चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० डिसेंबर २०१९

Date : 10 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकन आयोगाची अमित शाहंवर निर्बंध लादण्याची मागणी :
  • आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या अमेरिकन आयोगाने केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावर तीव्र आक्षेप घेतला आहे. हे चुकीच्या दिशेने जाणारे धोकादायक वळण आहे असे अमेरिकन आयोगाने म्हटले आहे. हे विधेयक भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घालावेत अशी मागणी आयोगाने केली आहे.

  • आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० मते पडली. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरीकांना यापुढे बेकायद मानले जाणार नाही. त्यांना भारतीय नागरीकत्व बहाल करण्यात येईल.

  • “कॅब संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले तर अमेरिकेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्य प्रमुख नेत्यांवर निर्बंध लावण्याचा विचार करावा” असे अमेरिकेच्या यूएससीआयआरएफ आयोगाने म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिकेची झोझिबिनी टुंझी मिस युनिव्हर्स : 
  • जगभरातील ९० देशांच्या प्रतिनिधींमधून मिस युनिव्हर्स म्हणून दक्षिण आफ्रिकेची झोझिबिनी टुंझी हिची निवड करण्यात आली आहे.

  • अमेरिकेतील दूरचित्रवाहिनीवरील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व स्टिव्ह हार्वे यांनी टायलर पेर्री स्टुडिओ येथे झालेल्या स्पर्धेत २६ वर्षीय टुंझी ही मिस युनिव्हर्स झाल्याचे जाहीर केले. २०१८ ची मिस युनिव्हर्स फिलिपाइन्सची कॅट्रिओना ग्रे हिने टुंझीला मुकुट परिधान

  • केला. भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘मिस इंडिया’ वर्तिका सिंग हिने पहिल्या २० जणांमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. तर मिस पोटरे रिको मॅडिसन अँडरसन ही द्वितीय तर मिस मेक्सिकन अ‍ॅश्ली अल्वीड्रेज हिने तृतीय स्थान पटकावले. पहिल्या पाच जणींमध्ये कोलंबिया आणि थायलंडच्या स्पर्धकांनी स्थान निश्चित केले. टुंझी हिने ट्विटरवर विजेती झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

भारती एअरटेल परदेशी कंपनी बनण्याच्या मार्गावर : 
  • देशातील मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेल आता परदेशी कंपनी बनण्याच्या मार्गावर आहे. भारती एअरटेलची प्रमोटर भारती टेलिकॉमनं ४ हजार ९०० कोटी रूपयांच्या परदेशी गुंतवणुकीसाठी दूरसंचार विभागाची परवानगी मागितली आहे. दूरसंचार विभागाकडून कंपनीला परवानगी मिळाल्यास भारती एअरटेल ही परदेशी दूरसंचार कंपनी बनणार आहे. असं झाल्यास भारती टेलिकॉममध्ये परदेशी शेअरहोल्डिंग ५० टक्क्यांपेक्षा अधिक होणार आहे. एका वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

  • अहवालानुसार, भारती टेलिकॉमने सिंगापूरच्या सिंगटेल आणि इतर काही परदेशी कंपन्यांकडून गुंतवणूक वाढवण्यासाठी मंजुरीसाठी अर्ज केला आहे. दूरसंचार विभागाकडून याच महिन्यात भारती एअरटेलला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी दूरसंचार विभागानं भारती एअरटेलचा अर्ज नामंजुर केला आहे. दरम्यान, त्यावेळी परदेशी गुंतवणुकदाराचं नाव स्पष्ट नसल्यानं भारती एअरटेलचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता.

  • सध्या भारती टेलिकॉममध्ये सुनिल भारती मित्तल आणि त्यांच्या कुटुंबीयांचा ५२ टक्के हिस्सा आहे. तसंच भारती टेलिकॉमकडे एअरटेलचे ४१ टक्के शेअर्स आहेत. तर परदेशी प्रमोटर होल्डिंग २१.४६ टक्के आहे. तर ३७ टक्के शेअर्स हे सामान्य गुंतवणुकदारांकडे आहेत. भारती एअरटेलमध्ये परदेशी गुंतवणुकदारांचे शेअरहोल्डिंग ४३ टक्के आहे. भारती टेलिकॉमचे स्वामित्व परदेशी कंपन्यांकडे गेल्यानंतर एअरटेलमधील परदेशी गुंतवणुकदारांचा हिस्सा वाढून तो ८४ टक्के होणार आहे.

भाजपाचे आमदार ठरले देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर : 
  • भाजपाचे आमदार आणि बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा हे देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत. लोढा यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ३१ हजार ९३० कोटी रूपये इतके झाले आहे.

  • हुरुन रिपोर्ट आणि ग्रोही इंडियाने सोमवारी ‘ग्रोही हुरुन इंडिया रीयल एस्टेट रिच लिस्ट २०१९” जारी केली. या यादीमध्ये लोढा यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये लोढा यांनाच पहिलं स्थान देण्यात आलं होतं.

  • लोढा यांच्यानंतर डिएलएफचे उपाध्यक्ष राजीव सिंग यांना दुसरं स्थान देण्यात आलं आहे. २५ हजार ८० कोटी रूपयांच्या वार्षिक उत्पन्नासहित ते दुसऱ्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीत त्यांना तिसरं स्थान देण्यात आलं होतं. तर एम्बेसी समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र विरवानी यांना या यादीत तिसरं स्थान देण्यात आलं आहे.

  • त्यांच्याकडे २४ हजार ७५० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्न आहे. तर निरंजन हिरानंदानी यांना १७ हजार ३० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्नासह चौथं, चंदू रहेजा यांना १५ हजार ४८० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्नासह पाचवं आणि विकास ओबेरॉय यांना १३ हजार ९१० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्नासह सहावं स्थान देण्यात आलं आहे.

१० डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.