चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ नोव्हेंबर २०१९

Updated On : Nov 22, 2019 | Category : Current Affairsसंयुक्त पूर्व परीक्षा रद्द करा! लोकसेवा आयोगाकडे मागणी :
 • पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे स्वतंत्रपणे पूर्व परीक्षा घेण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी एमपीएससीला पत्र, ई-मेल पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

 • आयोगाकडून पीएसआय, एसटीआय, एएसओ या गट ब आणि लिपिकसारख्या गट क पदांसाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. या एकत्र परीक्षेमुळे उमेदवारांना समान संधी मिळत नाही. एएसओ पदासाठी पात्र होणारे उमेदवार पीएसआय आणि एसटीआय पदांसाठीही पात्र होतात. हे उमेदवार तिन्ही मुख्य परीक्षा देतात. मात्र, त्यातील काही उमेदवार पीएसआय शारीरिक चाचणीसाठी जात नाहीत. त्यामुळे पीएसआय पदाच्या परीक्षेसाठी

 • तयारी करणाऱ्या उमेदवारांना संधी न मिळाल्याने त्यांचे नुकसान होते. त्यामुळे ही एकत्रित परीक्षा विभक्त करून पूर्वीप्रमाणे ती स्वतंत्रपणे घेण्यात यावी, अशी मागणी आहे.

महिंदा राजपक्ष श्रीलंकेचे नवे पंतप्रधान : 
 • कोलंबो : श्रीलंकेचे अध्यक्ष म्हणून गोताबाया राजपक्ष यांची निवड झाल्यानंतर गुरुवारी त्यांचे ज्येष्ठ बंधू महिंदा राजपक्ष यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यामुळे श्रीलंकेतील राजकीय क्षेत्रावर शक्तिशाली आणि वादग्रस्त राजपक्षे घराण्याने वर्चस्व प्रस्थापित केल्याचे बोलले जात आहे.

 • महिंदा राजपक्ष यांना गोतबाया यांनी अध्यक्षीय सचिवालयात पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. ऑगस्ट २०२० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत महिंदा राजपक्ष काळजीवाहू मंत्रिमंडळाचे पंतप्रधान म्हणून काम पाहणार आहेत.

 • या शपथविधीला माजी अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना, माजी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे आणि अनेक राजकीय नेते हजर होते. महिंदा राजपक्ष हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. त्यापूर्वी विक्रमसिंघे यांनी गोताबया राजपक्ष यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.

केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त : 
 • नवी दिल्ली : गेल्या वर्षी १ मार्च रोजीच्या स्थितीनुसार, केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये मिळून सुमारे ७ लाख पदे रिक्त होती, अशी माहिती गुरुवारी राज्यसभेत देण्यात आली.

 • एकूण ६ लाख ८३ हजार ८२३ पदांपैकी, ५७४२८९ पदे गट ‘क’ मधील, ८९६३८ पदे गट ‘ब’मधील, तर १९८९६ पदे गट ‘अ’ मधील आहेत. १ मार्च २०१८ रोजीची ही आकडेवारी आहे, असे कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

 • संबंधित विभागांनी उपलब्ध करून दिलेल्या या आकडेवारीच्या आधारे कर्मचारी निवड आयोगाने २०१९-२० या वर्षां १०५३३८ पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली असल्याचेही सिंह म्हणाले.

 • नव्या, तसेच येत्या दोन वर्षांमध्ये उद्भवणाऱ्या रिक्त जागा लक्षात घेऊन २०१७-१८ या वर्षांत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे निवड मंडळ यांनी गट ‘क’ आणि स्तर-१ मिळून एकूण १२७५७३ रिक्त जागांसाठी केंद्रीकृत भरती अधिसूचना जारी केली असल्याची माहिती सिंह यांनी दिली.

‘देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५६६ प्रकल्पांना विलंब’ : 
 • नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय महामार्गाचे ५६६ प्रकल्प विलंबाने सुरू असून, कुठल्याही प्रकल्पाचे काम रोखण्यात आलेले नाही, असे केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले.

