चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ ऑक्टोबर २०१९

Date : 7 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दसऱ्याच्या सुमुहूर्तावर मिळणार पहिले ‘राफेल’ विमान :
  • नवी दिल्ली : भारतीय उपखंडातील सामरिक क्षमतेची समीकरणे बदलून भारताचे पारडे जड करणारे पहिले ‘राफेल’ विमान स्वीकारण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग स्वत: फ्रान्सला जाणार असून, त्यानंतर ते तेथे भारतीय परंपरेनुसार शस्त्रपूजनही करणार आहेत.

  • फ्रान्सकडून घ्यायच्या एकूण ३६ ‘राफेल’ विमानांपैकी पहिले विमान भारताकडे सुपुर्द करण्यासाठी येत्या मंगळवारचा दसरा आणि भारतीय हवाईदलाचा ८७वा वर्धापन दिन असा दुहेरी मुहूर्त निवडण्यात आला आहे. त्यानिमित्त राजनाथ सिंग सोमवारपासून तीन दिवस फ्रान्सच्या दौºयावर जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंग गेली अनेक वर्षे दसºयाच्या दिवशी न चुकता शस्त्रपूजन करण्याची परंपरा पाळत आले आहेत. गेल्या सरकारमध्ये गृहमंत्री असतानाही त्यांनी असे शस्त्रपूजन केले होते. तीच परंपरा कायम ठेवून पहिले ‘राफेल’ स्वीकारल्यानंतर यंदाचे शस्त्रपूजन ते फ्रान्समध्ये करतील.

  • पहिले ‘राफेल’ भारताकडे सुपुर्द करण्याचा औपचारिक समारंभ पॅरिसपासून सुमारे ५९० किमी अंतरावर असलेल्या बॉर्डेक्स या बंदराच्या शहरात असलेल्या दस्साँ एव्हिएशन कंपनीच्या कारखान्यात होणार आहे. हा समारंभ झाल्यानंतर तेथेच राजनाथ सिंग शस्त्रपूजन करतील व नंतर ‘राफेल’ विमानातून एक फेरफटकाही मारतील, असे संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते भारत भूषण बाबू यांनी सांगितले. फ्रान्सच्या सशस्त्र सैन्यदलांच्या मंत्री फ्लॉरेन्स पार्ले याही यावेळ आवर्जून उपस्थित असतील.

प्रज्ञानंद, आर्यन संयुक्तपणे आघाडीवर :
  • भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कडवी झुंज देत इराणचा आंतरराष्ट्रीय मास्टर आर्यन घोलामीविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. त्यामुळे सहाव्या फेरीअखेर प्रज्ञानंद आणि आर्यन यांनी १८ वर्षांखालील खुल्या गटात पाच गुणांनिशी संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले आहे. महिलांमध्ये अग्रमानांकित दिव्या देशमुख हिने शानदार विजयाची नोंद करत विजेतेपदाच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखले आहे.

  • पवई येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना द्वितीय मानांकित प्रज्ञानंदने सुरुवातीपासूनच बचावात्मक पवित्रा अवलंबला होता. संपूर्ण लढतीत आर्यन घोलामीचे पारडे जड होते. पण प्रज्ञानंदने सुरेखपणे चाली रचत ३९व्या चालीला ही लढत बरोबरीत सोडवली. भारताचा ग्रँडमास्टर पी. इनियन याने जर्मनीच्या व्हॅलेंटिन बकेल्सविरुद्ध विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण ५० चालीनंतर दोघांनीही बरोबरी पत्करण्याचे मान्य केले. इनियन ४.५ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

  • महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्याने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात कझाकस्तानच्या लिया कुरमांगालियेव्हा हिला पराभूत केले. भारताची रक्षिता रवी, हॉलंडची एलिन रोबर्स आणि रशियाची एकतारिना नासीरोव्हा यांनी पाच गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले असून त्याखालोखाल दिव्याने ४.५ गुण मिळवले आहेत.

रमाई आवास योजनेंतर्गत ४८१६ घरकूल पूर्ण :
  • भंडारा : जिल्ह्यातील रमाई आवास योजनेची वाटचाल कासवगतीने सुरु आहे. गत तीन वर्षात जिल्ह्यात शासनाने रमाई आवास योजनेतून ९६७५ घरकुलाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ८ हजार ८८८ घरकूले मंजूर केले. त्यापैकी ४ हजार ८१६ घरकुले संबंधित लाभार्थ्यांनी पुर्ण केले आहे. म्हणजे अजूनही ४ हजार ०७२ घरे अपूर्ण आहेत.

