चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ नोव्हेंबर २०१९

Date : 5 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मराठा आरक्षण लागू झाल्यानं खुल्या प्रवर्गातील ४१७ जुन्या नियुक्त्या रद्द :
  • मुंबई : पाच वर्षापूर्वी राज्य शासनाच्या सेवेत मराठा कोट्यातील रिक्त ठेवलेल्या विविध पदांवर तात्पुरत्या स्वरूपात खुल्या प्रवर्गातून  केलेल्या नियुत्या रद्द करणाच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सुमारे 15 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

  • नव्या एसईबीसी कायद्यानुसार नव्या नियुक्त्या करताना खुल्या प्रवर्गात तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची सेवा तातडीने समाप्त करणार नाही, अशी हमी  देण्यात आली होती. ही हमी दिलेली असतानाही राज्य सरकारने सुमारे 417 कर्मचा-यांच्या नियुत्या रद्द केल्या आहेत. या याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती  रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने याबाबत 7 नोव्हेंबरच्या पुढील सुनावणीत राज्याच्या महाधिनक्त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश दिले आहेत.

  • मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्य सरकारने साल 2014 मध्ये जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत विविध पदांवर खुल्या प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात आली होती. या भरतीतील सुमारे 2700  सरकारी कर्मचा-यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला.

आंबेडकरी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. महेंद्र भवरे यांची निवड :
  • मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ पुरस्कृत आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या वतीने 14 वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन 23, 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, संशोधक, साहित्य इतिहासकर डॉ. महेंद्र भवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

  • संमेलनाध्यक्षपदी योग्य अशा व्यक्तीची निवड करण्याच्या दृष्टीने आयोजकांनी आंबेडकरी साहित्य विश्वातील मान्यवरांकडून नामनिर्देश आणि निवडी संबंधीच्या सूचना मागविल्या होत्या. यामध्ये प्रा.भवरे यांच्या नावाला सर्वाधिक पसंती दर्शविण्यात आली.

  • आंबेडकरी साहित्य दालनाच्या आवाहनानुसार आयोजन समितीने महेंद्र भवरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी वामनदादा कर्डक, बाबुराव बागूल, डॉ. गंगाधर पानतावणे, राजा ढाले, अविनाश डोळस, यशवंत मनोहर, रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे अशा दिग्गजांनी या संमेलनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत.

राज्यभरातील सर्व पोलिसांच्या सुट्टया रद्द :
  • संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आयोध्या येथील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही दिवसांत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी मंगळवार पासून (ता. ५) राज्यातील सर्व पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत.

  • या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातही पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी सर्व पोलीस ठाण्यांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर नागरिकांनी सोशल मीडियात कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी पुणे येथे बैठक पार पडली.

  • अनेक वर्षापांसून सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्यावर अंतिम निकाल येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. या निकालानंतर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करून धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मंगळवारपासून जिल्ह्यातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. सर्व पोलिसांना तातडीने कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘आरसेप’मध्ये सहभागी होण्यास भारताचा नकार :
  • भारताने प्रादेशिक सर्वकष आर्थिक भागीदारी कराराच्या (आरसेप ) वाटाघाटीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी याबाबत ठाम भूमिका घेतलेली आहे. मूळ उद्देशांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आरसीईपी करार हा त्याचा मूळ हेतू प्रतिबिंबित करत नाही. याचे परिणाम निष्पक्ष किंवा संतुलित नाही, असे भारताकडून सांगण्यात आले आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

  • भारताने या कराराच्या पार्श्वभूमीवर काही मागण्या केल्या होत्या, ज्यामध्ये म्हटले होते की, या करारात चीनचा पुढाकार नसायला हवा, अन्यथा भारताला व्यापाराच्यादृष्टीने तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

  • ‘आरसेप’ एक व्यापार करार आहे, जो सदस्य देशांना एकमेकांबरोबर व्यापार करण्यात अनेक सवलती देणार आहे. या अंतर्गत निर्यातीवर लागणारा कर द्यावा लागणार नाही किंवा खूप कमी द्यावा लागेल. यामध्ये आशियातील दहा देशांसह अन्य सहा देशांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री-अमित शाह भेटीनंतरही सत्ताकोंडी कायम, भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत :
  • नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातली सत्ताकोंडी फुटेल, असं वाटलं होतं. मात्र असं काही घडताना दिसत नाहीय. कारण शिवसेनेच्या दबावाला बळी न पाडता भाजपनेही तूर्तास वेट अँड वॉचची भूमिका घ्यायचं ठरवलं आहे. महाराष्ट्रातला सत्तापेच इतक्यात संपणार नाहीय.

  • शिवसेना कितीही डरकाळ्या फोडत असली तरी भाजपही लगेच माघार घ्यायची शक्यता नाही. आज अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा हाच सूर दिसतोय.

  • आज दिल्लीत जवळपास चाळीस मिनिटे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ना राज्यातून कुणी आलं होतं, ना दिल्लीतलं कुणी यावेळी उपस्थित होतं.

  • अगदी दोघांमध्येच वन टू वन ही चर्चा झाली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबत जाण्याच्या कितीही वल्गना करत असली तरी तसं होणार नाही, असा ठाम विश्वास भाजप श्रेष्ठींना आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या बार्गेनिंगमधली हवा काढण्यासाठी अजून काही दिवस थांबायची त्यांची तयारी आहे.

दिनविशेष :
  • महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन

महत्वाच्या घटना 

  • १८१७: इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्या लढाईत इंग्रजांकडून बाजीरावाच्या सैन्याचा पराभव झाला.

  • १८२४: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.

  • १८७२: महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.

  • १९२९: जी. आय. पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.

  • १९४०: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे तिसऱ्यांदा निवडून आलेले. एकमेव राष्ट्रपती आहेत.

  • १९४५: कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९५१: बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन पश्चिम रेल्वे ची स्थापना करण्यात आली.

  • २००७: गुगलने ने अॅडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.

जन्म 

  • १८७०: स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)

  • १८८५: अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८१)

  • १८९२: इंग्रजी-भारतीय अनुवांशिक आणि जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस. हलदाणे यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९६४)

  • १९०५: भारतीय लेखक आणि कवी सज्जनद झहीर यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७३)

  • १९०८: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. राजा राव यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै २००६ – ऑस्टिन, न्यू जर्सी, यु. एस. ए.)

  • १९१७: स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट २००७)

  • १९२९: गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर २०००)

  • १९८८: क्रिकेटपटू विराट कोहोली यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८७९: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचे निधन. (जन्म: १३ जून १८३१ – एडिंबर्ग, यु. के.)

  • १९१५: राष्ट्रीय सभेचे संस्थापक व मुंबईचा सिंह उर्फ फिरोजशहा मेरवानजी मेहता यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८४५)

  • १९५०: चतुरंग गवई फय्याझ खाँसाहेब यांचे निधन.

  • १९९१: कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन.

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.