चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ जानेवारी २०२०

Date : 11 January, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
CAA  देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू; केंद्र सरकारची अधिसूचना जारी : 
  • लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ११ डिसेंबर रोजी सुधारित नागरिकत्व विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. १२५ विरूद्ध १०५ च्या फरकानं राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं. आता देशभरात हा कायदा लागू करण्यात आला असून केंद्र सरकारनं याची अधिसूचना जारी केली आहे.

  • नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आल्यानंतर ते राज्यसभेत मांडण्यापूर्वी वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी हे विधेयक देशहिताचं नाही अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी या विधेयकावर राज्यसभेत चर्चा पार पडली. मतदानानंतर हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं आहे.

  • यावेळी सभागृहात ४ सदस्य प्रकृती चांगली नसल्याने हजर नव्हते. तर शिवसेनेने मतदानावर बहिष्कार घालत सभात्याग केला होता. या विधेयकावरुन जी चर्चा राज्यसभेत झाली त्यानंतर विरोधकांनी १४ सूचना मांडल्या होत्या. या सूचनांबाबतही मतदान घेण्यात आलं. मतदान घेऊन १४ पैकी बहुतांश सूचना फेटाळण्यात आल्या.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक : 
  • सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरबाबत दिलेल्या आदेशाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी स्वागत केले आहे. सरकारने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र या वेळी सर्वोच्च न्यायालय कोणत्याही दबावाखाली आले नाही, हा ऐतिहासिक निकाल आहे, असे आझाद यांनी म्हटले आहे.

  • आम्ही या आदेशाचे स्वागत करतो आणि ऐतिहासिक निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन करतो. देशातील जनता विशेषत: जम्मू-काश्मीरमधील जनता या निर्णयाच्या प्रतीक्षेत होती, सरकारने संपूर्ण देशाची दिशाभूल केली होती, असेही आझाद यांनी म्हटले आहे.

  • दरम्यान, जम्मू-काश्मीरबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या घटनाबाह्य़ आणि अरेरावीच्या भूमिकेला मिळालेली चपराक आहे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी व्यक्त केले आहे. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्याबाबतची जबाबदारी स्वीकारावी आणि गोव्याच्या राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा, असेही चिदम्बरम यांनी म्हटले आहे.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचा बारा देशांशी करार : 
  • वर्धा : येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने शैक्षणिक आदानप्रदान करण्याच्या हेतूने जगातील बारा देशांशी करार करीत हिंदी प्रसाराचा मार्ग प्रशस्त केला आहे.

  • १० जानेवारी हा विश्व हिंदी दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. हिंदी आंतरराष्ट्रीय भाषेच्या स्वरूपात सक्षम व्हावी म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन या निमित्ताने केले जाते. या विद्यापीठातून शिकून आपल्या देशात परतलेले विद्यार्थी उत्साहात हा दिवस त्यांच्या देशात साजरा करतात. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू हनुमानप्रसाद शुक्ल यांनी विद्यापीठाच्या प्रसाराबाबत ‘लोकसत्ता’ला माहिती देताना विविध उपक्रम नमूद केले.

  • विद्यापीठात के. कुमारस्वामी यांच्या नावावर भारतीय संस्कृती व भाषेचे एक आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध देशातील भारतीय संस्कृती व हिंदी केंद्र या माध्यमातून उपक्रमांचे आयोजन करते. विदेशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विद्यापीठाने बारा देशांशी करार केले आहे. श्रीलंका, हंगेरी, मॉरिशस, जपान, बेल्जीयम, इटली, जर्मनी, चीन, रशिया, फ्रोन्स, सिंगापूर, केनिया या देशांशी झालेल्या करारांतर्गत विद्यार्थ्यांचे आदानप्रदान होत असते. अनेक विदेशी विद्यार्थ्यांनी भारतीय साहित्यावर पीएच.डी. करीत संशोधनाचे नवे पदर उलगडले. परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने हे कार्यक्रम होतात. हिंदीच्या अशा प्रसाराच्या पार्श्वभूमीवर हिंदी संमेलनाचे आयोजन केले जाते.

५४ पैकी १३ ठिकाणी ‘नोटा’ निर्णायक :
  • पालघर : जिल्हा परिषदेच्या ५४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १३ जागांवर विजेत्या उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा नोटा मते (वरीलपैकी कुणी नाही) अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी विजयात नोटा मतांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे.

  • जिल्ह्यात तलवाडा विक्रमगड येथे सर्वात अटीतटीची लढत होऊन शिवसेनेच्या भारती कामडी (२,७४१) या अवघ्या सात मतांनी निवडून आल्या. अनुसूचित जमाती स्त्रियांकरिता राखीव मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस (२७३४), मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष (२३४४) आणि भारतीय जनता पार्टी (२४५१) उमेदवारांमध्ये चौरंगी व अटीतटीची लढत झाली. या

  • गटामध्ये दोन अपक्ष उमेदवारांनीही पाचशेहून अधिक मते घेतली असून नोटाला ३४० मते पडल्याचे दिसले. या गटामध्ये शिवसेनेचा उमेदवार अवघ्या सात मताने विजय झाला.

११ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.