  • या योजनेची अपेक्षीत उद्दिष्ट साध्य होण्यास अडथळा निर्माण होत आहे. या आवास योजनेतील घरकुल पूर्ण करण्यासाठी राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने जनजागृती केल्याचा दावा करीत असले तरी गत तीन वर्षात जिल्ह्यात साधारण ४०७२ घरकुल रखडले असल्याची धक्कादायक माहिती आहे.

  • अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी शासनातर्फे रमाई आवास योजना राबविण्यात येते. ग्रामीण भाग, नगर परिषद हद्दीत संबंधित यंत्रणेमार्फत योजना राबविली जाते. ग्रामीण भागाचा विचार केल्यास साधारण एक लाख ३० हजार रुपयांचे अनुदान शासनाचे, तर १८ हजार ९० रुपयांचे अनुदान रोहयोच्या मंजुरीपोटी दिली जात असते. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत योजना राबविली जात आहे.

  • रमाई आवास योजनेंतर्गत २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात १०३५ घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १०२५ घरकुले मंजूरपैकी केवळ ९०७ घरकुल पुर्ण करण्यात आले. २०१७-१८ मध्ये ७१४० घरकुलांची उद्दिष्ट होते. त्यापैकी ६७६६ मंजूर घरकुलपैकी केवळ ३८२५ घरकुल पुर्ण झाली.

अभिनंदन यांच्या ५१ व्या स्क्वाड्रनला मिळणार पुरस्कार, बालाकोट हल्ल्यातील कामगिरीचाही होणार गौरव :
  • नवी दिल्ली : बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानचा प्रतिहल्ला विफल करणाऱ्या व त्या देशाचे एफ-१६ विमान पाडणा-या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या ५१ व्या स्क्वाड्रनला भारतीय हवाई दलदिनी ८ आॅक्टोबरला हवाई दलप्रमुख आर. के. एस. भदौरिया यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

  • पाकिस्तानच्या विमानांनी भारतावर हल्ला करायचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाच्या विमानांनी २७ फेब्रुवारी रोजी हाणून पाडला होता. या महापराक्रमाबद्दल हवाई दलाच्या ५१ व्या स्क्वाड्रनचे कमांडिंग आॅफिसर ग्रुप कॅप्टन सतीश पवार हे हा पुरस्कार स्वीकारतील.

  • बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे दहशतवादी तळ भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बॉम्बफेक करून उद्ध्वस्त केले. त्यानंतर दुसºयाच दिवशी पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांनी भारतावर हल्ला चढविण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडण्यात आला.एफ-१६ सारखे अत्याधुनिक विमान भारतीय हवाई दलाच्या मिग-२१ विमानाने पाडले. ही कामगिरी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी केली होती. त्यांचे विमानही पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाडण्यात आले. अभिनंदन यांना पाकिस्तानच्या सैनिकांनी अटक केली. मात्र भारताने दाखविलेल्या कणखर भूमिकेमुळे त्यांची १ मार्च रोजी पाकिस्तानने सुटका केली. त्यानंतर त्यांनी सहा महिने विश्रांती घेतली. प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यानंतर ते २ सप्टेंबर रोजी पुन्हा सेवेत रुजू झाले.

  • तत्कालीन हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांच्यासोबत त्यांनी मिग-२१ विमानातून उड्डाणही केले. पाकिस्तानशी मुकाबला केल्याबद्दल अभिनंदन यांना स्वातंत्र्य दिनी वीरचक्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

आरेतील वृक्षतोडीविरोधात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी :
  • नवी दिल्ली : आरेमध्ये मेट्रोच्या कारशेडसाठी सुरु असलेल्या वृक्षतोड प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली असून यावर उद्या सुनावणी होणार आहे.

  • आरे वृक्षतोड प्रकरणी कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहिलं होतं. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयात याबाबत उद्या सकाळी 10 वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी विशेष पीठाची स्थापना करण्यात आली आहे.