 • भूसंपादन व पर्यावरण, वन आणि वन्यजीवविषयक मंजुरी मिळवणे, तसेच लवादाच्या कार्यवाहीतील वाद या प्रमुख कारणांमुळे प्रकल्पांना उशीर होत आहे, असे रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. प्रकल्प पूर्ण होण्यातील विलंबामुळे काही प्रकल्पांचा खर्च वाढला आहे, असेही ते म्हणाले.

 • या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी, भूसंपादन आणि पर्यावरणविषयक मंजुरी सुसंगत बनवणे, इतर मंत्रालयांशी समन्वय साधणे, वाद निवारण यंत्रणेत सुधारणा करणे, प्रकल्प विकासक, राज्य सरकार व कंत्राटदार यांच्यासोबत वारंवार आढावा बैठका घेणे यासारख्या उपाययोजना विविध स्तरांवर करण्यात आल्या आहेत, असे मंत्री म्हणाले. या समस्येवर मात करण्यासाठी  आवश्यक असलेल्या जमिनीपैकी ९० टक्के जमीन उपलब्ध असेल आणि सर्व वैधानिक परवानग्या मिळाल्या असतील.

भारताला अमेरिका देणार १३ तोफा; युद्धनौका, लढाऊ विमानांवर हल्ला करण्याची क्षमता वाढणार : 
 • युद्धा नौका आणि लढाऊ विमानांवर हल्लाबोल करण्याची क्षमता असणाऱ्या एमके -45 या प्रकारच्या अत्याधुनिक तोफा येत्या काही महिन्यांमध्ये भारताच्या ताफ्यात असतील. अशा प्रकारच्या 13 तोफा भारताला विक्री करण्याच्या व्यवहाराला अमेरिकेने मंजुरी दिली आहे.

 • या 13 तोफांसाठी भारताला 7100 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. संरक्षण सौद्यांना मंजुरी देणाऱ्या अमेरिकेच्या संस्थेने बुधवारी रात्री याबाबत माहिती दिली.

 • अमेरिकेच्या संरक्षण खात्याने नौदलाच्या ऑपरेशन्ससाठी या तोफांची निर्मिती केली आहे. त्याचे आधुनिक व्हर्जन भारताला मिळणार आहे. भारताला मिळणाऱ्या तोफांचा पुढचा भाग (बॅरेल) हा अपेक्षित लांबीपेक्षा अधिक असेल. या तोफांसोबत भारताला त्यासाठी लागणारा दारूगोळा, इतर उपकरणेही विकली जाणार आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १८५८: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना.

 • १९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा.

 • १९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

 • १९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन.

 • १९६३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.

 • १९६८: द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.

 • १९८६: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.

 • २०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.

जन्म 

 • १८८०: धर्मरहस्यकार केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९५६)

 • १८८५: पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९५१)

 • १९०९: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार द. शं. तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८)

 • १९१३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. लक्ष्मीकांत झा यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९८८ – पुणे)

 • १९१५: चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८०)

 • १९२२: साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म.

 • १९२६: मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक आर्थर जोन्स यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००७)

 • १९३९: उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म.

 • १९४३: अमेरिकन लॉनटेनिस पटू बिली जीन किंग यांचा जन्म.

 • १९६८: पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म.

 • १९७०: श्रीलंकेचा क्रिकेट कर्णधार मार्वन अट्टापट्टू यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९०२: जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रूप्प यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४)

 • १९२०: कवी व संपादक एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचे निधन.

 • १९४४: खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिग्टन यांचे निधन.

 • १९५७: नाट्यकर्मी पार्श्वनाथ आळतेकर यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १८९७)

 • १९६३: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४)

 • १९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. (जन्म: २९ मे १९१७)

 • १९८०: हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती मे वेस्ट यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १८९३)

 • २०००: अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१२)

 • २०१२: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचे निधन. (जन्म: २३ मे १९२६)

 • २०१६: भारतीय गायक एम. बालमुलकृष्ण यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९३०)

 

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)