चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ नोव्हेंबर २०१९

Date : 19 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी :
  • मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण वैध ठरवलं होतं. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाच याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

  • सरन्यायाधीस शरद बोबडे, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.

  • मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाकडून ५८ मूकमोर्चे काढण्याच आले होते. त्यानंतर राज्य सरकारनं नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. परंतु त्यानंतर मुबंई उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती.

  • परंतु मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण वैध ठेवलं होतं. त्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मराठा आरक्षण देतेवेळी घटनापीठाने घालून दिलेल्या ५० टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचं याचिकेत म्हटलं होतं.

राजपक्ष यांचा शपथविधी प्राचीन बौद्ध स्तूपात : 
  • श्रीलंकेचे सातवे अध्यक्ष म्हणून चीनमित्र गोताबाया राजपक्ष यांचा शपथविधी प्राचीन बौद्ध स्तूपात सोमवारी झाला. सिंहली बहुसंख्याकांनी मोठा प्रतिसाद दिल्याने हा शपथविधी या ठिकाणी घेण्यात आला. बौद्ध धर्माला प्राधान्य देतानाच इतर समुदायांचे रक्षण केले जाईल असे गोताबाया राजपक्ष यांनी सांगितले.

  • रूवानवेली सेया या स्तूपाच्या ठिकाणी हा शपथविधी झाला. या धार्मिक ठिकाणी जगातून आणलेले काही बौद्ध अवशेष असून हा स्तूप कोलंबोपासून २०० कि.मी अंतरावर अनुराधापुरा येथे आहे.

  • राजपक्ष हे कोलंबोबाहेर  शपथविधी करणारे पहिले अध्यक्ष ठरले आहेत. पांढरा वेष परिधान केलेल्या राजपक्ष यांनी सरन्यायाधीश जयंत जयसुरिया यांच्या उपस्थितीत अधिकृत कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांनी त्यांना अध्यक्षीय सचिव उदय आर सेनेविरत्ने यांनी अधिकारपदाची शपथ दिली.

आयटी क्षेत्रातील ४० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता - मोहनदास पै : 
  • जर भारतीय अर्थव्यवस्थेतील सुस्ती कायम राहिली तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या या वर्षात आपल्या ३० ते ४० हजार कर्मचाऱ्यांना कमावरुन कमी करु शकतात, अशी भीती इन्फोसिसचे माजी चीफ फायनान्शिअल ऑफिसर (सीएफओ) मोहनदास पै यांनी व्यक्त केली आहे.

  • आयटी क्षेत्रात प्रत्येक पाच वर्षांनंतर हजारो लोकांच्या नोकऱ्या या प्रकारे जातात. कारण, पाच वर्षांत आयटी क्षेत्रात मोठे बदल होत असतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांतून काढले जाते, असे पै यांनी म्हटले आहे. जेव्हा कोणतीही इंडस्ट्री पूर्ण सक्षम होते तेव्हा मध्यम स्तरावर काम करणारे अनेक लोक आपल्या पगाराच्या तुलनेत कंपनीला नवं काही देऊ शकत नाहीत. याच कारणामुळे जगात प्रत्येक क्षेत्रात अनेक जणांना आपली नोकरी गमवावी लागते, असे त्यांनी म्हटले आहे. नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

  • जेव्हा एखादी कंपनी विकसित होत असते तेव्हा कर्मचाऱ्यांना बढती मिळत असते तसेच त्यांच्या पगारातही वाढ होत असते अशा परिस्थितीत कंपनीला यामुळे फारसा फरक पडत नाही. मात्र, जेव्हा कंपनीचा विकास थांबतो तेव्हा व्यवस्थापनाला यावर विचार करणे भाग पडते. अशा परिस्थितीत मध्यम आणि वरच्या पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त पगार मिळत असतो त्यांच्यावर नोकरी जाण्याचे संकट ओढवते.

