चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ मार्च २०२०

Date : 17 March, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
करोनावर उपया सुचवा - एक लाख जिंका; पंतप्रधान मोदींकडून ऑफर : 
  • सध्या देशात करोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सरकारकडूनही करोनाला रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनावर उपाय सुचवण्याचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. यासाठी सरकारकडून ‘COVID – 19 Solution Challenge’चं आयोजन करण्यात आलं आहे.

  • यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलं आहे. यामध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला १ लाखांचं बक्षिस मिळणार आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये एक लिंक शेअर केली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत पेजवर जातो. यामध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. सध्या देशभरात तसंच राज्यपातळीवर करोनाचा सामना करण्यासाठी अनेक पावलं उचलली जात आहे. तसंच सरकारनंही नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन कंल आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी करोनावर उपययोजना सुचवण्याचं आवाहन केलं आहे.

पर्रिकर पुण्यतिथी विशेष: सामान्यांमध्ये मिसळणारा, स्कुटरवरुन ऑफिसला जाणारा, दिवसाला १५-१६ तास काम करणारा नेता : 
  • गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची आज पुण्यतिथी. २०१९ साली आजच्याच दिवशी वयाच्या ६३ वर्षी त्यांचे निधन झालं. अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेले पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. अखेरच्या काही दिवसांमध्ये त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते.

  • २०१८ पासून पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या निधनानंतर सामान्यांमधील असामान्य नेतृत्व गमावल्याची भावना भारतीयांनी व्यक्त केली होती. अनेक नेत्यांनी, कलाकारांनी, खेळाडूंनी ट्विटवरुन पर्रिकरांना श्रद्धांजली अर्पण केली होती. पर्रिकर हे त्यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच साधेपणासाठीही ओळखले जायचे.

  • मुख्यमंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री झाल्यानंतरही त्यांचे साधे रहाणीमान कायमच राहिले. मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते अनेक वर्ष वडीलोपार्जित घरातच राहत होते. अनेकदा गोवेकरांनी पर्रिकरांना स्कुटवरुन ऑफिसला जाताना पाहिले आहे. त्यांच्या अशाच साधेपणाचे अनेक किस्से गोवेकरांच्या चर्चेमध्ये सहज ऐकायला मिळतात. अशाच काही प्रसिद्ध किस्यांवर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त टाकलेली नजर…

युरोपसह अन्य देशांतील प्रवाशांना भारतात बंदी : 
  • करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी कडक निर्बंध लागू केले. त्यानुसार युरोपातील प्रवाशांना प्रवेश नाकारण्याबरोबरच देशभरातील सर्व  शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत.

  • शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, संग्रहालये, सांस्कृतिक-सामाजिक केंद्रे, व्यायामशाळा, नाटय़ आणि चित्रपटगृहे, तरण तलाव इत्यादी सार्वजनिक स्थळे बंद करण्याचा आदेश केंद्र सरकारने जारी केला. करोनाचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव झालेले युरोपीय संघातील देश, टर्की आणि इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना १८ ते ३१ भारतात प्रवेशबंदी लागू करण्यात येत असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले.

  • करोनाबाबतच्या मंत्रिगटाची बैठक झाल्यानंतर, सरकारने संपर्क टाळण्याच्या उपाययोजना सुचवल्या असून त्या ३१ मार्चपर्यंत लागू राहतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले. युरोपीय संघाचे आणि युरोपीय मुक्त व्यापार संघटनेचे सदस्य देश, टर्की आणि ब्रिटन येथून येणाऱ्या प्रवाशांना १८ मार्चपासून भारतात प्रवेशबंदी करण्यात येत आहे, असे मंत्रालयातील सहसचिवांनी सांगितले.

  • कुठलीही विमान कंपनी बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून या देशातील प्रवाशांना भारतात आणणार नाही. संबंधित विमान कंपनी प्रवासाच्या पहिल्या ठिकाणापासूनच याची अंमलबजावणी करेल, असेही ते म्हणाले. या दोन्ही सूचना तात्पुरत्या स्वरूपाच्या असून, ३१ मार्चनंतर त्यांचा आढावा घेण्यात येईल, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

“दुसऱ्या देशांकडून थोडं शिका’; ‘बर्थ डे गर्ल’ सायनाचा चाहत्यांना सल्ला : 
  • करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. जगभरात सुमारे दीड लाखांहून अधिक लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास ७८ हजार लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे.

  • त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. या दरम्यान, भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने आपल्या चाहत्यांना खास संदेश दिला आहे.

  • “अत्यंत सावधनता बाळगा आणि घरातच राहा. पुढच्या दोन आठवड्याचा कालावधी हा भारतासाठी अत्यंत नाजूक आणि कसोटीचा असणार आहे. इतर देशांनी करोनाबाबत काय सावधनता बाळगली आणि कशाप्रकारे करोनाचा सामना केला ते नीट समजून घ्या आणि त्यानुसार स्वत:च्या परिसरात सावधनता बाळगा”, असा संदेश सायना नेहवालने दिला.

१७ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.