चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ डिसेंबर २०१९

Date : 5 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘अल्फाबेट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सुंदर पिचाई यांची नियुक्ती : 
  • वॉशिंग्टन : गुगलची मुख्य मातृकंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर ‘गुगल’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गुगल कंपनीचे संस्थापक लॅरी पेज व सर्जेई ब्रिन हे अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष या पदावरून पायउतार होत असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले होते.

  • पिचाई (वय ४७) हे सध्या गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून अनेक वर्षे त्यांनी हे पद सांभाळले. आता ते अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतील. पिचाई यांनी या बढतीबाबत ट्वीट संदेशात म्हटले आहे की, नवीन जबाबदारीबाबत आपल्याला उत्सुकता आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक आव्हानांवर मात करण्यावर आपला भर राहील, लॅरी व सर्जेई यांचे आपण आभारी आहोत कारण त्यांनी सहकार्य, शोध व व्रतस्थ वृत्तीने काम करण्याची नवी संस्कृती रूजवून कंपनीचा पाया भक्कम केला आहे.

  • दी न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे की, पिचाई हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एका शक्तिशाली पदावर पोहोचले आहेत. ड्रोन, इंटरनेट बिमिंग बलून, जाहिराती, स्मार्टफोन सॉफ्टवेअर, नकाशे, ऑनलाइन व्हिडिओ या सर्व सेवांची सूत्रे त्यांच्या हातात असतील.

विक्रम लँडर शोधल्याचा नासाचा दावा इस्रोने फेटाळला : 
  • नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर शोधून काढल्याचा नासा या अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेचा दावा इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी फेटाळला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने सप्टेंबरमध्येच ७ सप्टेंबरला चांद्रभूमीवर कोसळलेले लँडर त्याच महिन्यात शोधून काढले होते, त्यामुळे नासाने ते शोधून काढण्याचा प्रश्नच येत नाही, असे शिवन यांनी स्पष्ट केले.

  • नासाने अलीकडे असा दावा केला, की चांद्रभूमीवर कोसळलेले भारताचे विक्रम लँडर आम्हीच पहिल्यांदा शोधून काढले असून त्यात चेन्नईचे अभियंता शण्मुगा सुब्रमणियन यांनी मोठी मदत केली होती. सुब्रमणियन यांनीही नासाच्या दाव्यास पुष्टी दिली होती.

  • इस्रोने १० सप्टेंबर रोजी म्हणजे लँडर कोसळल्यानंतर तीन दिवसांनी ते शोधून काढले होते व त्याबाबत ट्विट संदेशही जारी केला होता. विक्रम लँडर आम्हाला सापडले असून त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असे तेव्हाच्या संदेशात म्हटले होते.

हैदराबाद प्रकरणातील पीडितेचे नाव जाहीर केल्याने नोटिसा जारी : 
  • नवी दिल्ली : हैदराबाद बलात्कार व खून प्रकरणात महिलेचे नाव काही प्रसारमाध्यमांनी जाहीर केल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार व काही राज्यांच्या सरकारांना तसेच प्रसारमाध्यम समूहांना नोटीस जारी केली आहे.

  • मुख्य न्यायाधीश डी.एन.पटेल व न्या. सी.हरी  शंकर यांनी केंद्र सरकार, तेलंगण, आंध्र प्रदेश, दिल्ली या राज्यांची सरकारे, काही माध्यम समूह, समाजमाध्यम संस्था यांना नोटिसा जारी केल्या असून याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. या महिलेचे नाव उघड करणाऱ्या संबंधित व्यक्ती व माध्यम समूह यांच्या विरोधात खटले भरण्यात यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आता १६ डिसेंबर रोजी ठेवली आहे.

  • भारतीय दंड संहिता कलम २२८ ए अनुसार बलात्काराच्या गुन्ह्य़ातील पीडितांची नावे जाहीर करू नयेत अशी तरतूद आहे. त्याचे उल्लंघन केल्यास दोन वर्षे तुरुंगवास व दंडाची शिक्षा आहे. दिल्लीचे वकील यशदीप चहल यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, तेलंगणमधील बलात्कार पीडित महिलेचे नाव जाहीर करून भादंवि कलमाचे उल्लंघन झाले आहे.

