चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ ऑक्टोबर २०१९

Date : 23 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
 एक्झिट पोलनंतर उडाली सट्टा बाजारात खळबळ
  • मतदान सुरु असताना सट्टा बाजारात मोठी उलथापालत झाली. मतदानाची सरासरी ७०.४६ टक्के झाल्याने सट्टा बाजार स्तब्ध झाला.

  • सोमवारी सायंकाळी ६ वाजता विविध चॅनल्सवर महाराष्ट्राचा एक्झिट पोल दाखवायला सुरुवात झाली.

  • महायुती पुन्हा सत्तेत येणार असे चित्र दाखविले जात होते. त्यामुळे तुमसरच्या सट्टा बाजारात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरला
  • भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबर रोजी शांततेत मतदान पार पडले.

  • जिल्ह्यातील नऊ लाख ९१ हजार ८९० मतदारांपैकी सहा लाख ७१ हजार ८२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

  • त्यात तीन लाख ४४ हजार ३३४ पुरुष आणि तीन लाख २७ हजार ४८७ महिला मतदारांचा समावेश आहे.

स्वंयघोषित कल्की भगवानच्या आश्रमावर छापा, 600 कोटींचं घबाड सापडलं
  • चेन्नई/हैदराबाद : स्वतःला कल्कि या देवाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या विजय कुमार नायडू आणि त्याच्या मुलाच्या आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकातील आश्रमांवर आयकर विभागानं छापेमारी केली आहे.

  • त्यात 600 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती उघड झाली आहे. दरम्यान या कल्की बाबाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, मी देश सोडून कुठेही गेलेलो नाही.

  • आयकर विभागाने विजय कुमार नायडूशी संबधित एकूण 39 ठिकाणी छापे टाकले.

  • त्यापैकी आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील कल्कि आश्रमावरील झाडाझडतीत 65 कोटींची अघोषित संपत्ती सापडली आहे.

  • त्यात 45 कोटींची रोकड आणि 20 कोटी रुपये इतके मूल्य असलेले अमेरीकन डॉलर तसेच इतर देशांमधील चलनाचा समावेश आहे.

टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी धुव्वा
  • रांची : विराट कोहलीच्या टीम इंडियाने रांची कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी धुव्वा उडवला आहे.

  • या विजयासह भारतीय संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

  • कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेला भारताने पहिल्यांदाच व्हाईटवॉश दिला आहे.

  • भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 133 धावांत गुंडाळला.

महायुतीला सरासरी 214 जागा मिळणार, प्रमुख वृत्तवाहिन्यांच्या पोलचा अंदाज
  • मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान पार पडले.

  • संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 54.53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

  • मतदानाच्या आकडेवारीनुसार एबीपी माझा सी वोटरसह देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांनी निवडणुकीच्या निकालाचा सर्व्हे केला.

  • या सर्वच वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

                  Vidhansabha Exit Poll 2019

 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.

  • १८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.

  • १८९०: हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.

  • १९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.

  • १९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.

जन्म 

  • १७७८: कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९)

  • १८७९: वैदिक धर्माचे पुरस्कर्ते शंकर रामचंद्र तथा अहिताग्नी राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२)

  • १९००: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९५८)

  • १९२३: श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी२०००)

  • १९२३: भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान असलम फारुखी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुन२०१६)

  • १९२४: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९८९)

  • १९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते देवेन वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)

  • १९४०: ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म.

  • १९४५: अभिनेते व नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९९६)

  • १९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक अरविंद अडिगा यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९१०: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १८५३)

  • १९१५: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १८४८)

  • १९२१: चाकाच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक तसेच डनलॉप रबर चे संस्थापक जॉन बॉईड डनलॉप यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)

  • १९५७: ख्रिश्चन डायर एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन डायर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९०५)

  • २०१२: बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.