चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ डिसेंबर २०१९

Date : 4 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जिओ मुंबईत सर्वाधिक वेगाने वाढणारी सेवा : 
  • मुंबई परिमंडळात रिलायन्स जिओ ही सर्वात वेगाने वाढणारी दूरसंचार सेवा बनली आहे. तीन वर्षांच्या कालावधीत, तिने वेगवान ग्राहक संपादन आणि महसुली मापदंडांवर दमदार कामगिरी केली आहे.

  • भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) जाहीर केलेल्या महसुली आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओच्या समायोजित सकल महसूल (एजीआर) जून तिमाहीत ३३५.१ कोटी रुपयांच्या तुलनेत २०.५८ टक्कय़ांनी वाढला. सप्टेंबरच्या तिमाहीत तो ४०४.१ कोटी रुपये झाला आहे.

  • मुंबई परिमंडळात एजीआर आणि बाजार हिस्सा दोहोंमध्ये जिओने अन्य सर्व प्रतिस्पध्र्याना मात दिली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या व्होडाफोन आयडियाचा जूनअखेर तिमाहीत एजीआर ३९७.४ कोटी रुपये होता. सप्टेंबरच्या तिमाहीत ती घसरून ३८९.२ कोटी रुपये झाला आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत भारती एअरटेलने सकारात्मक वाढ नोंदविली. कंपनीचा एजीआर जून तिमाहीतील २६५.९ कोटी रुपयांवरून सप्टेंबरच्या तिमाहीत २८४.२ कोटी रुपयांवर पोहोचला.

पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; १००० किग्रॅची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता : 
  • भारताने जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची मंगळवारी रात्री यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या बालासोर येथील प्रक्षेपण केंद्रावरुन ही चाचणी करण्यात आली. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे ही चाचणी घेण्यात आली.

  • यापूर्वी, याच ठिकाणाहून २० नोव्हेंबर रोजी पृथ्वी-२ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. काल झालेल्या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली असून त्याने सर्व आवश्यक मानकं पूर्ण केली आहेत. या क्षेपणास्त्रामध्ये ५०० ते १००० किग्रॅ वजनाची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता आहे.

  • या क्षेपणास्त्रामध्ये लिक्विड प्रोपल्शन इंजिन वापरण्यात आले आहेत. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५० किमीपर्यंत आहे. यामध्ये अॅडव्हान्स गाईडन्स सिस्टिमही बसवण्यात आली आहे. ही यंत्रणआ आपल्या लक्ष्याचा अचूनकतेने वेध घेते.

एक देश, एक रेशन कार्ड योजनेची १ जूनपासून अंमलबजावणी :
  • स्थलांतरित कामगार आणि रोजंदारी मजूर यांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची १ जून २०२० पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी येथे सांगितले.

  • या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दुकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे. बायोमेट्रिक अथवा आधार वैधतेनंतर अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री पासवान यांनी लोकसभेत स्पष्ट केले.

  • या योजनेचा लाभ मुख्यत्वे स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर यांना होणार आहे, हा वर्ग रोजगारासाठी सातत्याने देशभरात फिरतीवर असतो.

MTNL, BSNL च्या ९२ हजार कर्मचाऱ्यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज : 
  • सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेडची (एमटीएनएल) स्वच्छानिवृत्ती योजना ३ डिसेंबर रोजी बंद झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही कंपन्यांच्या एकू ९२ हजार ७०० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये बीएसएनएलच्या ७८ हजार ३०० तर एमटीएनएलच्या १४ हजार ३७८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

  • सर्व विभागांमधून मिळालेल्या माहितीनुसार योजना बंद होण्याच्या तारखेपर्यंत जवळपास बीएसएनएलच्या ७८ हजार ३०० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.के. पुरवार यांनी दिली.

