चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ नोव्हेंबर २०१९

Date : 9 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘आयपीएल’मधील प्रत्येक सामन्याची सुरुवात राष्ट्रगीताने व्हावी :
  • इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नव्या हंगामापासून प्रत्येक सामन्याला भारताच्या राष्ट्रगीताने सुरुवात करावी, असा प्रस्ताव किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळापुढे (बीसीसीआय) गुरुवारी ठेवला.

  • साधारणपणे ‘आयसीसी’च्या स्पर्धामध्ये राष्ट्रगीताने सामन्यांना सुरुवात होते. परंतु ‘आयपीएल’ ही विश्वातील अव्वल क्रमांकाची क्रिकेट लीग असल्यामुळे वाडिया यांनी ‘बीसीसीआय’ला याविषयी विचारणा केली आहे. ‘‘बीसीसीआयने ‘आयपीएल’च्या उद्घाटन सोहळ्यावर पैसे खर्च न करण्याचा निर्णय घेऊन अतिशय योग्य काम केले आहे. उद्घाटन सोहळ्यात अनावश्यक खर्च केला जातो, असे मला नेहमीच वाटते. परंतु याबरोबरच बीसीसीआयने ‘आयपीएल’च्या सामन्यांना भारताच्या राष्ट्रगीताने सुरुवात करावी, असे माझे मत आहे,’’ असे वाडिया म्हणाले.

  • ‘‘याप्रकरणी मी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला पत्र लिहिले असून लवकरच त्यांच्याकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे,’’ असेही वाडिया यांनी सांगितले.

१ डिसेंबरपासून टोलच्या नियमांमध्ये होणार ‘हा’ मोठा बदल :
  • १ डिसेंबरपासून टोलच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरील सर्व टोल प्लाझांमध्ये फास्टॅगद्वारे टोलची रक्कम भरता येणार आहे.

  • केंद्र सरकारनं १ डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घोषणा केली होती.

  • नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं देशभरतील सर्व टोल प्लाझांवर इलेक्ट्रॉनिक टोल घेण्यास सुरूवात केली आहे. यासाठी वाहन चालकांना आपल्या गाड्यांवर फास्टॅग लावावं लागणार आहे. हा फास्टटॅग अधिकृत टॅग विक्रेते किंना बँकेतून विकत घेता येऊ शकतो. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवरदेखील हा टॅग विकत घेता येणार आहे.

  • टोल प्लाझावर ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शनसाठी विंडस्क्रिनवर फास्टॅक लावावा लागणार आहे. यामध्ये रेडियो फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFDI) देण्यात येते. वाहन टोल प्लाझावर पोहोचल्यावर त्या ठिकाणी लावण्यात आलेला सेन्सर फास्टॅक स्कॅन करतो. त्यानंतर फास्टॅगच्या अकाऊंटमधून पैसे वजा होतील.

बुध ग्रहाचे सोमवारी अधिक्रमण :
  • येत्या सोमवारी बुध ग्रह हा सूर्यबिंबावरून अधिक्रमण करणार आहे. मात्र, हे अधिक्रमण भारतामध्ये दिसणार नसून केवळ उत्तर अमेरिका, ओसेनिआ आणि न्यूझीलंड या देशांमध्येच दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. तसेच अशा प्रकारचे अधिक्रमणचा योग तेरा वर्षांनंतर पुन्हा येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • पृथ्वीवरून पाहताना बुध ग्रह जेव्हा सूर्यबिंबावरून जाताना दिसतो, त्याला ‘बुध ग्रहाचे अधिक्रमण’ असे म्हणतात. बुध ग्रहाप्रमाणेच शुक्राचे अधिक्रमणही पृथ्वीवरून दिसते. बुधाचे अधिक्रमण मात्र दुर्बिणीतून पहावे लागते. सूर्यग्रहणात जसे चंद्रबिंब सूर्यबिंबावरून जाताना दिसते, तसाच हा प्रकार असतो, असे सोमण यांनी सांगितले.

