चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ डिसेंबर २०१९

Date : 3 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गणेश उपाध्याय ‘नवोदित मुंबई-श्री’ :

कांदिवलीच्या शाम सत्संग भवनात झालेल्या प्रतिष्ठेच्या ‘नवोदित मुंबई-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत बाल मित्र मंडळाचा गणेश उपाध्याय विजेता ठरला. यंदा या स्पर्धेत मुंबईच्या २६५ स्पर्धकांनी भाग घेतला. ७० किलो वजनी गटात ५०हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.

  •   ५५ किलो वजनी गट : १. सतीश पुजारी, २. नितेश पालव, ३. कार्तिक मंडल
  •  ६० किलो : १. कल्पेश सौंदळकर, २. दीपक चौहान, ३. शशांक सकपाळ
  •  ६५ किलो : १. संदीप साबळे, २. वैभव जाधव (एचआर), ३. सिद्धेश गाडे
  • ७० किलो : १. अनिकेत यादव, २. अल्मेश मंचडे, ३. नदीम अन्सारी
  • ७५ किलो : १. गणेश उपाध्याय, २. अरविंद सोनी, ३. कुणाल शिंदे
  •   ८० किलो : १. प्रदीप कदम, २. दीपक प्रधान, ३. कल्पेश नाडेकर
  •  ८० किलोवरील : १. प्रदीप भाटिया, २. हिमांशू शर्मा, ३. सम्राट ढाले.
राज्य सरकार मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे मत्स्यालय; मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना :
  • देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्यासाठी शहरात बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या प्रमाणे जागतिक दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) राज्य सरकार उभारणार आहे. मत्स्यालयाच्या उभारणीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

  • ॲक्वेरिअमसाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराकडे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला नवनवीन पर्यटनस्थळे विकसित करावी लागतील. मुंबईतील क्रुझ टर्मिनलवर देश-विदेशातील क्रुझ मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यातील पर्यटकांसाठी आता वेगळा पर्यटन कार्यक्रम आपल्याला द्यावा लागेल. यादृष्टीने पहिल्या टप्प्यात शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्सालय) विकसित करावे, असे त्यांनी सांगितले.

मोदींच्या प्रवासाचे ४५८ कोटी रुपये सरकारने थकवले, एअर इंडियाला फटका :
  • कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत काही दिवसांपू्वी माहिती दिली आहे. एकीकडे असं असतानाच दुसरीकडे भारत सरकारनेच एअर इंडिया कंपनीचे ७९७ कोटी ९५ लाख रुपये थकवल्याची माहिती समोर आली आहे.

  • सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलेला नाही. विशेष म्हणजे यापैकी जवळजवळ अर्धी रक्कम ४५८ कोटी ९५ लाख ९० हजार रुपये केवळ मोदींच्या दौऱ्यांची रक्कम आहे.

  • माहितीच्या अधिकाराखाली एअर इंडियाने दिलेल्या उत्तरामधून ही आकडेवारी समोर आली आहे. सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच ३१ मार्च २०१९ रोजी सरकारने एअर इंडियाचे ५९८ कोटी ५५ लाख रुपयांचे थकीत बिल ठेवले होते. या रक्कमेमध्ये मागील सहा महिन्यामध्ये २० कोटींची वाढ झाली आहे.

  • महिती अधिकार कार्यकर्ते कमांडो लोकेश बत्रा (निवृत्त) यांनी दाखल केलेल्या अर्जाला एअर इंडियाने उत्तर दिले आहे. यामध्ये मोदींच्या एकूण प्रवासाचा खर्च एक हजार ३२१ कोटी ४१ लाख रुपये झाला असून त्यापैकी ८६२ कोटी ४५ लाख रुपये कंपनीला सरकारने दिले आहेत. तर अद्याप ४५८ कोटी ९५ लाख ९० हजार रुपये सरकारने अद्याप कंपनीला दिलेले नाहीत.

चांद्रयान-२ - विक्रम लँडरचा ठावठिकाणा नासानं शोधला :
  • भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चांद्रयान-२ मोहीम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली. चंद्रापासून २.१ कि.मी. उंचीवर असतानाच अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर विक्रम लँडरचा पत्ता लागला आहे.

  • अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं ठिकाण शोधले असून, याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. नासाच्या ऑर्बिटरला चंद्राच्या भूपृष्ठावर विक्रमचे अवशेष सापडले आहे.

  • चांद्रयान २ जीएसएलव्ही मार्क ३ एम १ या प्रक्षेपकाच्या मदतीने २२ जुलै रोजी अवकाशात झेपावले होते. त्यानंतर कक्षाबदलाचे प्रयोग करीत ते १४ ऑगस्टला चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले. २० ऑगस्टला यान चंद्राच्या कक्षेत गेले. त्यानंतर २ सप्टेंबरला लँडर विक्रम मूळ चांद्रयानापासून वेगळे झाले होते, नंतर त्याची कक्षा कमी करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले होते. ७ सप्टेंबरला चांद्रभूमीवर उतरणे अपेक्षित होते. मात्र, १५ मिनिटांच्या शेवटच्या थरारक टप्प्यावर अचानक लँडरचा संपर्क तुटल्याने ही मोहीम अपयशी ठरली.

दिनविशेष :
  • जागतिक अपंग दिन

महत्वाच्या घटना 

  • १७९६: दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.

  • १८१८: इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.

  • १८२९: लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.

  • १८७०: बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.

  • १९२७: लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला.

  • १९६७: डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.

  • १९७१: पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.

  • १९७९: आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.

  • १९८४: भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.

  • १९९४: जपानमध्ये प्लेस्टेशन रिलीझ करण्यात आले.

जन्म 

  • १७७६: हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १८११)

  • १८८२: जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल १९६६)

  • १८८४: भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६३)

  • १८८९: मुझफ्फरनगर बॉम्बस्पोटातील क्रांतिकारक खुदिराम बोस यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट १९०८)

  • १८९२: कवी माधव केशव काटदरे यांचा जन्म. (मृत्यू: ३ सप्टेंबर १९५८)

  • १८९४: भारतीय वकील आणि राजकारणी दिवा जिवरतीनम यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९७५)

  • १९३७: मैथिली लेखक विनोद बिहारी वर्मा यांचा जन्म.

  • १९४२: एमा मॅगझीनच्या संस्थापीका अॅलिस श्वार्झर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५५२: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १५०६ – झेविअर, स्पेन)

  • १८८८: ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट चे निर्माते कार्ल झैस यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८१६)

  • १८९४: इंग्लिश लेखक व कवी आर. एल. स्टीव्हनसन यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८५०)

  • १९५१: कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८८०)

  • १९५६: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १९ मे १९०८)

  • १९७९: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९०५)

  • २०११: हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांचे लंडन यथे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९२३)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.