चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ नोव्हेंबर २०१९

Date : 23 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चीनच्या ‘ओबीओआर’ प्रकल्पाला भारताचा विरोध : 
  • वॉशिंग्टन : चीनच्या वन बेल्ट, वन रोड (ओबीओआर) प्रकल्पाला भारताने विरोध केला असून भारताच्या या भूमिकेला अमेरिकेने पाठिंबा दर्शविला आहे.

  • अब्जावधी डॉलरच्या या प्रकल्पामागील आर्थिक गणिताच्या तर्कसंगतीवर प्रश्न उपस्थित करताना भारताने व्यक्त केलेली चिंता योग्य असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

  • पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि त्यामधून चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका प्रकल्प जाणार असल्याने प्रांतीय सार्वभौमत्वाच्या मुद्दय़ावर ओबीओआर प्रकल्पाला विरोध करणारा भारत हा एकमेव मोठा देश आहे.

  • ओबीओआर हा चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा आवडता प्रकल्प असून त्याद्वारे आशियाई देश, आफ्रिका, चीन आणि युरोप यांच्यातील संपर्कता आणि सहकार्य यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

जलशुद्धीकरण यंत्रनिर्मिती कंपन्यांनी केंद्र सरकारकडे दाद मागावी : 
  • नवी दिल्ली : एकूण विद्राव्य घन पदार्थाचे (टीडीएस) प्रमाण लिटरला पाचशे मिलीग्रॅमपेक्षा कमी असलेल्या जलशुद्धीकारक यंत्रांवर बंदी घालण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशावर पाणी शुद्धीकरण यंत्र उत्पादक संघटनांनी सरकारकडे दाद मागावी, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.

  • आरओ जलशुद्धीकारक यंत्रे तयार करणाऱ्या वॉटर क्वालिटी इंडिया संघटनेने दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हे मत व्यक्त  केले. जलशुद्धीकारक यंत्रांमुळे पाण्यातील घन विद्राव्य घटकांचे प्रमाण फारच कमी होऊन खनिजांचा समावेश नसलेले पाणी  ग्राहकांना मिळते व त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो, या मुद्दय़ावर हरित लवादाने या पाचशे मिलीग्रॅमपेक्षा कमी विद्राव्य घन घटक असलेल्या आरओ (रिव्हर्स ऑसमॉसिस) जलशुद्धीकारक यंत्रांवर बंदी घातली आहे.

  • त्यावर उत्पादक संघटनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. न्या. आर.एफ नरीमन व न्या. रवींद्र भट यांनी सांगितले की, याबाबत उत्पादक संघटनेने संबंधित मंत्रालयाकडे याप्रकरणाशी संबंधित कागदपत्रे घेऊन दहा दिवसात दाद मागावी. त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार अधिसूचना जारी करण्यापूर्वी उत्पादकांची बाजू सरकार ऐकून घेईल.

महाराष्ट्रातील अवकाळीग्रस्तांसाठी केंद्राकडून ६०० कोटींची अंतरिम मदत :
  • नवी दिल्ली : महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्राने ६०० कोटींची अंतरिम मदत जाहीर केली असल्याचे कृषी राज्यमंत्री पुरूषोत्तम रूपाला यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासाला  असे स्पष्ट केले की, महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही ऑक्टोबरमधील पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.

  • राज्य सरकारने केलेल्या प्राथमिक विनंतीनुसार सरकारने नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी शिष्टमंडळ पाठवले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही शेतकऱ्यांना सहाशे कोटींची अंतरिम मदत देण्याचे ठरवले आहे पण हा आकडा अंतिम समजण्याचे कारण नाही. महाराष्ट्रात अगदी नोव्हेंबपर्यंत पडत राहिलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते. केंद्र सरकार हे राज्याकडून पिकांच्या नुकसानीबाबत अंतिम अंदाज मिळण्याची वाट पहात आहे.

  • आणखी एका प्रश्नावर त्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३१०० कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांची नावे पाठवल्यानंतर हा निधी देण्यात आला आहे.

खासगी कंपन्यांनी ‘आधार’ वापरण्यास आव्हान :
  • नवी दिल्ली : आधार कार्ड माहिती खासगी आस्थापनांना वापरण्यास परवानगी देण्यासाठी कायद्यात बदल करण्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस जारी करून म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

  • ग्राहकांनी ओळख पटवण्यासाठी स्वत:हून दिलेली आधार कार्ड माहिती वापरण्यास खासगी आस्थापनांना परवानगी देण्याची तरतूद आधार कायद्यात २०१९ मधील दुरुस्तीने करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालातील आदेशांचे उल्लंघन झाले आहे,असे एस.जी वोम्बाटकेरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश शरद बोबडे व न्या. बी.आर.गवई यांच्या पीठाने केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे.

  • यापूर्वी पाच सदस्यांच्या घटनापीठाने आधार कायद्याची वैधता मान्य करताना काही अपवाद केले होते.

  • खासगी आस्थापनांना ग्राहकांनी ओळख पटवण्यासाठी दिलेली माहिती वापरता येणार नाही, असा आदेशही घटनापीठाने दिला होता. नंतर केंद्र सरकारने आधार कायद्यात दुरुस्ती करून आधार माहितीचा वापर बँक खाते व मोबाईल कनेक्शनसाठी ऐच्छिक पातळीवर करता येईल, असे म्हटले होते.

दिनविशेष :

महंतांच्या घटना 

  • १९२४: एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.

  • १९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.

  • १९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.

  • १९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.

  • १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.

  • १९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.

जन्म 

  • १७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)

  • १८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)

  • १८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)

  • १९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर २००२)

  • १९२६: आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०११)

  • १९३०: अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९७२)

  • १९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.

  • १९६७: दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म.

  • १९८४: अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९३७: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८५८)

  • १९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १८९१)

  • १९७०: सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)

  • १९७९: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)

  • १९९३: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली)

  • १९९९: अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे यांचे निधन.

  • २०००: चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)

  • २००६: झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला  यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.