‘मावळी मंडळ-श्री’ स्पर्धेत अक्षय कारभारी विजेता :
  • जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा :- ठाणे येथील श्री मावळी मंडळातर्फे आयोजित ३१व्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत अक्षय कारभारी ‘मावळी मंडळ-श्री’ किताबाचा मानकरी ठरला. कळव्याच्या अपोलो जिमने ४४ गुण मिळवून सांघिक विजेतेपद मिळवले, तर भिवंडीच्या युनिव्हर्सल फिजिक्स सेंटरला २० गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

  • शायन कासकरने सवरेत्कृष्ट प्रदर्शकाचा पुरस्कार मिळवला, तर वैभव शिंदे आणि विवेक सिंग यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.’

  • स्पर्धेतील निकाल पहिला गट (उंची : १६२ सेंटिमीटरखालील) : १. पुरुषोत्तम बुरोडकर, २. यशवंत जाधव, ३. सिजू कुरियाकोस; दुसरा गट (१६२ ते १६७ सेमी) : १. स्वप्निल वाघमारे, २. शायन कासकर, ३. इजहार अन्सारी; तिसरा गट (१६७ ते १७२ सेमी) : १. अक्षय कारभारी, २. योगेश दिवटणकर, ३. अझहर शेख; चौथा गट (१७२ सेमीवरील) : १. नितेश शेट्टी, २. भूषण पाटील, ३. राजू मढवी.

ऑस्ट्रेलियाच्या स्मिथवर एका वर्षाची बंदी : 
  • ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याच्यावर काही महिन्यांपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदीची कारवाई केली होती. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे स्मिथसह इतर दोन खेळाडूंवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती.

  • आता ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एमिली स्मिथ हिच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदीची कारवाई केली आहे. वुमन्स बिग बॅश लीग (WBBL) स्पर्धेत होबार्ट हरिकेन संघाकडून खेळणाऱ्या स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.

  • WBBL स्पर्धेत खेळताना संघाच्या अंतिम ११ खेळाडूंची यादी स्मिथला मिळाली होती. पण संघाची अधिकृत घोषणा होण्याआधीच स्मिथने अतिउत्साहाने ती यादी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी स्मिथवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. स्मिथच्या बंदीचा कालावधी १ वर्षाचा आहे. मात्र स्मिथला ‘बॅक-डेटेड’ बंदी देण्यात आली असून ९ महिन्यांची बंदीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. पण ३ महिन्यांच्या बंदीची शिक्षा मात्र स्मिथला भोगावी लागणार आहे.

दिनविशेष :
  • जागतिक शौचालय दिन / आंतरराष्ट्रीय पुरूष दिन / महिला उद्योजकता दिन

महत्वाच्या घटना 

  • १९४६: अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९६०: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना.

  • १९६९: फूटबॉलपटू पेले यांनी १,००० वा गोल केला.

  • १९६९: अपोलो-१२ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अ‍ॅलन बिल हे चंद्रावर उतरले.

  • १९९८: व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे द पोर्ट्रेट ऑफ अ‍ॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले.

  • १९९८: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.

  • १९९९: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.

  • २०००: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान.

जन्म 

  • १८२८: झाशीच्या राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १८५८)

  • १८३१: अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १८८१)

  • १८३८: ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १८८४)

  • १८४५: भारतीय-इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक एग्नेस जिबर्ने यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९३९)

  • १८७५: प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे १९५०)

  • १८७७: व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९४७)

  • १८८८: क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९४२)

  • १९०९: ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००५)

  • १९१४: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार एकनाथजी रामकृष्ण रानडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८२)

  • १९१७: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८४)

  • १९२८: मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारा सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१२)

  • १९३८: टर्नर ब्रॉडकास्टिंग सिस्टमचे संस्थापक टेड टर्नर यांचा जन्म.

  • १९४२: केल्विन क्लेन इंक चे संस्थापक केल्विन क्लेन यांचा जन्म.

  • १९७६: ट्विटर चे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८८३: जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सिमेन्स यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १८२३)

  • १९७१: मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक कॅप्टन गो. गं. लिमये यांचे निधन.

  • १९७६: कोव्हेन्ट्री कॅथेड्रल चे रचनाकार बॅसिल स्पेन्स  यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०७)

  • १९९९: कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास कृष्ण धोंगडे यांचे निधन.

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.