चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ नोव्हेंबर २०१९

Date : 6 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याला कात्री :
  • बीसीसीआयने आयपीएलच्या आगामी हंगामात उद्घाटन सोहळ्याला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड सेलिब्रेटींना बोलावून त्यांच्या नृत्याचे कार्यक्रम असलेल्या या सोहळ्यासाठी आयपीएलला अंदाजे ३० कोटी रुपये खर्च येतो. मात्र हा खर्च अनावश्यक असल्याचं मत, गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत समोर आलं. ज्यावर एकमत झाल्यामुळे उद्घाटन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • “उद्घाटन सोहळ्यावर होणारा खर्च हा अनावश्यक आहे. चाहत्यांना या सोहळ्यात तिळमात्र रस नसतो, पण यामध्ये प्रचंड पैसा वाया जातो.” गव्हर्निंग काऊन्सिलमधल्या सदस्याने इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राशी बोलताना माहिती दिली. बुधवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींसह हॉलिवूड कलाकारांनी आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात हजेरी लावली होती.

  • याचसोबत गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत No-Ball साठी स्वतंत्र पंच आणि Power Player चा निर्णय तूर्तास रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

पॅरिस करारातून अमेरिकेची माघार :
  • पॅरिस हवामान करारातून अमेरिका माघार घेत असल्याची अधिकृत सूचना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांना दिली आहे. या करारातून माघार घेत असल्याचे त्यांनी पूर्वीच जाहीर केले असले तरी त्यावर अखेर सोमवारी  शिक्कामोर्तब करण्यात आले.

  • या करारातून माघार घेण्याची घोषणा ट्रम्प यांनी जून २०१७ मध्येत केली होती पण त्याची प्रक्रिया सोमवारी संयुक्त राष्ट्रांना अधिकृत सूचना देऊ न सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता अमेरिका नोव्हेंबर २०२० मध्ये या करारातून मुक्त होणार आहे.

  • अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी सांगितले की, अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून माघार घेण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू केली आहे. या करारातील अटीनुसार अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांना या करारातून बाहेर पडत असल्याची सूचना पाठवली आहे. त्यानंतर एक वर्षांने अमेरिका या करारातून संपूर्णपणे बाहेर पडेल.

  • न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांना करारातून माघार घेत असल्याबाबत पहिली सूचना ४ नोव्हेंबर २०१९ रोजी दिली होती. पॅरिस करार १२ डिसेंबर २०१५ रोजी झाला होता. त्यावर अमेरिकेने २२ एप्रिल २०१६ रोजी स्वाक्षरी केली होती व ३ सप्टेंबर २०१६ रोजी कराराचे पालन करण्यास अनुमति दिली होती. करारातून माघार घेण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर डेमोक्रॅटिक पक्षाने टीका केली आहे. फ्रोन्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रान यांनी यांनी सांगितले की, अमेरिकेचा हा निर्णय दुर्दैवी आहे.

‘आरसेप’बाबत भारताचे प्रश्न सोडविण्यास चीन इच्छुक :
  • भारताने काही प्रश्न उपस्थित करीत ‘आरसेप’मधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्यानंतर चीनने यावर परस्पर समझोत्यावर आधारित तोडगा काढण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत.

  • आरसेप खुले आहे, परस्पर समझोत्याचे तत्त्व पाळण्यास आम्ही तयार आहोत आणि भारताने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यास तयार आहोत, भारत आरसेपमध्ये सहभागी झाल्यास स्वागतच आहे, असे चीनने म्हटले आहे.

  • दरम्यान, अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून माघार घेत असल्याचे संयुक्त राष्ट्रांना अधिसूचित केल्याबाबत चीनने नाराजी व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले की, अमेरिका हवामानाच्या मुद्दय़ावर जास्त जबाबदारी घेऊन काम करील अशी आशा आहे. हवामान बदल हे मोठे आव्हान आहे.

'कॅप्टन कूल' धोनी आता करणार 'कमेंट्री'; क्रिकेटमधील 'एन्ट्री'बद्दल वाढला सस्पेन्स : 
  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमानांना पराभव पत्करावा लागला. या सामन्यात DRSमध्ये झालेल्या चुकांमुळे टीम इंडियाला हार मानावी लागली. कर्णधार रोहित शर्मानंही सामन्यानंतर आपली चूक मान्य केली. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रिषभ पंतच्या चुकांचा पाढा पाहून चाहत्यांनी महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा गजर केला.

