चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ ऑक्टोबर २०१९

Date : 18 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
२०२३ हॉकी विश्वचषकाच्या यजमानपदासाठी भारत शर्यतीत
  • आगामी २०२३ पुरुष हॉकी विश्वचषकासाच्या यजमानपदासाठी भारतही आता शर्यतीत उतरला आहे.

  • जानेवारी १३ ते १९ दरम्यान हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे, यासाठी हॉकी इंडियाने आपली दावेदारी सादर केली आहे.

  • याआधी ३ वेळा भारताने हॉकी विश्वचषकाचं यजमानपद भूषवलं आहे.

  • भारताव्यतिरीक्त बेल्जियम आणि मलेशिया हे दोन देशही यजमानपदाच्या शर्यतीत आहेत.

अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल
  • बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या तीन दिवसांपासून रूग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

  • यकृताच्या त्रासामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

  • आपलं यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत असल्याचं अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी सांगितलं होतं.

अभिजित बॅनर्जी व पत्नीला अर्थशास्त्राचा नोबेल
  • ऑस्लो : अमेरिकेचे नागरिक असलेले भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ प्रा. अभिजित विनायक बॅनर्जी, त्यांच्या फ्रेंच पत्नी एश्थर ड्युफ्लो आणि अमेरिकेचे प्रा. मायकेल क्रेमर या तिघांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला.

  • अर्थशास्त्रातील सैद्धांतिक संशोधनाबद्दल हा सर्वोच्च बहुमान मिळविणारे प्रा. बॅनर्जी हे डॉ. अमर्त्य सेन यांच्यानंतरचे भारतीय वंशाचे दुसरे अर्थतज्ज्ञ आहेत.

  • ५८ वर्षांचे प्रा. बॅनर्जी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट््स इस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत, तर त्यांच्या दुसऱ्या पत्नी असलेल्या डॉ. ड्युफ्लो त्याच संस्थेत दारिद्र्य निर्मूलन व विकास अर्थशास्त्र या विषयाच्या प्राध्यापक आहेत.

  • प्रा. क्रेमर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात ‘विकसनशील समाज’ या विषयाचे प्राध्यापक आहेत. अवघ्या ४७ वर्षांच्या असलेल्या प्रा. ड्युफ्लो या अर्थशास्त्राचील नोबेलच्या सर्वात तरुण मानकरी अणि हा पुरस्कार मिळविणाºया दुसºया महिला आहेत.

दोन हजारच्या नोटांची छपाई बंद
  • रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत दोन हजार रुपयांची एकही नोट छापलेली नाही.

  • माहितीच्या अधिकारांतर्गत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला रिझर्व्ह बँकेने दिलेल्या उत्तरातून ही बाबत उघड झाली.

४५० कोटींचा जीएसटी घोटाळा : एमडी अटकेत
  • विशाखापट्टणम - जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) अधिकाऱ्यांनी ४५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला (एमडी) अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.

  • डीजीजीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पायाभूत क्षेत्रातील प्रकल्प आणि सरकारी कंत्राटदारांशी संबंधित या कंपनीने सेवा न देताच खोटी देयके जारी केली.

  • विशाखापट्टणम भागात अलीकडच्या काळात समोर आलेल्या जीएसटी घोटाळ्याच्या प्रकरणांत हा घोटाळा सर्वात मोठा असल्याचे म्हटले जात आहे.

माजी संचालक सुरजितसिंह अरोरा अटकेत
  • मुंबई : आर्थिक गुन्हे विभागाने बुधवारी पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेचे (पीएमसी) माजी संचालक सुरजितसिंह अरोरा यांना अटक केली.

  • कर्ज प्रस्तावाला मंजुरी देणाऱ्या समितीत अरोरा यांचा समावेश होता. बँक कर्ज घोटाळ्यातील ही पाचवी अटक आहे.

  • संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या अन्य संचालकांना देश सोडणे शक्य होऊ नये, या उद्देशाने ‘लूक आऊट’ नोटीस जारी केल्याचे आर्थिक गुन्हे विभागाकडून सांगण्यात आले.

 

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • अलास्का दिन - अमेरिका

जन्म /वाढदिवस

  • न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य यांचा जन्म : १८ ऑक्टोबर १८६१

  • इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) चे संस्थापक आणि अध्यक्ष झाकीर नाईक यांचा जन्म : १८ ऑक्टोबर १९६५

  • भारतीय लेखक अमिश त्रिपाठी यांचा जन्म : १८ ऑक्टोबर १९७४

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • पहिल्या यांत्रिकी संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज यांचे निधन : १८ ऑक्टोबर १८७१

  • पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचे निधन : १८ ऑक्टोबर १९५१

  • भारतीय कवी आणि लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचे निधन : १८ ऑक्टोबर १९७६

ठळक घटन

  • टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली : १८ ऑक्टोबर १९५४

  • राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या बळवंत संगीत नाटक मंडळी ने केला : १८ ऑक्टोबर १९१९

  • कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला : १८ ऑक्टोबर २००२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.