायला तयार पण एक अट : 
  • करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करताना मोठया प्रमाणावर व्हेंटिलेटर्सची गरज भासत आहे. जगातील सर्वच प्रमुख देशांनी व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीला गती दिली आहे. या पार्श्वभूमीवर टेस्ला कंपनीचा सीईओ इलॉन मस्कने एफडीएने मंजूर केलेल्या व्हेंटिलेटर्सचा मोफत पुरवठा करण्यास आपली कंपनी तयार असल्याचे म्हटले आहे.

  • टेस्लाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जगभरातील भागांमध्ये व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यास आम्ही तयार आहोत असे इलॉन मस्कने टि्वटमध्ये म्हटले आहे. पण त्याने दोन अटी ठेवल्या आहेत. तुम्हाला व्हेंटिलेटर्सची तात्काळ आवश्यकता असली पाहिजे व भविष्यात वापरण्यासाठी तुम्ही ती गोदामात ठेवायची नाहीत अशा दोन अटी मस्कने ठेवल्या आहेत.

  • “एफडीएने मंजुरी दिलेली अतिरिक्त व्हेंटिलेटर्स आमच्याकडे आहेत. टेस्लाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जगभरातील हॉस्पिटल्समध्ये आम्ही ती व्हेंटिलेटर्स पोहोचवू. व्हेंटिलेटर व त्याच्या वाहतुकीसाठी एकही पैसा आकारणार नाही. पण एकच अट आहे, तुम्हाला त्या व्हेंटिलेटरची तात्काळ आवश्यकता असली पाहिजे व तुम्ही ती गोदामात ठेवायची नाहीत” असे मस्कने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

जगभरातील करोनाबाधितांची संख्या १० लाखांनजीक : 
  • जगभरात करोना विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या गुरुवारी १० लाखांजवळ पोहचली. युरोप या महासाथीमुळे हादरला असून, यापुढील काळ आमच्यासाठी ‘भयानक’ राहील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर अमेरिकेने त्यासाठी तयारी सुरू केली आहे.

  • पृथ्वीच्या निम्म्या भागांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची टाळेबंदी सुरू असतानाही गेल्या २४ तासांत करोना विषाणूने जगभरात हजारो बळी घेतले असून, यात स्पेनमधील नव्या १ हजार बळींचा समावेश आहे.

  • या महासाथीने जागतिक अर्थव्यवस्थेतही अनर्थ माजवणे सुरू ठेवले असून, स्पेनने एकाच महिन्यात नोकऱ्या गमावलेल्यांची सर्वाधिक संख्या जाहीर केली आहे, तर अमेरिकाही लवकरच त्या देशातील प्रचंड प्रमाणावर गमावण्यात आलेल्या नोकऱ्या उघड करण्याची अपेक्षा आहे.

  • डिसेंबरमध्ये चीनमध्ये सर्वप्रथम उगम झालेल्या कोविड-१९ चा ९ लाख ४० हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून, त्यात युरोपातील ५ लाख लोकांचा समावेश आहे. जगभरातील ४७ हजार लोक यामुळे मृत्युमुखी पडले आहेत.

  • गेल्या पाच आठवडय़ांत करोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये घातक वेगाने वाढ झाली असून, गेल्या एकाच आठवडय़ात बळींची संख्या दुप्पट झाली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेद्रोस अधानोम घेब्रेसिस यांनी सांगितले. येत्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांची संख्या  १ दशलक्षापर्यंत, तर बळींची संख्या ५० हजारांपर्यंत पोहोचेल, असे त्यांनी बुधवारी सांगितले.

रविवारी रात्री प्रकाशाची महाशक्ती दिसेल – मोदी
  • जगभरात करोना विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या १० लाखांजवळ पोहचली. युरोप या महासाथीमुळे हादरला असून, यापुढील काळ आमच्यासाठी ‘भयानक’ राहील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर अमेरिकेने त्यासाठी तयारी सुरू केली आहे.

  • भारतामध्येही करोनाग्रस्तांची संख्या वाढत असून हा आकडा आता दोन हजारहून अधिक झाला आहे. त्यामुळेच सर्वच राज्यांनी उपाययोजना आणखी कठोर केल्या आहेत.

मोदींचं आवाहन: रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाइट बंद ठेऊन, मेणबत्ती, फ्लॅशलाइट लावा : 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारतातील जनतेशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी लॉकडाउनच्या काळामध्ये भारतीय दाखवत असलेल्या संयमाचे कौतुक केलं. तसेच एकत्र येऊन करोनाला हरवूयात असं आवाहन मोदींनी देशातील जनतेला केलं. यावेळेस बोलताना मोदींनी भारतीयांकडे पाच एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एक गोष्ट करण्याचं आवाहन केलं.

  • यामध्ये त्यांनी देशातील सर्व १३० कोटी भारतीयांनी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केलं. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असं मोदींनी म्हटलं आहे.

  • “करोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटं हवी आहेत,” असं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घरातील सर्व दिवे, लाइट्स बंद करुन घरातील बाल्कनीमध्ये, दारामध्ये एक दिवा लावा किंवा मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा, असं आवाहन मोदींनी केलं.

  • “करोनामुळे पसरलेल्या अंधःकारामध्ये आपल्याला  सतत सकारात्मकतेकडे आणि प्रकाशाकडे प्रवास करायचा आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या गरीब जनतेला सकारात्कमतेकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यालाच त्यांना सोबत घेऊन जायचं आहे, ” असं भावनिक आवाहन मोदींनी देशातील जनतेला केलं. आपण सर्वांनी एकत्र येऊन या करोनाच्या अंध:काराला पळवून लावूयात असं सांगत मोदींनी आपलं भाषण संपवलं.

डकवर्थ-लुइसचे जनक टोनी लुइस यांचे निधन : 
  • क्रिकेटमधील डकवर्थ-लुइस प्रणालीचे जनक टोनी लुइस यांचे बुधवारी लंडन येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) ही घोषणा केली.

  • टोनी यांनी गणितज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्यासोबत डकवर्थ-लुइस पद्धत १९९७ मध्ये अमलात आणली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) १९९९ मध्ये ती स्वीकारली. डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास गणिताची आकडेमोड करत षटके कमी करण्यात येतात. लुइस यांची ही प्रणाली क्रिकेटमध्ये चांगलीच गाजली. अजूनही सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ-लुइस प्रणालीचा आधार घेतला जातो. लुइस यांना क्रिकेट आणि गणितातील या संशोधनाबद्दल ‘एमबीई’ या ब्रिटनमधील सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले.

  • ‘आयसीसी’कडून लुइस यांना श्रद्धांजली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टोनी लुइस यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे. ‘‘सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास धावांचे लक्ष्य ठेवण्याची पद्धत लुइस आणि फ्रँ क यांनी दोन दशकांपूर्वी नव्याने अमलात आणली. लुइस यांचे योगदान सदैव स्मरणात राहील,’’ असे ‘आयसीसी’ने म्हटले आहे.

०३ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.