चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ मार्च २०२०

Date : 12 March, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विराट कोहली मोडणार सचिनचा सर्वात मोठा विक्रम : 
  • न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतील सपशेल अपयशाला मागे सारून धरमशाला येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेद्वारे नवी सुरुवात करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

  • पहिल्या सामन्यात सर्व क्रीडा प्रेमींचं कर्णधार विराट कोहलीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण ‘रन मशीन’ विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका मोठ्या विक्रमाजवळ पोहचला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली हा विक्रम मोडू शकतो.

  • विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. पण मायदेशात होणाऱ्या या मालिकेतून विराटचा फॉर्म परत येईल असा कयास भारतीय क्रीडा प्रेमींना बांधला आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान १२ हजार धावा करण्यापासून विराट फक्त १३३ धावा दूर आहे.

  • २३९ डावांत विराट कोहलीच्या नावावर ११,८६७ धावा आहेत. सध्या सर्वात वेगवान १२ हजार धावांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने ३०० डावांत १२ हजार धावा केल्या आहेत. या मालिकेत ३३ धावा काढताच सर्वात वेगवान १२ हजार धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होईल. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने ३१४ डावांत तर श्रीलंकाचा माजी कर्णधारकुमार संगकाराने ३३६ डावांत १२ हजार धावा केल्या आहेत.

करोनाचं नागपूरमध्ये पाऊल; अमेरिकेतून परतलेल्या एकाला संसर्ग : 
  • महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात पाच जणांना करोनाची बाधा झाल्याचं समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर बुधवारी मुंबईतही दोन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू असतानाच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्येही करोना विषाणूनं पाऊल ठेवलं आहे. अमेरिकेहून परतलेल्या एकाला करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

  • चीनमधील वुहान शहरात उद्रेक झालेल्या करोना विषाणूमुळे जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जगातील अनेक देशांमध्ये करोनाग्रस्त रुग्णांची वाढत चालली आहे. भारतातही करोना आजारानं शिरकाव केला असून, महाराष्ट्रातही करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण सापडले आहेत. बुधवारीपर्यंत (११मार्च) महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १० होती. त्यानंतर नागपूरमध्ये आणखी एक करोनाग्रस्त रुग्ण सापडला आहे.

  • पाच दिवसांपूर्वी नागपूरला एक व्यक्ती अमेरिकेहून परतली. त्या व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. नागपूरमध्ये ११ जणांना करोना सदृश्य लक्षण आढळून होती. त्याचे नमुने घेतल्यानंतर प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. ११ पैकी नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. तर दोघांचे बाकी होते. यात पाच दिवसांपूर्वी अमेरिकेहून परतलेल्या रुग्णांचा अहवाल बुधवारी सांयकाळी आला. त्यात त्याला करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं.

लडाखमध्ये करोनाचे २ रुग्ण;३१ मार्चपर्यंत महाविद्यालये बंद : 
  • लेह,जम्मू : सीओव्हीआयडी १९ या करोना विषाणूचा प्रसार होत असल्याने आधी सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता,मात्र आता सर्व महाविद्यालयेही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत, असे लदाख प्रशासनाने म्हटले आहे.

  • लदाख केंद्रशासित प्रदेशाचे उच्च शिक्षण आयुक्त-सचिव रिगझियान सॅम्पहील यांनी सांगितले,की सध्याची परिस्थिती पाहून करोना विषाणूबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून सर्व महाविद्यालयेही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय गेल्या आठवडय़ातच जाहीर करण्यात आला होता.

  • इराणमधून परत आलेल्या महंमद अली यांचा लेहमघील एनएनएम रुग्णालयात मृत्यू झाला होता, पण त्यांची करोना चाचणी नकारात्मक आली होती.  आतापर्यंत २७ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यातील ११ नमुन्यांचे निकाल हाती आले असून दोन जणांची चाचणी सकारात्मक आली आहे. लदाखमधील छुशॉट गोंगमा भागात इराणच्या यात्रेहून परत आलेले लोक असून त्याभागाला संरक्षक कडे करण्यात आले आहे. लेह विमानतळावर आतापर्यंत १८ हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

करोना व्हायरसचा अमेरिकेलाही धसका : 
  • जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरचा आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेनेही धसका घेतल्याचे दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या पार्श्वभूमीवर विधान केलं आहे. आम्ही पुढील ३० दिवसांसाठी युरोप ते अमेरिका असे सर्व प्रवास रद्द करत आहोत. शुक्रवार मध्यरात्रीपासून नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.

  • जागतिक आरोग्य संघटनेकडूनही करोना व्हायरसला महारोगराई म्हणून संबोधण्यात आलं आहे. जगभरातील तब्बल १०० देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. शिवाय, आतापर्यंत तब्बल चार हजार पेक्षा अधिक जणांचा या व्हायरसने बळी घेतला आहे.

  • या पार्श्वभूमीवरच जागतिक आरोग्य संघटनेने करोनामुळे जगात महारोगराई पसरल्याचे घोषित केलं आहे. याचबरोबर संपूर्ण जगाने एकजुटीने या जीवघेण्या व्हायरसशी लढावं, असं आवाहनही संघटनेकडून करण्यात आलं आहे.

१२ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.