चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० नोव्हेंबर २०१९

Updated On : Nov 10, 2019 | Category : Current Affairsतेजस्विनीकडून ऑलिम्पिकचे स्थान पक्के :
 • महाराष्ट्राची अव्वल नेमबाज तेजस्विनी सावंत हिने शनिवारी भारताला ऑलिम्पिकचे १२वे स्थान मिळवून दिले. १४व्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनीला महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पदकापर्यंत झेप घेता आली नसली तरी तिने पुढील वर्षी रंगणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे आणखी एक स्थान निश्चित केले. असे करणारी ती राही सरनोबतनंतर कोल्हापूरची दुसरी नेमबाज ठरली आहे.

 • अंतिम फेरीत मजल मारणाऱ्या आठपैकी पाच जणींनी याआधीच ऑलिम्पिकचे स्थान पक्के केल्यामुळे अन्य तीनपैकी एका स्थानावर भारताला मोहोर उमटवता आली. पात्रता फेरीत ११७१ गुणांची कमाई करून पाचव्या स्थानासह ३९ वर्षीय तेजस्विनीने अंतिम फेरीत मजल मारली होती. कडवी लढत देऊनही तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिने ४३५.८ गुण मिळवले. अंतिम फेरीतील दुसऱ्या टप्प्यात तेजस्विनी तिसऱ्या स्थानी होती, पण ८.८ गुणांचा वेध घेतल्यामुळे ती मागे पडली.

 • २००८, २०१२ आणि २०१६ ऑलिम्पिकचे तिकीट न मिळाल्याने तेजस्विनीला आता पहिल्यांदाच ऑलिम्पिकवारी करण्याची संधी मिळणार आहे.

अयोध्या निकालानंतर पंतप्रधान मोदी यांचं पहिलं ट्विट :
 • रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात येणार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनीही याबाबत ट्विट केले आहे.

 • “देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर आपला निर्णय सांगितला आहे. या निर्णयाला कोणाचाही विजय किंवा पराजय समजले जाऊ नये. रामभक्ती असो किंवा रहीमभक्ती, ही वेळ आपली भारतभक्ती अधिक बळकट करण्याचा आहे. देशातील नागरिकांनी शांतता, सद्भावना आणि एकता कायम राखावी”, असे आवाहन मोदी यांनी केले आहे.

 • देश के सर्वोच्च न्यायालय ने अयोध्या पर अपना फैसला सुना दिया है। इस फैसले को किसी की हार या जीत के रूप में नहीं देखा जाना चाहिए।

अशोक सिंघलना भारतरत्न देण्याची सुब्रमण्यम स्वामींची मागणी :
 • भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी सध्या अतिशय आनंदी आहेत. भाजपाचे नेते तसेच रामजन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणातील प्रमुख याचिकाकर्ते राम मंदिराचे समर्थक सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या निकालानंतर ट्विटद्वारे आपली भावना व्यक्त केली आहे. त्यांनी या निर्णयास त्यांनी विजय असे संबोधले आहे. शिवाय मोदी सरकारकडे विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांना भारतरत्न देण्याची देखील मागणी केली आहे.

 • ‘आताच्या विजयाच्या क्षणी अशोक सिंघल यांचे स्मरण करायला हवे आणि नरेंद्र मोदी सरकारने त्यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर करायला हवा, ‘ अशी मागणी त्यांनी केली. 

 • अयोध्या प्रकरणाचे एका स्थानिक जमिनीच्या वादावरून आजच्या सर्वात मोठ्या धार्मिक व राजकीय चर्चेतील मुद्यात परिवर्तन करण्यात सिंघल यांची मुख्य भूमिका होती. दोन दशकांहून अधिक काळ विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष राहिलेल्या सिंघल यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी विहिंपची पहिला धर्मसंसद बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

आता लक्ष्य फक्त राम मंदिर :
 • जवळपास पाच शतकांचे अथक प्रयत्न, अनेक अडथळे, अनेकांचे बलिदान अशा अखंड संघर्षांनंतर सत्य आणि न्यायाचा विजय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा हिंदू समाजाला मिळणाऱ्या न्यायाची सुरुवात असून, आता लक्ष्य फक्त राम मंदिर उभारणी हेच असेल, असे मत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

 • काशी आणि मथुराचा विषय सध्या विहिंपच्या अजेंडय़ावर नाही. अयोध्येत राम मंदिर बांधणे हे समाजजागृतीच्या महत्त्वाच्या कार्याचा प्रारंभ ठरेल. सांस्कृतिक जागृती आता सुरू होत असल्याचे आलोक कुमार म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारने लवकरात लवकर राम मंदिर उभारण्याची प्रक्रिया हाती घ्यावी. मंदिरासाठी लागणारे ५० टक्के खांब तयार आहेत. मंदिर उभारणीत त्यांचा वापर केला जाईल, असेही आलोक कुमार म्हणाले.

 • हिंदू समाज जगभर पसरलेला असून तो शांतताप्रिय आहे. तो नेहमीच मर्यादेतच वागतो. गेली ७० वर्षे हा समाज या निकालाची वाट पाहत होता. सलग ४० दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्व वाद आणि अडथळे आणण्याचे सर्व प्रयत्न होऊनही न्यायालयाने राम मंदिर बांधण्याचा मार्ग खुला केला. या निकालाने जगभरातील हिंदू समाजाला आनंद झाला आहे, असे आलोक कुमार म्हणाले.

दिनविशेष :
 • जागतिक विज्ञान दिन

महत्वाच्या घटना 

 • १६९८: ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले.

 • १९९०: भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.

 • १९५८: गुजरातमध्ये बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीमध्ये तेल सापडले.

 • १९६०: नागविदर्भ चळवळीच्या आदेशावरून नागपुरात हरताळ, घाऊक व्यापार, दुकाने, हॉटेले बंद.

 • १९८३: बिल गेट्स यांनी विंडोज १.० प्रकाशित केले.

 • १९९९: शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा तानसेन सन्मान गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.

 • २००१: ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड.

जन्म 

 • १८१०: फ्लश शौचालय चे निर्माते जॉर्ज जेनिंग्स यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १८८२)

 • १८४८: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९२५)

 • १८५१: प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै १८८२)

 • १९०४: श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक कुसुमावती देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९६१)

 • १९१९: एके ४७ बंदुकीचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१३)

 • १९२५: अभिनेता रिचर्ड बर्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९८४)

 • १९४४: किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष असगर अकयेव यांचा जन्म.

 • १९६४: हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा यांचा जन्म.

मृत्यू 

 • १६५९: विजापूरचे सरदार अफजलखान यांचा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.

 • १९२०: स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर २००४)

 • १९२२: शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ व ज्योतिर्विद गणेश सखाराम खरे यांचे पुणे येथे निधन.

 • १९३८: तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचे निधन. (जन्म: १९ मे १८८१)

 • १९४१: संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार ल. रा. पांगारकर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८७२)

 • १९८२: रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १९०६)

 • १९९६: सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांचे निधन. (१६ मे १९२६)

 • २००३: झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष कन्नान बनान यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९३६)

 • २००९: अभिनेत्री सिंपल कपाडिया यांचे निधन.(जन्म: १५ ऑगस्ट १९५८)

 • २०१३: भारतीय लेखक विजयदन देठा यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२६)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)