  • महिलेचे नाव जाहीर करणाऱ्या व्यक्ती व माध्यमसमूहांनी कलम २२८ ए चे उल्लंघन केल्याचा आरोप याचिके त केला असून ही याचिका चिराग मदान, साई कृष्णकुमार यांचाही याचिका दाखल करणाऱ्या वकिलात समावेश आहे. पोलिसांच्या सायबर विभागाने पीडित व आरोपी यांची नावे जाहीर करणारी प्रसारमाध्यमे व व्यक्ती यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.

दिनविशेष :
  • जागतिक माती दिन

महत्वाच्या घटना 

  • १८४८: अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.

  • १९०६: नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना.

  • १९३२: जर्मनीत जन्माला व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असणाऱ्या आल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकेचा व्हिसा.

  • १९४५: फ्लाईट १९, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाची ५ टी.बी. एम. ऍव्हेंजर विमाने स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोणात गायब झाली.

  • १९५७: इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.

  • १९८९: फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ किमी गती गाठून विश्वविक्रम केला.

  • २०१६: गौरव गिल यांनी २०१६ आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप किताब जिंकला.

जन्म 

  • १८६३: फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९३३)

  • १८९४: ऊर्दू कवी जोश मलिहाबादी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२)

  • १८९६: नोबेल पारितोषिक विजेते शास्रज्ञ कार्ल कोरी यांचा जन्म.

  • १८९७: सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाईड व्हर्नन सेसेना यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९५४)

  • १८९८: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि अनुवादक जोश मलिहाबादी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२)

  • १९०१: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वेर्नर हायसेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी १९७६)

  • १९०१: अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, मिकी माऊस चे जनक वॉल्ट इलायन डिस्‍ने यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९६६)

  • १९०५: शेर-ए-कश्मीर शेख अब्दुल्ला यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८२)

  • १९२७: थायलँडचा राजा भुमिबोल अदुल्यतेज ऊर्फ राम (नववा) यांचा जन्म.

  • १९३१: १४ वे नौसेनाप्रमुख अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी यांचा जन्म.

  • १९४३: वर्‍हाड निघालंय लंडनला साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २००९)

  • १९६५: भारतीय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचा जन्म.

  • १९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक रविश कुमार यांचा जन्म.

  • १९८५: भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७९१: ऑस्ट्रियन शास्त्रीय संगीतकार वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १७५६)

  • १९२३: फ्रेंच चित्रकार क्लोद मोने यांचे निधन.

  • १९४६: प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांचे निधन.

  • १९५०: योगी अरविद घोष यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १८७२ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)

  • १९५१: चित्रकार अवनींद्रनाथ यांचे निधन. (जन्म: ७ ऑगस्ट १८७१)

  • १९५९: इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीपसिंहजी यांचे निधन. यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (जन्म: १३ जून १९०५ – नवानगर, काठियावाड, गुजराथ)

  • १९७३: हिन्दी नाटककार राकेश मोहन यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९२५)

  • १९७३: रडार यंत्रणेचे शोधक रॉबर्ट वॉटसन-वॅट यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १८९२)

  • १९९१: संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले यांचे निधन.

  • १९९९: स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये यांचे निधन.

  • २००४: ब्राझिलियन फुटबॉलपटू ख्रिश्चन जुनियर यांचे सामना सुरु असताना बेंगलोर येथे निधन.

  • २००७: टीकाकार म. वा. धोंड यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९१४)

  • २०१३: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९१८)

  • २०१५: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किशनराव भुजंगराव राजूरकर यांचे निधन.

  • २०१६: तामिळ नाडू च्या मुख्यमंत्री जे. जयललिता उर्फ अम्मा यांचे तीव्र हृदयविकारानंतर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४८)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.