  • यापूर्वी ९ मे २०१६ रोजी बुध ग्रहाचे अधिक्रमण झाले होते. त्यानंतर आता येत्या ११ नोव्हेंबर रोजी बुधाचे अधिक्रमण होत आहे. हे अधिक्रमण भारतातून दिसणार नाही. दक्षिण आशिया, यूरोप, आफ्रिका, दक्षिण ग्रीनलँड, अंटाक्र्टिका, दक्षिण अमेरिका, अलास्का सोडून उत्तर अमेरिका, ओसेनिआ आणि न्यूझीलंड येथून हे अधिक्रमण दिसणार आहे.

अयोध्या खटल्याचा आज निकाल :
  • रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज, शनिवारी सकाळी १०.३० वाजता लागणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अजय बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सलग ४० दिवस झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने १६ ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता.

  • अयोध्येतील २.७७ एकर वादग्रस्त जमीन तीन दावेदारांमध्ये विभागण्याचा निकाल २०१०मध्ये अलाहाबाद खंडपीठाने दिला होता. त्यानुसार, रामलल्ला विराजमान, निर्मोही आखाडा आणि उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात या जमिनीचे वाटप करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. एकूण १४ आव्हान याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेतली.

  • सर्वोच्च न्यायालयाने न्या. एफ. एम. खलिफुल्ला, श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीराम पांच्छू यांची समिती नेमून अयोध्या प्रकरणाचा वाद सामोपचाराने मिटवण्यास परवानगी दिली होती, मात्र चर्चा निष्फळ ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने सलग सुनावणी घेऊन खटल्याचा निपटारा करण्याचा निर्णय घेतला. वादग्रस्त २.७७ एकर जमीन ही रामजन्मभूमी असल्याने सर्व जमिनीचा ताबा देण्याची मागणी खटल्याशी संबंधित हिंदू याचिकाकर्त्यांनी केली होती. त्या मागणीला मुस्लीम पक्षकारांनी विरोध केला होता.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेमधील दहा महत्वाचे मुद्दे :

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेबद्दलची नाराजी उघडपणे व्यक्त केली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांच्या पत्रकार परिषदेतील हे दहा महत्वाचे मुद्दे

१) अडीच अडीच वर्षाचा प्रस्ताव नाही

२) युती तुटलेली नाही

३) सत्तेत बसून टीका सहन होणार नाही

४) आजूबाजूची लोकं दरी वाढवणारी विधाने करतात

५) उद्धव यांचे ते विधान धक्कादायक

६) माझा फोन उचलला नाही

७) आम्ही कधी विरोधी विधान केला नाही

८) शिवसेनेशी युती का केली?

९) काळजीवाहू मुख्यमंत्री

१०) घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्यांना आव्हान

दिनविशेष :
  • धन्वंतरी दिन / कायदाविषयक सेवा दिन

महत्वाच्या घटना 

  • १९२३: दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले.

  • १९३७: जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.

  • १९५३: कंबोडियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९६५: इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बर्‍याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.

  • १९६७: रोलिंग स्टोन मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला.

  • १९९७: साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा जनस्थान पुरस्कार प्रदान.

  • २०००: उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

  • २०००: न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासो यांचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.

जन्म 

  • १८०१: आटवलेल्या दुधाचे शोधक गेल बोर्डन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १८७४)

  • १८७७: इटली प्रजास्ताक चे पहिले अध्यक्ष इरिको डी निकोला यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑक्टोबर १९५९)

  • १८७७: सारे जहाँन से अच्छा चे पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते कवी मोहम्मद इक़्बाल यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९३८)

  • १९०४: सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १९६६)

  • १९२४: ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी २००२)

  • १९३१: लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर २००७)

  • १९३४: अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक कार्ल सगन यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९९६- सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन, यु. एस. ए.)

  • १९४४: भारतीय कोरिओग्राफर चितेश दास यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी २०१५)

मृत्यू 

  • १९४०: इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८६९)

  • १९५२: इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८७४)

  • १९६२: भारतरत्न पुरस्कार विजेते धोंडो केशव कर्वे यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १८५८)

  • १९७०: फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८९०)

  • १९७७: सुप्रसिद्ध संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिगदर्शक व लेखक केशवराव भोळेे यांचे निधन. (जन्म: २३ मे १८९६)

  • २०००: मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते एरिक मॉर्ले यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९१८)

  • २००५: भारताचे १०वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९२०)

  • २०११: भारतीय-अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोविंद खुराना यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९२२)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.