चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ ऑक्टोबर २०१९

Date : 3 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
IND vs SA 1st Test | रोहित शर्माचं दमदार शतक, पावसामुळे खेळ थांबला
  • विशाखापट्टणम : रोहित शर्मा आणि मयांक अगरवालच्या अभेद्य द्विशतकी भागीदारीमुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीचा पहिला दिवस गाजवला.

  • पावसाच्या व्यत्ययामुळे चहापानानंतरचं पूर्ण सत्र वाया गेलं, त्यामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी टीम इंडियाने बिनबाद 202 धावांची मजल मारली होती.

  • रोहित शर्मा 174 चेंडूत 12 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 115 तर मयांक अगरवाल 11 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 84 धावांवर खेळत आहे.

Shivsena Candidate List | शिवसेनेच्या पहिल्या यादीत 70 उमेदवारांचा समावेश
  • मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपपाठोपाठ शिवसेनेनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

  • शिवसेनेच्या पहिल्या यादीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह 70 उमेदवारांचा समावेश आहे.

  • अपेक्षेप्रमाणे आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट जाहीर झालं आहे.

  • तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपाऱ्यातून उमेदवारी मिळाली आहे.

  • शिवसेनेचि पूर्ण उमेदवार यादीसाठी येथे क्लिक करा.

गांधीजींंच्या आवडत्या शहरात लंडनमध्ये 'गांधी जयंती'निमित्त भरगच्च कार्यक्रम
  • लंडन : इंग्लंडची राजधानी लंडनच्या अनेक स्थानांशी महात्मा गांधी यांचे नाते आहे. याच कारणामुळे भारतीय उच्चायोग या स्थानांचा उपयोग गांधी यांचा १५० व्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी करीत आहे.

  • मोहनदास करमचंद गांधी यांनी आपल्या १९ व्या जन्मदिनापूर्वी कायद्याची पदवी प्राप्त करण्यासाठी इंग्लंडला पोहोचले होते आणि असे सांगितले जाते की, ते लवकरच लंडनच्या जीवन शैलीशी एकरूप झाले.

  • प्रमुख ब्रिटिश-भारतीय शिक्षणतज्ज्ञ लॉर्ड मेघनाद देसाई यांनी म्हटले आहे की, मोहनदास गांधी यांना लंडन खूपच आवडले होते.

  • देसाई हे ब्रिटनमधील भारतीय शिक्षक आहेत आणि महात्मा गांधी यांच्या नावाने अनेक शिष्यवृत्ती सुरू केल्या आहेत. ते गांधी स्टॅच्यू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.

 

उर्वरित चालू घडामोडी येथे लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील...

 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६७०: शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सुरत लुटली.

  • १९३२: इराकला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९३५: जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.

  • १९५२: युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.

  • १९९०: पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.

  • १९९५: ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्‍नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खूनाच्या आरोपातून सुटका.

जन्म 

  • १९०३: हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७२)

  • १९०७: निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक नरहर शेषराव पोहनेरकर यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९९०)

  • १९१९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी २०१३)

  • १९२१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रे लिंडवॉल यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९९६)

  • १९४७: सबवे रेस्टॉरंट चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर २०१५)

मृत्यू 

  • १८६७: शिवणयंत्राचे संशोधक एलियास होवे यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १८१९)

  • २००७: सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदविणारे रवींद्र पाटील यांचे टी. बी. रोगामुळे निधन.

  • २००७: भारतीय पत्रकार, लेखक, आणि शैक्षणिक एम. एन. विजयन यांचे निधन. (जन्म: ८ जून १९३०)

  • २०१२: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९२६)

  • २०१२: भारतीय धर्मशास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.