चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ फेब्रुवारी २०२०

Updated On : Feb 08, 2020 | Category : Current Affairsराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा - प्रशांत, अपूर्वाला राष्ट्रीय विजेतेपद : 
  • विश्वविजेत्या प्रशांत मोरे (रिझव्‍‌र्ह बँक) याने पहिला सेट गमावूनही चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या संदीप दिवे याचे आव्हान परतवून लावत राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली.

  • जळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिलांच्या अंतिम सामन्यात विश्वविजेत्या एस. अपूर्वा (एलआयसी) हिने माजी विश्वविजेती रश्मी कुमारी (पेट्रोलियम क्रीडा मंडळ) हिला सरळ दोन सेटमध्ये पराभूत करत विजेतेपद पटकावले.

  • श्री शिवछत्रपती जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी रात्री रंगलेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात संदीपने पहिला सेट २५-१६ असा जिंकत प्रशांतसमोर कडवे आव्हान उभे केले. मात्र अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अनुभव गाठीशी असलेल्या प्रशांतने हार न मानता पुढील दोन्ही सेट सहजपणे जिंकत राष्ट्रीय विजेतेपद आपल्या नावावर केले. त्याने ही लढत १६-२५, २५-१०, २७-७ अशा फरकाने जिंकली.

  • महिलांमध्ये दोन्ही विश्वविजेत्या खेळाडू अंतिम फेरीत आमने-सामने आल्यामुळे या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. पण अपूर्वाने २५-११, २५-११ अशा फरकाने रश्मीचा प्रतिकार मोडून काढला. विशेष म्हणजे, अपूर्वाने स्पर्धेतील सर्व सामने दोन सेटमध्ये जिंकून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

‘एचडीआयएल’ची मालमत्ता विकण्यास स्थगिती : 
  • पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेची (पीएमसी) थकबाकी फेडण्यासाठी दिवाळखोरीतील हाऊसिंग डेव्हलपमेण्ट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि.ची (एचडीआयएल) विक्री करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

  • मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या याचिकेची सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. बी. आर. गवई आणि न्या. सूर्य कान्त यांच्या पीठाने दखल घेतली.

  • रिझव्‍‌र्ह बँकेच्या याचिकेवर पीठाने सरोश दमाणिया यांच्यासह अन्य पक्षकारांवर नोटिसा बजावल्या आहेत. पीएमसी बँक खातेदारांना त्यांची थकीत रक्कम मिळावी यासाठी दमाणिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

‘करोना’ग्रस्त जहाजावर भारतीय पर्यटक : 
  • जपानच्या योकोहामा बंदराजवळ एका आलिशान ‘क्रूझ’ला (पर्यटक जहाज) अलग ठेवण्यात आले असून त्यामध्ये करोना विषाणूची लागण झालेले ६१ जण आहेत. त्यामध्ये अनेक भारतीय खलाशांचा समावेश असून पश्चिम बंगालमधील एक नागरिकही आहे.

  • या पर्यटक जहाजावर करोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने पश्चिम बंगालमधील या नागरिकाने भारतीय अधिकाऱ्यांना तातडीने मदत करण्याची विनंती केली आहे. हा भारतीय उत्तर दिनाजपूर जिल्ह्य़ातील हातिपा गावचा रहिवासी असून त्याने समाजमाध्यमांवर जहाजावरील व्हिडीओ व्हायरल केले आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहोचण्याचाही त्याने प्रयत्न केला आहे. करोनाची लागण झाली आहे त्यांना स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था करण्यासाठी मोदी आणि बॅनर्जी यांनी जपान सरकारशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

०८ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)