  • आम्ही ८२ हजार कर्मचाऱ्यांची कपात होईल अशी अपेक्षा करत आहोत. स्वेच्छानिवृत्ती व्यतिरिक्त ६ हजार कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

वादग्रस्त स्वामी नित्यानंदने अमेरिकेत वसवले स्वत:चे हिंदूराष्ट्र, नाव दिले ‘कैलास’ : 
  • स्वयंघोषित गुरू स्वामी नित्यानंद पुन्हा चर्चेत आला आहे. साधारण दहा वर्षापूर्वी सेक्स सीडीप्रकरणामध्ये अडकलेल्या नित्यानंदने देशामधून पलायन केले आहे. इतकचं नाही तर त्याने दक्षिण अमेरिकेतील इक्वोडोर देशाच्या जवळ एक बेट विकत घेतले असून त्या बेटाला देश म्हणून घोषित केलं आहे.

  • नित्यानंदने या देशाला ‘कैलास’ असं नाव दिलं असून हे जगातील सर्वोत्तकृष्ट हिंदूराष्ट्र असल्याचं म्हटलं आहे. इतकचं नाही तर या देशाला संयुक्त राष्ट्रांनी मान्यता द्यावी अशी विनंतही त्याने केली आहे. विशेष म्हणजे या राष्ट्रच्या निर्मितीसाठी हातभार लावण्याचे आवाहन करत एका वेबसाईटच्या माध्यमातून देणगी गोळा करण्यासही सुरुवात केली आहे.

  • ‘कैलास’ या देशाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, ‘कैलास हा सिमांचे बंधन नसणारा देश आहे. हा देश जगभरामधून हकलवून लावण्यात आलेल्या हिंदू लोकांनी एकत्र येऊन बनवला आहे. आपल्याच देशात हिंदू धर्माचा अभ्यास करण्याचा हक्क गमावलेल्या लोकांनी वसवलेला हा देश आहे.’ या देशाचा वेगळा पासपोर्ट असून नित्यानंदने वेबसाईटवर त्याची कॉपीही अपलोड केली आहे.

दिनविशेष :
  • भारतीय नौसेना दिन

महत्वाच्या घटना 

  • १७९१: द ऑब्जर्व्हर हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित झाले.

  • १८२९: भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंगने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला. तसेच सतीप्रथा बंद केली.

  • १८८१: लॉस ऍन्जेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.

  • १९२४:  गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.

  • १९६७: थुंबा येथील तळावरुन रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण.

  • १९४८: भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली.

  • १९७१: भारत पाकिस्तान तिसरे युद्ध-ऑपरेशन ट्रायडेंट भारतीय आरमाराने कराची वर हल्ला केला.

  • १९७५: सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९९१: पॅन अ‍ॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

  • १९९३: उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.

  • १९९७: संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

जन्म 

  • १८३५: इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९०२)

  • १८५२: रशियन भौतिकशास्त्रज्ञ ओरेस्ट ख्वोल्सन यांचा जन्म.

  • १८६१: आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हंगेस हफस्टाइन यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९२२)

  • १८९२: स्पेनचा हुकुमशहा फ्रान्सिस्को फ्रँको यांचा जन्म.

  • १९१०: भारताचे माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी २००९)

  • १९१०: आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९६५)

  • १९१६: पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख बळवंत गार्गी यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २००३ – मुंबई)

  • १९१९: भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म.

  • १९३२: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह तै-वू यांचा जन्म.

  • १९३५: पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक शंकर काशिनाथ बोडस यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९९५)

  • १९४३: मराठी लेखक कॅथोलिक ख्रिस्ती फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म.

  • १९७७: भारतीय क्रिकेटर अजित आगरकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८५०: विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचे निधन. (जन्म: २२ मे १७८३)

  • १९०२: डो जोन्स एंड कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स डो यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८५१)

  • ११३१: पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम यांचे निधन. (जन्म: १८ मे १०४८)

  • १९७३: कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १८९३)

  • १९७५: जर्मन तत्त्वज्ञ आणि लेखक हाना आरेंट यांचे निधन.

  • १९८१: मराठी चित्रकार ज. ड. गोंधळेकर यांचे निधन.

  • २०००: सुरिनाम प्रजासत्ताकचे पहिले पंतप्रधान हेन्क अर्रोन यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १९३६)

  • २०१४: भारतीय वकील आणि न्यायाधीश व्ही. आर. कृष्ण अय्यर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९१५)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.