चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ जानेवारी २०२०

Date : 17 January, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा - आनंदचा पाचव्या फेरीत विजय : 
  • विकआंझे (हॉलंड) : पाच वेळा विश्वविजेत्या भारताच्या विश्वनाथन आनंदला अखेर यंदाच्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद करता आली.

  • पाचव्या फेरीत आनंदने पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना अमेरिकेच्या झियाँग जेफ्रीचा ४३ चालींमध्ये पराभव केला. पाचव्या फेरीत आनंद सुरुवातीपासूनच चांगल्या चाली खेळत होता. झियॉँगने थोडीफार झुंज दिली, मात्र त्याला अखेर हार मानावी लागली. अन्य लढतींमध्ये, विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला सलग पाचव्या फेरीत बरोबरी स्वीकारावी लागली.

नेताजींचा जन्मदिवस ‘देशभक्ती दिवस’ घोषित करा; नातवाचे सरकारला आवाहन : 
  • नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिवस हा ‘देशभक्ती दिवस’ म्हणून घोषित करण्यात यावा, असे आवाहन नेताजींचे नातू आणि भाजपा नेते चंद्र कुमार बोस यांनी मोदी सरकारला केले आहे.

  • चंद्र कुमार बोस यांनी सांगितले की, बऱ्याच काळापासून ही मागणी करण्यात येत आहे की, नेताजींचा जन्मदिवस ‘देशभक्ती दिवस’ म्हणून घोषित केला जावा. त्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत मागणी केली आहे.

  • तसेच यंदा आपण महात्मा गांधीची १५० वी जयंती साजरी करीत आहोत. त्याप्रमाणे २०२० मध्ये २३ जानेवारी हा नेताजींचा जयंती दिवस ‘देशभक्ती दिवस’ किंवा ‘देशप्रेम दिवस’ म्हणून घोषित करायला हवा, असेही चंद्र कुमार बोस यांनी म्हटले आहे.

ISRO ची आणखी एक यशस्वी कामगिरी, GSAT-30 लाँच; इंटरनेट क्षेत्रात होणार क्रांती : 
  • इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आणखी एक यशस्वी कामगिरी केली आहे. जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून यशस्वी प्रेक्षेपण केले आहे. आज, शुक्रवारी पहाटे दोन वाजून ३५ मिनिटांनी उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षेपण केले. GSAT-30 या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात नवी क्रांत्री होणार आहे. या उपग्रहामुळे इंटरनेट आधिक गतीने चालणार आहे.

  • GSAT-30 या उपग्रहाचं वजन सुमारे ३,१०० किलो आहे. लाँचिंगपासून १५ वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. या उपग्रहामध्ये दोन सोलर पॅनल आणि बॅटरी आहे.

  • यापूर्वी २०१५ मध्ये इनसॅट-४ए हा उपग्रह लाँच करण्यात आला होता. त्याची मर्यादा संपुष्टात आली असून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे GSAT-30 हा दुरसंचार उपग्रह इस्रोनं लॉन्च केला आहे. जीसॅट-३० हा उपग्रह इनसॅट-४एच्या जागी काम करेल.

१७ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.