  • सोशल मीडियावर धोनीला पुन्हा बोलवा, असा हॅशटॅग चर्चेत राहिला. कॅप्टन कूल धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो एकही सामना खेळलेला नाही आणि सध्या सुरू असलेल्या मालिकेतही त्याचा टीम इंडियात समावेश नाही. क्रिकेटपासून दूर गेलेला धोनी आता नव्या भूमिकेत दिसणार आहे.

  • भारत दौऱ्यावर आलेला बांगलादेश संघ येथे तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिल्या ट्वेंटी-20त बांगलादेशनं सात विकेट्स राखून टीम इंडियाला पराभूत केले. भारताने ठेवलेले 149 धावांचे लक्ष्य बांगलादेशनं मुश्फिकर रहीमच्या नाबाद 60 धावांच्या खेळीवर पार केले. बांगलादेशनं प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त भारताला पराभूत करण्याचा पराक्रम केला. मालिकेतील पुढील दोन सामने राजकोट ( 7 नोव्हेंबर) आणि नागपूर ( 10 नोव्हेंबर) येथे होतील. त्यानंतर पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून इंदूर येथे, तर दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे होणार आहे.

जय शाह यांचेच ‘अच्छे दिन’! भाजपाच्या कार्यकाळात १५०० टक्क्यांनी वाढली संपत्ती : 
  • केंद्रिय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे पूत्र आणि अलिकडेच बीसीसीआयच्या सचिवपदी निवड झालेल जय शाह यांच्या कंपनीची कमाई एक हजार ५०० टक्क्यांनी वाढल्याचे वृत्त ‘द कारवान’ या वेबसाईटने दिले आहे. २०१४ मध्ये भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर जय शाह यांच्या कुसुम फिनझर्व्ह एलएलपी (Kusum Finserve LLP) या कंपनीची एकूण कमाई ७९ लाख ६० हजार रुपये इतके होते.

  • मागील पाच वर्षांमध्ये या कंपनीची एकूण कमाई ११९ कोटी ६१ लाख रुपये इतकी झाल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे. कुसुम फिनझर्व्ह एलएलपीनं कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर माहिती दाखल केली होती. कंपनीनं दाखल केलेल्या माहितीच्या आधारे कारवाननं कंपनीच्या व्यवसाय वृद्धीचं वृत्त दिलं आहे. या कंपनीत जय शाह भागीदार असून, कंपनीच्या संचालक पदाच्या समतुल्य पदावर कार्यरत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर म्हणजेच २०१४ ते २०१९ या आर्थिक वर्षात कुसुम फिनझर्व्ह एलएलपी कंपनीच्या संपत्तीत ११८ कोटी रूपयांहून अधिकची वाढ झाली असल्याचं म्हटलं आहे.

  • या वृत्तामधील माहितीनुसार २०१७ ते २०१८ दरम्यान जय यांच्या कंपनीला आर्थिक व्यवहाराचे तपशील देण्यास सांगण्यात आले तेव्हा या कंपनीची कमाई भरमसाठ वाढल्याचे पहिल्यांदा लक्षात आले. २०१४ आणि २०१५ मध्ये कंपनीची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसतानाही २०१६ पासून कंपनीला मोठ्या प्रमाणात क्रेडिटवर मोठी रक्कम देण्यात आल्याचे वृत्तामध्ये म्हटले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८६०: अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

  • १८८८: महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला.

  • १९१२: भारत या पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.

  • १९५४: मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.

  • १९९६: अर्जेंटिनाचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

  • २००१: संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • २०१२: बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसर्‍यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.

जन्म 

  • १८३९: प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ भगवादास इंद्रजी यांचा जन्म.

  • १८६१: बास्केटबॉल खेळाचे निर्माते जेम्स नास्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९३९)

  • १८८०: निसान मोटर कंपनीचे संस्थापक योशूसुका अकावा यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९६७)

  • १९०१: जेष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत श्री. के. क्षीरसागर यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९८०)

  • १९२६: अमेरिकन लेखक झिग झॅगलर यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर २०१२)

  • १९६८: याहू चे संस्थापक यारी यांग यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७६१: मराठेशाहीतील प्रसिद्ध राजकारणी (मराठा साम्राज्यातील ४ थी छत्रपती) महाराणी ताराबाई भोसले यांचे निधन.

  • १९९२: संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार यांचे पुणे इथे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९१६)

  • १९९८: कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९१७)

  • २००२: स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे वसंत कृष्ण वैद्य यांचे निधन.

  • २०१०: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९२०)

  • २०१३: भारतीय शेफ तरला दलाल यांचे निधन. (जन्म: ४ जुन १९३६)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.