  • सरन्यायाधीश आज दिल्लीत नसल्यामुळे उद्या विद्यार्थ्यांची चिठ्ठी त्यांच्यासमोर ठेवली जाईल. विद्यार्थ्यांच्या या चिठ्ठीत वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहितीही देण्यात आली आहे.

संरक्षण मंत्री फ्रान्समध्ये करणार ‘शस्त्रपूजन’; भारतात घेऊन येणार पहिलं राफेल विमान :
  • राफेल विमानांची डिलिव्हरी घेण्यासाठी केंद्रीय संरक्षणं मंत्री राजनाथ सिंह पॅरिसला जाणार आहेत. ८ ऑक्टोबर रोजी पहिले राफेल लढाऊ विमान फ्रान्सकडून भारताकडे सुपूर्द केले जाणार आहे. दरम्यान, याच दिवशी विजयादशमी असल्याने राजनाथ पॅरिसमध्ये राफेलचे पुजन अर्थात शस्त्रपूजन करणार आहे.

  • हिंदू परंपरेमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर शस्त्रपूजन केले जाते. यामध्ये सैनिक आपल्या हत्यारांची पूजा करतात. आधुनिक काळातही घरोघरी लोखंडी हत्यारं किंवा साधनं पूजली जातात. त्याअनुषंगाने राजनाथ सिंह दसऱ्याच्या दिवशी पॅरिसमध्ये राफेलपूजन करणार आहेत. यापूर्वी आपल्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात राजनाथ सिंह प्रत्येक दसऱ्याला शस्त्रपूजन करीत होते. आता संरक्षण मंत्री झाल्यानंतरही ते आपली ही परंपरा कायम राखणार असल्याचे त्यांचे जवळचे सहकारी सांगतात.

  • राजनाथ सिंह लवकरच पॅरिसला जाणार आहेत. तिथे ते फ्रान्सचे राष्ट्रापती इमॅन्युएल मैक्रो यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते बोर्डेऑक्सला जाणार आहेत. या ठिकाणी त्यांच्याकडे भारतासाठी बनवण्यात आलेले पहिले राफेल विमान सुपूर्द करण्यात येणार आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतुवेदना जागरूकता दिन

महत्वाच्या घटना 

  • १९०५: पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्‍न होता.

  • १९१२: हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.

  • १९१९: महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले.

  • १९१९: के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली.

  • १९३३: पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन एअर फ्रान्स ही कंपनी स्थापण्यात आली.

  • १९४९: जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना.

  • १९७१: ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९९६: फॉक्स न्यूज चॅनलचे प्रसारण सुरू होते.

  • २००१: सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.

  • २००२: सलमान खान यांची वांद्रे पोलिसांत अटक.

जन्म 

  • १८६६: मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५)

  • १८८५: अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९६२)

  • १९००: जर्मन नाझी अधिकारी हाइनरिक हिमलर यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९४५)

  • १९०७: गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रागजी डोस्सा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९९७)

  • १९१४: गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९७४)

  • १९१७: कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे २०१० – पुणे)

  • १९२९: आयमॅक्स कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक ग्रॅमी फर्ग्युसन यांचा जन्म.

  • १९५२: रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा जन्म.

  • १९५९: एक्स फैक्टर आणि ब्रिटन गॉट टेलेन्ट चे निर्माते शमौन कोवेल यांचा जन्म.

  • १९६०: शास्त्रीय गायिका आश्विनी भिडे-देशपांडे यांचा जन्म.

  • १९७८: भारतीय जलदगती गोलंदाज जहीर खान यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७०८: शिखांचे १० वे गुरू गुरू गोबिंद सिंग यांचे निधन. (जन्म: २२ डिसेंबर १६६६)

  • १८४९: अमेरिकन गूढ व भयकथांचा लेखक व कवी एडगर अ‍ॅलन पो यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८०९)

  • १९५१: फिलिप्स कंपनी चे सहसंस्थापक एंटोन फिलिप्स यांचे निधन. (जन्म: १४ मार्च १८७४)

  • १९७५: कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८८९ – मुळबागल, कोलार, कर्नाटक)

  • १९९८: महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचे निधन.

  • १९९९: साहित्यिक, वाचकप्रिय वीणा या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार उमाकांत निमराज ठोमरे यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९२९ – अहमदनगर)

  • २०११: अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष रमीझ अलिया यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९२५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.